Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे; आनंद परांजपे यांचे आवाहन

Maharashtra Politics: महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखण्याच्या मुद्द्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2026 | 04:40 PM
महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे; आनंद परांजपे यांचे आवाहन

महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे; आनंद परांजपे यांचे आवाहन

Follow Us
Follow Us:
  • महायुतीतील मित्र पक्षांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे
  • शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांचे आवाहन
  • तिन्ही पक्षातील समन्वयावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होईल
ठाणे: महायुतीतल्या मित्र पक्षांच्या प्रवक्ते आणि नेत्यांनी शिवसेना नेत्यांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले आहे. विधान परिषद निवडणूक निकालानंतर सुरु झालेले आरोप प्रत्यारोप थांबवून तिन्ही पक्षांमधील समन्वय अधिक वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे परांजपे यांनी म्हटले आहे. (Maharashtra Politics)

परांजपे म्हणाले की, विधान परिषद निवडणूक निकालानंतर मित्र पक्षांच्या प्रवक्त्यांनी शिवसेना नेत्यांबाबत बोलताना जी भाषा वापरली ती महायुतीमध्ये योग्य नाही. आजची भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांची पत्रकार परिषदेतील भाषा अयोग्य होती, मित्र पक्षांच्या प्रवक्त्यांनी आणि नेत्यांनी भाषेची मर्यादा पाळायला हवी. प्रत्येकाने मर्यादा आणि संयम पाळला पाहिजे, असे ते म्हणाले. आपल्याला दिलेल्या पदापेक्षा जास्त मर्यादा ओलांडून कोणीही शिवसेनेवर टीका करण्याचा प्रयत्न करु नये, असे परांजपे म्हणाले.

INDIA Alliance Public Impeachment Program: इंडिया अलायन्सचा ‘जनमहाभियोग’ कार्यक्रम रद्द; नेमकं काय आहे कारण?

दोस्तीत कुस्ती नको

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यातील बैठकीत महायुतीच्या समन्वयाबाबत चर्चा होईल, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना व प्रवक्त्यांना मित्र पक्षांवर टीका करु नये तसेच दोस्तीत कुस्ती नको, असे आदेश दिले आहेत. महायुतीत शिवसेना नेत्यांकडून मित्र पक्षांच्या नेत्यांवर टीका होणार नाही, अशीच अपेक्षा भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करतो, असे ते म्हणाले.

आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्याचा परांजपे यांनी निषेध केला. कुठल्याही लोकप्रतिनिधीने अशी असंवेदनशील वक्तव्य करु नयेत, असे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत. आमदार गायकवाड यांच्या वक्तव्यावर पक्षाकडून कारवाई केली जाईल, असे संकेत मुख्य नेते शिंदे यांनी दिल्याचे परांजपे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की, नैसर्गिक संकटात सर्वात प्रथम जाणारा पक्ष शिवसेना आहे. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि शिवसेना सर्वात आधी धावून जाते, असे परांजपे म्हणाले. केवळ महाराष्ट्रच नाही तर केरळचा महापूर, जम्मू काश्मिरमधील अतिवृष्टी, नेपाळमधील अडकेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी शिवसेना धावून गेली होती, असे त्यांनी सांगितले. यंदाच्या दुष्काळात शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी १८० तालुक्यांत ४ लाख ६० हजार दिवाळी शिधाचे वितरण

परांजपे म्हणाले की, यंदाचा दसरा मेळावा शिवसेनेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना समर्पित केला होता. पक्षाकडून ४ लाख ६० हजार दिवाळीचा शिधा १८० दुष्काळग्रस्त तालुक्यांतील शेतकरी बांधवांकडे पोहोचला, असल्याची माहिती परांजपे यांनी दिली. महाराष्ट्रातील माता भगिनींना २५ हजार शिलाई मशीनचे वाटप, मुलींना २५ हजार सायकलचे वाटप शिवसेनेकडून केले जात आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या मुलींचे विवाह जमले आहेत, त्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून शिवसेनेकडून विवाह केले जाणार आहेत. शिवसेना बळीराजाच्या मागे खंबीरपणे उभी आहे, असे त्यांनी सांगितले.

पदवीधर निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’; आयात उमेदवाराचा डाव फसला

💡

Frequently Asked Questions

  • Que: शिवसेना प्रवक्ते आनंद परांजपे यांनी मित्रपक्षांना काय आवाहन केले?

    Ans: महायुतीतील मित्रपक्षांनी शिवसेनेच्या नेत्यांवर आरोप करणे टाळावे, असे आवाहन आनंद परांजपे यांनी केले.

  • Que: महायुतीतील कोणत्या मुद्द्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार आहे?

    Ans: महायुतीतील तिन्ही पक्षांमधील समन्वयाच्या मुद्द्यावर वरिष्ठ पातळीवर चर्चा होणार असल्याचे परांजपे यांनी सांगितले.

  • Que: आनंद परांजपे कोणत्या पक्षाचे प्रवक्ते आहेत?

    Ans: आनंद परांजपे हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत.

Web Title: Mahayuti allies should avoid allegations against shiv sena leaders anand paranjpe sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:40 PM

Topics:  

  • Anand Paranjpe
  • Maharashtra Politics
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला
1

Eknath Shinde Mahayuti Rift: निकालानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस; एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला

Torrent Project: ‘टोरंट प्रकल्प आम्हाला नको, राज्यात कुठेही न्या’; आरपीआय आठवले गटाचा विरोध
2

Torrent Project: ‘टोरंट प्रकल्प आम्हाला नको, राज्यात कुठेही न्या’; आरपीआय आठवले गटाचा विरोध

Sanjay Gaikwad Controversial Statement: शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य भोवणार; संजय गायकवाडांवर निलंबनाची टांगती तलवार
3

Sanjay Gaikwad Controversial Statement: शेतकऱ्यांबाबत अपमानास्पद वक्तव्य भोवणार; संजय गायकवाडांवर निलंबनाची टांगती तलवार

MLC Election Results 2026: पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका? आनंद परांजपेंचा पलटवार
4

MLC Election Results 2026: पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या भूमिकेमुळे महायुतीला फटका? आनंद परांजपेंचा पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.