Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weather Alert : सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट; महाबळेश्वर-जावळीत अवकाळी पावसाचा धुमाकूळ

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी महाबळेश्वर, पाचगणी आणि जावळी तालुक्यात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पावसाने हजेरी लावली.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 28, 2026 | 12:04 PM
mahabaleshwar jaoli unseasonal rain update march 2026 crop damage weather alert

mahabaleshwar jaoli unseasonal rain update march 2026 crop damage weather alert

Follow Us
Close
Follow Us:
  • महाबळेश्वर-जावळीला झोडपले
  • जनजीवन विस्कळीत, घरांचे नुकसान
  • बळीराजा चिंतेत

पांचगणी : महाबळेश्वर (Mahabaleshwar ) आणि जावळी तालुक्यात मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत परिसराला अक्षरशः हादरवून सोडले. सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह झालेल्या या पावसामुळे अनेक भागांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही ठिकाणी किरकोळ नुकसानही झाल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात मोठा बदल होत असून वातावरणात गारवा निर्माण होत आहे. विशेषतः महाबळेश्वर आणि जावळी तालुक्यातील कुडाळ, मेढा, करहर, पाचगणी, रुईघर, म्हसवे, सरताळे, सर्जापूर, बेलावडे, सोनगाव आणि आलेवाडी या परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. काही भागांत विजांचा कडकडाट इतका तीव्र होता की नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

हे देखील वाचा : Fruit Rate Drops: ग्राहकांसाठी दिलासा! ऐन उन्हाळ्यात रसदार फळांचे दर घसरले; टरबूज, पपई, द्राक्षांना मोठी मागणी

सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही गावांमध्ये घरांच्या पत्र्यांना फटका बसल्याच्या घटना घडल्या आहेत. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यामुळे घरांचे पत्रे उडून गेल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुमारे अर्धा तास सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. काही भागांत रस्ते जलमय झाल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागला. वाहतुकीचा वेग काही काळ मंदावला होता. दरम्यान, या पावसामुळे डोंगराळ भागात धुकेही वाढल्याने वाहनचालकांना विशेष दक्षता घ्यावी लागत असल्याचे दिसून आले.

या अवकाळी पावसाचा परिणाम शेतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या रब्बी हंगामातील ज्वारी आणि गहू ही पिके काढणीच्या टप्प्यात असून हातातोंडाशी आलेली सुगी या अवकाळी पावसामुळे धोक्यात येण्याची शक्यता आहे. ऊन-पाऊस या बदलत्या निसर्गचक्रामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी सतर्क झाले आहेत.

हे देखील वाचा : Mumbai News: प्रभादेवीतील ‘लक्ष्मी निवास’चे पाडकाम! वरळी-शिवडी उन्नत रोड, प्रभादेवीतील दुमजली पुलाच्या कामाला वेग येणार

दरम्यान, वाई परिसरातही पावसाने काही प्रमाणात हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिक आणि शेतकरी दोघांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या या अवकाळी पावसामुळे पुढील काही दिवस हवामान कसे राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: महाबळेश्वर आणि जावळीत पाऊस का पडत आहे?

    Ans: स्थानिक वातावरणातील बदलामुळे आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या आर्द्रतेमुळे मार्च अखेरीस हा अवकाळी पाऊस पडत आहे.

  • Que: या पावसाचा शेतीवर काय परिणाम होईल?

    Ans: रब्बी हंगामातील गहू, ज्वारी आणि स्ट्रॉबेरी पिकांचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.

  • Que: नागरिकांनी विजांच्या वेळी काय काळजी घ्यावी?

    Ans: विजांचा कडकडाट सुरू असताना इलेक्ट्रॉनिक उपकरणे बंद ठेवावीत आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा.

Web Title: Mahabaleshwar jaoli unseasonal rain update march 2026 crop damage weather alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:04 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Maharashtra Weather
  • weather news

संबंधित बातम्या

Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…
1

Mahabaleshwar ची थंडी उडाली दूर! अवकाळी पावसामुळे पर्यटकांची तारांबळ; वादळी वारे अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.