
IND vs NZ Seddon Park Pitch report
या तिसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यात टीम इंडिया मालिका जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. तर, किवी देखील घरच्या मैदानावर प्रतिष्ठा वाचवण्यासाठी भिडतील. परंतु हॅमिल्टन येथे खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सामन्यात कसा असेल, हवामानाचा अंदाज, जाणून घ्या.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी हॅमिल्टनमधील सेडन पार्क येथे खेळला जाणार आहे. याच मैदानावर दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकाही खेळवण्यात आली होती. दरम्यान, भारताचा पराभव झाला होता.
AccuWeather या हवामान अंदाजानुसार, मंगळवारी सकाळी हॅमिल्टनमध्ये पावसाची शक्यता आहे. पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास पाऊस सुरू होण्याचा अंदाज आहे. या काळात पावसाची शक्यता ७० टक्क्यांहून अधिक असून, दिवस जसजसा पुढे जाईल तसतशी ही शक्यता आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. दुपार आणि संध्याकाळच्या वेळी पावसाची शक्यता ८० टक्क्यांहून अधिक असू शकते. हे हवामान सायंकाळी ७ वाजेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. रात्री ९ वाजेनंतरही पावसाची शक्यता आहे.
न्यूझीलंडमधील स्थानिक वेळेनुसार तिसरा एकदिवसीय सामना दुपारी ३:०० वाजता सुरू होणार आहे. मात्र, याच सुमारास पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जर हवामानाचा अंदाज खरा ठरला, तर सामना वेळेवर सुरू होण्यास अडचण येऊ शकते. सततच्या पावसामुळे नाणेफेकीला विलंब होऊ शकतो आणि संभाव्यतः सामना रद्द करावा लागू शकतो.
मात्र, हवामानात अचानक बदल झाल्यास, सामना पुन्हा सुरू होण्याची आशा अजूनही आहे. जर तिसरा एकदिवसीय सामना पावसामुळे रद्द झाला, तरीही भारतीय संघ मालिकेत २-० ने आघाडीवर राहील. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्याच्या निकालाचा मालिकेवर कोणताही परिणाम होणार नाही आणि भारतीय संघ मालिका जिंकण्याची दाट शक्यता आहे.