Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News: बुलढाण्याची राजकीय संस्कृती रसातळाला? संजय गायकवाडांनंतर मुलगा कुणाल गायकवाडांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल

दिवंगत गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली होती.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 25, 2026 | 11:01 AM
Sanjay Gaikwad Buldhana News, Kunal Gaikwad Viral Video, Shivaji Kon Hota Book Controversy,

Sanjay Gaikwad Buldhana News, Kunal Gaikwad Viral Video, Shivaji Kon Hota Book Controversy,

Follow Us
Follow Us:
  • संजय गायकवाड यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांच्या एका व्हायरल व्हिडिओ
  • शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी
  • कुणाल गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
 

Buldhana News: बुलढाण्याचे शिवसेनेचे (शिंदे गट) वादग्रस्त आमदार संजय गायकवाड यांच्यानंतर आता त्यांचे सुपुत्र कुणाल गायकवाड यांच्या एका व्हायरल व्हिडिओने जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली. याला काही तास उलटत नाहीत तोच त्यांच्या मुलाच्या अश्लील वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने नेटकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गायकवाड पिता-पुत्रांचे ‘कारनामे’ चर्चेत

आमदार संजय गायकवाडांची दिलगिरी

दिवंगत गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी आणि अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप राज्यभर व्हायरल झाली होती. यावरून टीकेची झोड उठल्यानंतर आमदार गायकवाड यांनी अखेर या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली. मात्र, “छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा, या भूमिकेवर मी ठाम आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, प्रकाशकांनी तक्रार देण्याचा प्रयत्न करूनही पोलिसांनी ती नोंदवली नसल्याची माहिती समोर आली आहे.

महाराष्ट्रात सर्वत्र पीएफ मलेरियाचा वाढता धोका! जागतिक मलेरिया दिनानिमित्त गंभीर प्रकारावर

कुणाल गायकवाड यांचा व्हिडिओ व्हायरल

आमदारांचा वाद शमतो न शमतो, तोच त्यांचे सुपुत्र आणि बुलढाणा नगरपरिषदेचे गटनेते कुणाल गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कुणाल गायकवाड गाडीच्या बोनेटवर उभे राहून विरोधकांना अश्लील भाषेत शिवीगाळ करताना दिसत आहेत.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

हा व्हिडिओ नगरपरिषद निवडणुकीच्या निकालानंतरचा असल्याचे सांगण्यात येत आहे. कुणाल गायकवाड प्रभाग क्रमांक ६ मधून विजयी झाले होते. विजयाच्या मिरवणुकीदरम्यान त्यांनी काँग्रेस नेते दत्ता काकस यांच्या घरासमोर फटाके फोडले. गाडीच्या बोनेटवर चढून त्यांनी राजकीय विरोधकांना उद्देशून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.नगरपरिषदेत गटनेते पदावर असलेल्या लोकप्रतिनिधीकडून अशा प्रकारच्या वर्तणुकीची अपेक्षा नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर गायकवाड पिता-पुत्रांवर टीकेचा पाऊस पडत असून, बुलढाण्यातील राजकीय संस्कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Nagpur News: ‘शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि…’; धीरेंद्र शास्त्रींच्या वादग्रस्त

दरम्यान, ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी ( Prashant Ambi) यांना फोनवरून शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात आमदार Sanjay Gaikwad यांनी अखेर दिलगिरी व्यक्त केली आहे. या घटनेवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला होता, तसेच त्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

या प्रकरणात प्रशांत आंबी यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र ती नोंदवली गेली नसल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, महायुतीतील काही नेत्यांनीही या प्रकरणावर सावध भूमिका घेतल्याचे दिसून आले.

संजय गायकवाड या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की की, वादाच्या दरम्यान त्यांच्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले. “या घटनेबद्दल मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. पण ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तिकेमधील एकेरी उल्लेखांवर आक्षेप घेत त्यांनी हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराशी संबंधित असल्याचे म्हटले शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा, ही आपली ठाम भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Web Title: Like father like son outrage in buldhana after video of kunal gaikwad abusing rivals surfaces

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:01 AM

Topics:  

  • Buldhana politics
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
1

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
2

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
3

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका
4

‘अमित शहा मुंबईत आले की…’; मुंबई दौऱ्यावरून संजय राऊत यांची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.