Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 7 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; खरीप वाया गेला, रब्बी हंगाम धोक्यात

पाणी टंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 07, 2026 | 02:56 PM
माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई

माण तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई

Follow Us
Follow Us:
  • माण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट गडद
  • पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने मारली दडी
  • परतीच्या मान्सूननेही दिली हुलकावणी
दहिवडी : माण तालुक्यात पावसाळ्याच्या सुरूवातीपासूनच पावसाने दडी मारली होती. परतीच्या मान्सूनवर शेतकऱ्यांचे डोळे लागून राहिले होते. मात्र, मान्सूनच्या पावसानेसुद्धा पाठ फिरवल्यामुळे पाणी टंचाईचे संकट गडद होत चालले आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये भू-गर्भातील पाणीपातळी खालावली असून, नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सध्या तालुक्यातील विविध गावांना ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे चित्र आहे.

माण तालुका हा कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. दहिवडी, शिंगणापूर, म्हसवड, मार्डी, वरकुटे-मलवडी, वरकुटे कुकुडवाड परिसरासह तालुक्यातील अनेक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. यावर्षी तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. पावसाचे प्रमाण आणि पावसातील खंड यामुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे. सध्या तालुक्यातील आंधळी धरणात ४९ टक्के तर राणंद तलाव ०.२ टक्के, जाशी तलाव २.५३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

तलावासह विविध जलसाठ्यांमधील पाणीसाठा कमी होत असल्याने आगामी काळात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे. तलावांमध्ये पाणी असले तरी त्याचा वापर, उपलब्धसाठा आणि वाढती पाण्याची मागणी यांचा विचार करता प्रशासनासमोर पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याचे आव्हान आहे.

पाण्याबरोबर चारा टंचाईचेही संकट

पाणी टंचाईबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर होत चालला आहे. पावसाअभावी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता कमी झाल्यास पशुपालकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी आणि चारा या दोन्ही समस्यांवर प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे.

उरमोडी व जिहे कटापूर योजनेमुळे माणगंगा प्रवाहित

यावर्षी अत्यल्प प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने माणगंगा नदी नैसर्गिकरित्या प्रवाहित झाली नाही. नदी प्रवाहित करण्याच्या अनुशंघाने व पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिहे कटापूर योजनेचे पाणी आंधळी धरणातून माणगंगा नदीत सोडण्यात आले. उरमोडी योजनेचे कालव्याव्दारे येणारे पाणी लोधवडे, काळेवाडी, गोंदवले बुद्रुक, गोंदवले खुर्द,पिंपरी मार्गे माणगंगा नदीत सोडून नदी प्रवाहित करण्यात आली. परिणामी, माणगंगा नदीकाठच्या परिसरातील शेती सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला होता. सध्या माणगंगा नदीत सोडलेले पाणी आटण्याच्या मार्गावर आहे. नदीवरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सिमेंट साखळी बंधारे कोरडे पडू लागले आहेत.

FAQ

1. माण तालुक्यात पाणीटंचाईचे संकट का निर्माण झाले आहे?
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने दडी मारली. त्यानंतर परतीच्या मान्सूननेही अपेक्षित साथ न दिल्याने पाणीटंचाईचे संकट गंभीर झाले आहे.

2. माण तालुक्यात सध्या किती टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे?
तालुक्यातील विविध गावांना सध्या सुमारे ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

3. माण तालुक्यातील भू-गर्भातील पाणीपातळीची स्थिती काय आहे?
अनेक गावांमध्ये भू-गर्भातील पाणीपातळी खालावली असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Web Title: Severe water scarcity in man taluka nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2026 | 02:56 PM

Topics:  

  • Man Taluka
  • Satara News
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?
1

Satara News : कोल्हापुरात ऊसाला 4200 रुपये दर, पण साताऱ्यात कोंडी कायम! शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार?

Karanja: दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे; आमदार सई डहाके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
2

Karanja: दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे; आमदार सई डहाके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Buldhana: महागाईचा आणखी एक झटका! बुलढाण्यात आरओ पाण्याचे दर वाढले; पिण्याच्या पाण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार
3

Buldhana: महागाईचा आणखी एक झटका! बुलढाण्यात आरओ पाण्याचे दर वाढले; पिण्याच्या पाण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या
4

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.