Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात लोकल ट्रेनचा प्रवास राहणार सुसाट! रेल्वे मार्गावरील धोकादायक झाडांवर पालिकेची कुऱ्हाड, ६७ फांद्यांची केली छाटणी

लोकल सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवार, ३१ मे रोजी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकदरम्यान पालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 01, 2026 | 11:40 AM
पावसाळ्यात लोकल ट्रेनचा प्रवास राहणार सुसाट! रेल्वे मार्गावरील धोकादायक झाडांवर पालिकेची कुऱ्हाड

पावसाळ्यात लोकल ट्रेनचा प्रवास राहणार सुसाट! रेल्वे मार्गावरील धोकादायक झाडांवर पालिकेची कुऱ्हाड

Follow Us
Follow Us:

मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या लोकल प्रवासाला पावसाळ्यात झाडे आणि फांद्या कोसळल्यामुळे दरवर्षी ‘ब्रेक’ लागतो. मात्र, यंदाचा पावसाळा मुंबईकरांसाठी सुकर व्हावा आणि रेल्वे सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे प्रशासनासोबत मिळून रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक वृक्षांना हटवण्याची मोठी मोहीम हाती घेतली आहे. ३१ मेच्या मेगाब्लॉकचा फायदा घेत ओव्हरहेड वायर आणि रुळांवर झुकलेल्या तब्बल ६७हजारांहून अधिक वृक्षांच्या फांद्यांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य – AI)

रात्रीच्या वीज कपातीने नवी मुंबईकर हैराण! वाढत्या उष्णतेत झोपमोड, संताप आणि प्रशासनाविरोधात नाराजी

पावसाळ्यातील जोरदार वारे, अतिवृष्टी आणि वादळी हवामानामुळे वृक्षांच्या फांद्या तुटून रेल्वे रुळांवर किंवा विद्युत वाहिन्यांवर पडण्याच्या घटना दरवर्षी घडतात. यामुळे लोकल सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांचे प्रचंड हाल होतात. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रविवार, ३१ मे रोजी मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकदरम्यान पालिकेच्या उद्यान विभागाने रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली.

८८ रेल्वे मार्गालगतच्या धोकादायक वृक्षांचे वेळेत व्यवस्थापन आणि फांद्यांची छाटणी करण्यात आली. त्यामुळे पावसाळ्यात ओव्हरहेड वायर्सवर फांद्या पडून लोकल सेवा खंडित होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही एक महत्वाची प्रतिबंधात्मक उपाययोजना ठरेल, असे मत
उद्यान विभाग, मुंबई महापालिकेने मांडले आहे.

पावसाळ्यापूर्वी शहरातील ८४ हजार ८१९ वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले होते. त्यापैकी ६७ हजार २७४ वृक्षांची छाटणी झाली असून, उर्वरित १७ हजार १९७ वृक्षांचे पूर्ण काम अंतिम टप्प्यात आहे. हे सर्व काम ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य उद्यान विभागाने ठेवले होते.केवळ झाडांची छाटणीच नव्हे, तर त्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेने एप्रिल महिन्यात ‘वृक्षसंजीवनी अभियान-३’ राबविले होते. या मोहिमेत ४१४ स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Mumbai News: मध्य रेल्वेच्या जागेवर १६ हजार बेकायदेशीर झोपड्या! कुर्ला-ट्रॉम्बे, कल्याण, डोंबिवलीत सर्वाधिक विळखा

३६९ धोकादायक वृक्ष हटवले

महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात रेल्वे मार्गालगत आणि शहरात एकूण ३८७ मृत अथवा धोकादायक वृक्ष आढळले होते.त्यापैकी ३६९ वृक्ष आतापर्यंत पूर्णपणे हटविण्यात आले असून, उर्वरित १८ वृक्षांना हटविण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. पावसाळा ऋतूला लवकरच सुरुवात होणार आहे. याच पार्शवभूमीवर रेल्वे मार्गातील झाडे आणि पावसाळा पूर्वीच्या कामांना वेग आला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Local train travel will be smooth during rainy season municipal ax on dangerous trees on railway line

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 11:40 AM

Topics:  

  • Local train Mumbai
  • Monsoon Alert
  • monsoon care

संबंधित बातम्या

Dengue Vaccine: डेंग्यूविरुद्ध ‘ब्रह्मास्त्र’ तयार! भारतात पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटातील नागरिकांना मिळणार कवच
1

Dengue Vaccine: डेंग्यूविरुद्ध ‘ब्रह्मास्त्र’ तयार! भारतात पहिल्या लसीला मंजुरी; ४ ते ६० वयोगटातील नागरिकांना मिळणार कवच

विकतचे पदार्थ खाऊन पोट बिघडते? पावसाळ्यात टायफॉइड आणि पोटाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सोपे उपाय
2

विकतचे पदार्थ खाऊन पोट बिघडते? पावसाळ्यात टायफॉइड आणि पोटाच्या संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे सोपे उपाय

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे
3

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे

Maharashtra Rain : मान्सूनची जोरदार एन्ट्री! पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात कुठे आणि कधी बरसणार पाऊस?
4

Maharashtra Rain : मान्सूनची जोरदार एन्ट्री! पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात कुठे आणि कधी बरसणार पाऊस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.