Jitendra Awhad on Tuljabhavani Mandir: संपूर्ण महाराष्ट्राचं नवे तर परदेशात राहणाऱ्या लाखो मराठी लोकांचही कुळदैवत असलेल्या तुळजाभवानी मंदिराबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील फडणवीस सरकार तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात असल्यचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली असून, त्यावरून नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मंगळवारी जितेंद्र आव्हाड यांनी तुळजाभवानी मातेच्या मंदिराला भेट दिली. देवीचे दर्शनही घेतले.
यादरम्यान त्यांनी मंदिर संस्थानाकडून सुरू असलेल्या गाभारा दुरुस्ती आणि विकास कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी, मंदिर संस्थानाकडून सुरू असलेल्या विकासकामाला माझा विरोध नाही. पण गरज नसताना देवीच्या गाभाऱ्याची मोडतोड का केली जातेय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच, ‘मी सनातन हिंदू नसलो, तरी हिंदू असून राज्य सरकारला देवीच्या मंदिराच्या दगडालाही हात लावून देणार नाही,’ असा इशाराही आव्हाड यांनी यावेळी दिला. याचवेळी त्यांनी एक ट्विटर एक्सवर पोस्ट करत लक्षही वेधले आहे.
Sharad Pawar News: पडळकरांना भिडला, तुरूंगात गेला….; शरद पवारांनी त्यालाच दिली मोठी जबाबदारी
“तुळजापूर येथील आई तुळजाभवानी मातेच्या मंदिराचा गाभारा पाडण्याच्या बेतात हे राज्य सरकार आहे.हा आमच्या संस्कृतीवर आणि आमच्या श्रद्धेवर घाला आहे.छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे मंदिर,नुसते मंदिर नसून लाखो करोडो भक्तांच्या आस्थेचे प्रतीक आहे. याविरोधात आज तुळजापूर येथे मंदिराला भेट देऊन भाविकांच्या याबाबत जनजागृती केली….सोबतच आई तुळजाभवानी मातेचे दर्शन देखील घेतले..!” असे जितेद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेले दगड आहेत. ते फक्त दगड नाहीत महाराष्ट्राचा इतिहास आहे. ज्या दगडांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं, ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना पाहिलं, त्या दगडांना हलणारे हे कोण लागून गेले. ज्या दगडी पायऱ्यांनी शिवाजी महाराज चढले-उतरले ते दगड पाडून टाकायचे. ते आम्हाला मान्य नाही. उद्या म्हणतील रायगडपण हलवा. रायगड हे आमचे श्रद्धास्थान आहे.
मंदिराच्या शुशोभिकरणाला, त्याच्या डागडुजीला आमचा विरोध नाही, पण गाभारा पाडण्याला आमचा विरोध आहे. येथील स्थानिकांच्या जनभावनाही तीव्र आहेत. देवीने काही मला स्वप्नात येऊन सांगितलेले नाही. मला इथल्या स्थानिकांचे काही पुजाऱ्यांचेही फोन आलेत. मी एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही. त्यांना विचारून मी भूमिका घेतलेली नाही. तुम्हाला जे काही करायचं ते करा, पण देवीच्या गाभाऱ्याला हात लावायचा नाही. गाभाऱ्याला ऐतिहासिक, पौराणिक, श्रद्धेचा संबंध आहे. हजारो भक्तांची माथी तिथे टेकलेली आहेत. तो प्रत्येक दगड पुजनीय आहे, त्या पुजनीय दगडाला हात लावायचा नाही.” असही आव्हाड यांनी म्हटलं आहे.
प्रियकराला कर्जमुक्त करण्यासाठी प्रेयसीने चोरले आईचे दागिने; ११ तोळे दागिन्यांसह दीड लाख केले लंपास
याशिवाय त्यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. त्यातही त्यांनी मंदिरासंबंधीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “इतिहासाचा खून – तोही आपल्या डोळ्यांदेखत!” तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर — हजारो वर्षांची परंपरा, शेकडो वर्षांचा इतिहास, आणि लाखो लोकांचा विश्वास. पहिली रचना – अंदाजे आठव्या ते दहाव्या शतकात. त्या काळातील पायऱ्या आजही इतिहासाची साक्ष देत उभ्या आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांनी येथे येऊन तुळजाभवानीचे आशीर्वाद घेतले आणि रयतेच्या राज्याची पायाभरणी केली. अहिल्याबाई होळकरांनी मंदिर परिसरात विहीर बांधली, जी आजही अस्तित्वात आहे.
पण आता…
“विकास” या नावाखाली हाच वारसा पाडून टाकण्याचा प्रयोग सुरू आहे!
इतिहास मोडून टाकून मंदिर नवं होईल, पण त्या दगडात कोरलेल्या आठवणींचं काय होणार?
विकास म्हणजे वारसा संपवणं नाही!
छत्रपतींच्या पाऊलखुणा पुसणं हे प्रगती नव्हे – ती संस्कृतीवरची तोडफोड आहे!
आपल्या मुलांना इतिहास दाखवायचा की फक्त त्याचा फोटो?
उद्या कदाचित सांगावं लागेल –
“इथे कधी काळी तुळजाभवानीचं जुना मंदिर होतं… मग कुणीतरी त्याला ‘अपग्रेड’ केलं!”