आमदार धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार करू
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थिती लावली आणि तटकरे यांच्याबद्दल भावनिक भाष्य केले. तटकरे यांचा आधार वडिलांसारखा असल्याचे सांगताना धनंजय मुंडे यांनी पक्षात जबाबदारीची मागणीही केली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वूपर्ण विधान केले.
तटकरेंच्या सत्कार सोहळ्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी सुनिल तटकरे यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. ‘सुनील तटकरे यांचे मार्गदर्शन आम्हाला कायम हवे आहे. चुकले तर कान धरून नीट मार्ग दाखवा. चूक झाली तर चालते, पण आता रिकामे ठेवू नका. काहीतरी जबाबदारी द्या’, अशी मागणी मुंडे यांनी केली. धनंजय मुंडे हे काही काळ राजकीयदृष्ट्या शांत होते, पण आता ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार याबाबत काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले होते. असे असताना आता अजित पवार यांनी महत्त्वपूर्ण विधान केले.
हेदेखील वाचा : धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळामध्ये होणार रिएन्ट्री? राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे स्पष्टच बोलले
दरम्यान, अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दिले. धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार करू. त्यांच्या विनंतीला मान दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यामुळे धनंजय मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाबाबत उत्सुकता वाढली आहे.
धनंजय मुंडे यांची विनंती योग्य
धनंजय मुंडेंच्या मागणीवर सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटले, ‘धनंजय मुंडे यांची विनंती योग्य आहे. याबाबत वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत विचारले असता त्यांनी सकारात्मक पवित्रा घेतला. धनंजय मुंडेंच्या विनंतीचा विचार करू. त्यांच्या विनंतीला मान दिला जाईल,’ असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
हेदेखील वाचा : Shivsena UBT-MNS : 50-50 की 60-40? शिवसेना-मनसे युतीत जागा वाटप फॉर्म्युला ठरला, मुंबईत कोण किती जागा लढणार?