महाराष्ट्रात सर्वत्र पीएफ मलेरियाचा वाढता धोका! जागतिक हिवताप दिनानिमित्त गंभीर प्रकारावर आरोग्य यंत्रणांनी दिला गंभीर इशारा
हिवताप म्हणजे फक्त ताप नाही, तर त्यामागे दडलेला पीएफ म्हणजे प्लाजमोडियम फाल्सिपॅरॉम हा जीवघेणा प्रकार राज्यासाठी मोठा धोका बनत आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहता, हिवतापाच्या रुग्णांमध्ये पीएफचे चिंताजनकरीत्या प्रमाणा वाढत असल्याचे दिसून येते. वेळेत उपचार न झाल्यास हा प्रकार थेट जीवावर बेतू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. राज्यात २०२३ ते २०२५ दरम्यान हिवतापाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली असल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाची आकडेवारी सांगते. यातील सर्वात धोकादायक बाब म्हणजे पी.एफ. प्रकाराचे प्रमाण ३९ टक्क्यांवरून ४२ टक्क्यांपर्यंत गेले होते. हा प्रकार सामान्य मलेरियापेक्षा अधिक वेगाने शरीरावर परिणाम करतो.(फोटो सौजन्य – istock)
“महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात…”; Mangal Prabhat Lodha यांनी व्यक्त केला विश्वास
पी.एफ. मलेरियामध्ये रुग्णाची प्रकृती अचानक खालावते. मेंदूवर परिणाम होऊन ‘सेरेब्रल मलेरिया’ होण्याचा धोका असतो. यामुळे बेशुद्धावस्था, झटके येणे तसेच किडनी व लिव्हर निकामी होण्यासारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात. त्यामुळेच हा प्रकार ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जातो. २०२६ मध्ये २१ एप्रिलपर्यंत २,७२० हिवताप रुग्ण नोंदले गेले असून, त्यापैकी ६३४ रुग्ण पी.एफ. प्रकाराचे आहेत. सध्या मृत्यू शून्य असले तरी धोका टळलेला नसल्याचेच समोर येत आहे.
जिल्हानिहाय पाहता राज्यात सहा जिल्ह्यात हिवतापाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यात गडचिरोली, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, रत्नागिरी आणि चंद्रपूर असे असून शहरी भागातही बृहन्मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, मिराभाईंदर व वसई विरार येथे हिवताप चा प्रभाव दिसून येत आहे.यावरून हा आजार केवळ ग्रामीण मर्यादित नसून शहरांमध्येही वेगाने पसरत असल्याचे स्पष्ट होते.
अचानक खूप ताप येणे, जो थंडी वाजून येतो आणि पुन्हा कमी होणे
अंग थरथरणे आणि थंडी वाजून येणे.
ताप उतरताना भरपूर घाम येणे.
खूप थकवा जाणवणे
सांध्यांमध्ये वेदना






