
Imtiyaz Jaleel
Imtiyaz Jaleel : राज्याच्या राजकारणात आधीच वातावरण तापले असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. AIMIM चे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांना धमकीचे पत्र आले असून त्यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. राज्यात याआधी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि नुकत्याच झालेल्या शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या राजकीय हत्यांच्या पार्श्वभूमीवर जलील यांना देण्यात आलेल्या धमकीवरून मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांना धमकीचं पत्र प्राप्त झालं. या पत्रातील मजकूर वाचल्यानंतर त्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, अहिल्यानगरमधील एका तरुणाला जलील यांना संपवण्याची सुपारी दिल्याचा उल्लेख या पत्रात असल्याचे त्यांनी सांगितले.
इम्तियाज जलील यांनी हे धमकीचं पत्र पोलिसांकडे सुपूर्द केलं आहे. या प्रकरणाची माहिती देताना त्यांनी पत्र पोलिसांना दिल्याचं आणि त्याचा तपास सुरू असल्याचं सांगितलं.आता पोलिसांकडून या पत्राची सत्यता, ते कुणी पाठवलं आणि त्यातील कथित सुपारीचा उल्लेख नेमका कशाच्या आधारे करण्यात आला आहे, याचा तपास केला जाण्याची अपेक्षा आहे.
या धमकीवजा पत्रानंतर इम्तियाज जलील यांनी माध्यमांशी संवाद साधताना, “अश्या धमक्या अनेकदा येत असतात. त्याला आपण भीक घालत नाही. धमकीचे पत्र पोलिसांकडे दिले आहे. आता या पत्राची सत्यता पोलिसांनी चौकशी करावी. ज्या व्यक्तीला मला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली त्याची चौकशी करावी,” असे ते म्हणाले.
Ans: इम्तियाज जलील यांना जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र मिळाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या पत्रात त्यांच्या हत्येसाठी सुपारी दिल्याचा उल्लेख असल्याचे सांगण्यात आले आहे.
Ans: जलील यांच्या म्हणण्यानुसार, अहिल्यानगरमधील एका तरुणाला सुपारी दिल्याचा उल्लेख धमकीच्या पत्रात आहे.
Ans: त्यांनी धमकीचे पत्र पोलिसांकडे सुपूर्द केले आहे. या पत्राची सत्यता आणि त्यामागील व्यक्तींचा शोध घेण्याबाबत तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.