Dhananjay Munde News:बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही गंभीर आरोप झाले होते. या आरोपांमुळे मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, राजीनामा देऊन आज पाच महिने उलटूनही त्यांनी आपले शासकीय निवासस्थान ‘सातपुडा’ बंगला अद्याप सोडलेले नाही, हे समोर आले आहे. अधिकृतरीत्या पदत्याग करून सहा महिने उलटले असतानाही मुंडे हे त्याच बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे ते सरकारी बंगला कधी सोडणार असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे.
खरंतर, एखाद्या मंत्र्यांने मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांत सरकारी निवासस्थानी रिकामे करायचे असते, असा नियम आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंना २० मार्चपर्यंत सातपुडा बंगला सोडणे आवश्यक होते. पण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काही काळासाठी बंगल्याचा वापर चालू ठेवण्याची विनंती केली होती, जी मान्य करण्यात आली. मुंबईत आपले घर नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. पण याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मुंबईत वीरभवन परिसरात धनंजय मुंडे यांचे आलिशान घर असल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रात त्यांनी मुंबईतील गीरगाव चौपाटीजवळ असलेल्या सदनिकेचा उल्लेख केला आहे. हे घर गीरगाव चौपटीजवळ एन.एस पाटकर मार्गावर वीरभवन या २२ मजली इमारतीत जवळपास ९व्या मजल्या ९०२ क्रमांकाची सदनिका असल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रतिज्ञा पत्रात म्हटले आहे. २०२३ डिसेंबरमध्येच धनजंय मुंडे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे १६ कोटी ५० लाख रुपयांना ही सदनिका खरेदी केली होती.यासाठी धनंजय मुंडे यांनी स्वत: १९ कोटी रुपये खर्च केल्याच उल्लेखही करण्यात आला आहे. या घरात कोणीही राहत नाही, खरेदी केल्यापासून हे घर बंदच असल्याचेही म्हटले आहे.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांचे नाव समोर आल्यानंतर मुंडे अडचणीत आले आणि त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नियमानुसार, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांत, म्हणजे २० मार्चपर्यंत, त्यांनी बंगला रिकामा करणे अपेक्षित होते. पण मुंबई आपले स्वत:चे घर नसल्याचा दावा आणि मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याचे कारण देत त्यांनी सरकारी बंगला सोडण्यासाठी मुदत मागितली होती. पण सहा महिने उलटूनही त्यांनी अजूनही घर सोडलेले नाही.
बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह माजी अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांनी ४ मार्च २०२५ रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, पाच महिने उलटूनही त्यांनी आपले शासकीय निवासस्थान – मलबार हिल परिसरातील उच्च श्रेणीतील ‘सातपुडा’ बंगला – अद्याप रिकामा केलेला नाही.
नियमांनुसार, मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांत, म्हणजे २० मार्चपर्यंत, बंगला रिकामा करणे अपेक्षित होते. मात्र, मुंडे अजूनही तेथे वास्तव्यास आहेत. या परिस्थितीमुळे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळांनाही बंगल्याची वाट पाहावी लागत आहे. सूत्रांनुसार, बंगला न रिकामा केल्याने मुंडे यांच्यावर सुमारे ४२ लाख रुपयांचा दंड प्रलंबित आहे. राज्याच्या महायुती सरकारमध्ये धनंजय मुंडे यांना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती, त्यानंतर त्यांना ‘सातपुडा’ बंगला वापरासाठी मिळाला होता. परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणातील घडामोडींनंतर त्यांना पद सोडावे लागले. तरीही, नियमानुसार मुदत संपूनही त्यांनी बंगला सोडलेला नाही.