मुंबई : मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकावर जोरदार निशाणा साधला आहे. लोकांमधे जावून खरे वास्तव बाहेर आणा. ग्रामपंचायत (Grampanchayat) निवडणुकीत (Election) आम्हाला मिळालेलं यश पहा, आम्ही कामाचा धडाका लावला आहे. मागील सरकार ने काही केलं नव्हतं. मग आमच्या कमाला लोकं प्रतिसाद देतील की त्यांना तुम्हीच सांगा? कोणाची आघाडी होईल, कोणाचं पुढे काय होईल सांगता येणार नाहीं. मात्र आम्ही आणि भाजप एकत्र राहणार आणि लढणार, त्यामुळे या पोलचा आनंद त्या लोकांना घेऊ द्या. आम्हाला निवडणुकीच भीती नाही. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर बोलताना शिंदे म्हणाले, टीकेला, अरोपाला उत्तर देणं मी टाळतो. मी लोकांना कामांनी उत्तर देतो. येवढे लोकं तुम्हाला सोडून जातात , नातेवाईक सोडून जातात त्याचं आत्मपरीक्षण कारा. असं शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्री शिंदेंना आव्हान
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. “आज नागरिकांच्या आरोग्याची काळजी घ्यायला आलोय आणि उद्या ठाणेकरांच्या राजकीय आरोग्याची काळजी घ्यायला येणार आहे. सध्या जो काही विकृत आणि गलिच्छपणा राजकारणामध्ये आलेला आहे तो समोर दिसत असतानाही शिवसेना आपल्या मूळ हेतूपासून दूर गेलेली नाही. जे अस्सल निष्ठावंत शिवसैनिक आहेत ते सगळे इथे आहेत. बाकी जे बिकाऊ आहेत कोणत्या भावाने विकले गेले हे तुम्हाला माहिती आहेत. काश्मीरमध्येही 50 खोकेच्या घोषणा दिल्या जात आहेत. पण यामुळे महाराष्ट्राची आणि शिवसेनेची बदनामी झालीय,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अस्सल शिवसैनिक सोबत राहिले
अन्यायावर लाथ मारा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहेच. यासोबत 80 टक्के समाजसेवा आणि 20 टक्के राजकारण हे आपलं ब्रीद आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. तसेच जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत राहिले आहेत हे निखारेच उद्या राजकारणात मशाल पेटवणार आहेत, असे म्हणत शिंदे गटात गेलेल्या शिवसैनिकांवर टीका केली.