
नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी
अर्जात सुनील चांदणे यांनी नमूद केले आहे की, ते देहरे येथील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा रोजचा प्रवास अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरूनच होतो. स्वतःचा देहरे–राहुरी, पत्नीचा देहरे–वांबोरी, वहिनीचा देहरे–अहिल्यानगर, पुतणीचा देहरे–विळद घाट येथील शाळेसाठी, तर मोठ्या भावाचा जिल्ह्यातील विविध ठिकाणी या महामार्गावरून नियमित प्रवास होत असल्याने हा रस्ता त्यांच्या कुटुंबासाठी जीवघेणा ठरत असल्याचे त्यांनी अर्जात स्पष्ट केले आहे.
Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या
महामार्गाची स्थिती इतकी विदारक झाली आहे की, तो रस्ता कमी आणि खड्ड्यांचे साम्राज्य अधिक वाटते. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे बनले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.
कर्जमागणी केलेले 600 कोटी रुपये अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या कामासाठी वापरावेत, असे अर्जात नमूद करतानाच, या खर्चाचा संपूर्ण तपशील बँकेला सादर करण्याची तयारी असल्याचे चांदणे यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर “माझ्या पगारातून दरमहा हप्ता कापून घ्या”, असे लिहून त्यांनी शासनाच्या निष्क्रीयतेवर उपरोधिक, पण अत्यंत गंभीर प्रहार केला आहे.
या अर्जाची प्रत थेट मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना पाठवण्यात आल्याने, हा प्रश्न केवळ स्थानिक मर्यादेत न राहता राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवलेला इशारा ठरतो. सरकारकडून रस्ता होणार नसेल, तर नागरिक स्वतः पुढाकार घेतील, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे. वरवर हसवणारा वाटणारा हा अर्ज प्रत्यक्षात रडवणारे वास्तव मांडतो. तरीही यंत्रणा शांत राहिली, तर उद्या उरतील ते फक्त अपघातांचे आकडे आणि निष्क्रीयतेची नोंद.
आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान
हा अर्ज हसण्याचा विषय नसून, गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अहिल्यानगर–मनमाड महामार्गाबाबत शासनाच्या अपयशाची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार आहे. या मार्गावर आतापर्यंत असंख्य अपघात झाले असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर काही प्रवासी कायमचे अपंग झाले आहेत. मात्र प्रत्येक अपघातानंतर केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होते आणि काही दिवसांत सर्वकाही विसरले जाते.
पूर्वी ज्या प्रवासासाठी 45 मिनिटे लागत होती, त्याच प्रवासासाठी आज तीन तासांहून अधिक वेळ खर्ची पडत असल्याचे वास्तव या महामार्गाची भयावह अवस्था अधोरेखित करते.