Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“लोकमान्य टिळक हे आधुनिक भारताचे निर्माते, टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली” – पंतप्रधान नरेंद्र मोदी

या सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मला पुरस्कार मिळाल्याबद्दल मी टिळक संस्थेचे आभार मानतो. असं म्हणाले. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. सुुरुवातील मोदींनी लोकमाान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना श्रद्धांजली वाहिली.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 01, 2023 | 01:25 PM
“लोकमान्य टिळक हे आधुनिक भारताचे निर्माते, टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली” – पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow Us
Follow Us:

पुणे : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi in Pune) पुण्यात आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya Tilak Award)  सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, टिळकांची प्रतिमा तसेच एक लक्ष रुपये देऊन मोदींचा सत्कार करण्यात आला. याआधी त्यांनी दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन घेतले. दरम्यान, मोदी पुण्यात दाखल होताच हेलिपॅडवर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे. यावेळी सुरुवातीला मोदींना लोकमान्य टिळकांचे पुस्तक देऊन स्वागत केले. यानंतर या सोहळ्यात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) मला पुरस्कार मिळाल्याबद्दल मी टिळक संस्थेचे आभार मानतो असं म्हणाले. मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली. सुुरुवातील मोदींनी लोकमाान्य टिळक व अण्णाभाऊ साठेंना श्रद्धांजली वाहिली. (lokmanya tilak is the creator of modern india tilak changed the direction of freedom movement prime minister narendra modi)

फुले, टिळक, चापेकर ही वीरांची भूमी

महारष्ट्राच्या भूमीला कोटी कोटी वंदन. लोकमान्य टिळक पुरस्कार मिळणं हा माझे मी भाग्य समजतो, असं मोदी म्हणाले. ज्या टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात गणेश उसत्वाची सुरुवातीला हाक दिली. आणि हाकेला मान देऊन दगडशेठ गणपतीने गणेश उत्सवाचे आयोजन केले. त्या गणपीतेचे मी दर्शन घेतले. महाराष्ट्र आणि काशीमध्ये खूप साम्य आहे. कारण दोन्ही प्रदेश हे पुण्यभूमीचे आहेत. देवताचे आहेत.  मी पुरस्कार घेतल्यानंतर माझी आणखी जबाबदारी वाढली आहे. हा पुरस्कार मी १४० करोड देशवासियांना समर्पित करतो. तसेच या पुरस्काराचे सर्व धनराशी मी नमामी गंगेच्या कामासाठी देत आहे. फुले, टिळक, चापेकरांची ही भूमी आहे. ही वीरांची भूमी आहे, असं मोदी म्हणाले.

महान नेत्याचे लक्ष मोठे असते

टिळकांनी स्वातंत्र्य आंदोलनाची दिशा बदलली. त्याग आणि समर्पित याचे उदाहरण म्हणजे लोकमान्य टिळक, आज पण लाल, बाल, पाल यांची आठवण काढली जाते. देशाच्या स्वातंत्र्यात टिळकांची भूमिका महत्त्वाची आहे. टिळकांनी समाजाला एकत्र आणण्यासाठी शिवजयंती, गणशोत्सव असे सण सुरु केले. यामुळं लोकं एकत्र आल्यान त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. टिळक हे महान नेते होते. त्यांनी आपली स्वप्न मोठे ठेवले. आणि विचार मोठे केले. त्यामुळं टिळक हे महान नेते होते.

टिळक हे आधुनिक भारताचे निर्माते

टिळक हे तरुणाचे मन ओळखायचे, वीर सावरकरांचे देशप्रेम त्यांनी ओळखले होते. डेक्कन एजुकेशन सोसायटी, फग्युसन कॉलेज, अशा अनेक संस्था या महत्त्वाचा भाग आहेत. टिळक हे देशाचे नेते आहेत, पण त्यांचे गुजरातमधील लोकांशी त्यांचे संबंध आले होते. स्वांतत्र्यलढ्यात अहमदाबादेत एक दिड महिना जेलमध्ये होते. टिळकांचे भाषण ऐकण्यासाठी सरदार वल्लभाई पटेल सुदधा होते. दरम्यान, टिळक हे आधुनिक भारताचे निर्माते होते, असं मोदी म्हणाले. “लोकमान्य टिळक लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करायचे. टिळकांनी लोकांना स्वातंत्र्याचा विश्वास दिला. त्यांना इतिहास, संस्कृती, लोकांवर आणि भारताच्या सामर्थ्यावर विश्वास होता” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

टिळकांनी सावरकरांची क्षमता ओळखली

“सावरकर युवा होते, टिळकांनी त्यांची क्षमता ओळखली. त्यांची इच्छा होती, सावरकरांनी बाहेर जाऊन शिकाव. त्यानंतर इथे येऊन स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावं. लोकमान्य टिळक यांनी वीर सावरकर यांना बॅरिस्टक बनण्यासाठी मदत केली”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.”स्वातंत्र्य लढ्याच्यावेळी लोकमान्य टिळक गुजरातमध्ये आले होते. सरदार पटेलही टिळकांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 40 हजार लोकांनी टिळकांच गुजरातमध्ये स्वागत केलं होतं. महाराष्ट्राप्रमाणे गुजरातच्या जनतेच टिळकांशी विशेष नात आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था

आज विश्व भारतामध्ये भविष्य पाहतोय. लोकमान्यांचा आत्मा जिथे असेल, तिथून ते आपल्याला पाहतायत. आपल्याला आशिर्वाद देत आहेत. त्यांच्या आशिर्वादाने समृद्ध भारत साकार करु मला विश्वास आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “मागच्या 9 वर्षात भारताच्या लोकांनी परिवर्तन करुन दाखवलं. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. हे लोकांनी करुन दाखवलं. कोरोनाकाळात मेड इन इंडिया लस बनवून दाखवली. त्यात पुण्याच योगदान आहे” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: Lokmanya tilak is the creator of modern india tilak changed the direction of freedom movement prime minister narendra modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2023 | 01:11 PM

Topics:  

  • narendra modi
  • Pune

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
2

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद
3

MSRTC NCMC Card : ‘ही’ सवलत घेण्यात पुणेकरांनी मारली बाजी; तब्बल 9.26 लाखांची नोंद

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
4

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.