Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raju Shetti : ऊसाला ४,२०० रुपये पहिली उचल द्या! राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा; महामार्गावर तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांचा ठिय्या

Raju Shetti : ऊस दराच्या मागणीसाठी राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. 4500 रुपयांच्या मागणीत बदल करत 4200 रुपयांची पहिली उचल देण्याची नवी मागणी करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 05, 2026 | 06:42 PM
raju shetti andolan sugar price

raju shetti andolan sugar price

Follow Us
Follow Us:
  • ऊस दर आंदोलनाचा तिसरा दिवस
  • पुणे-बेंगळुरू महामार्ग ठप्प
  • कारखानदारांना राजू शेट्टींचा थेट इशारा
 

राज्यात सध्या विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकर कोल्हापुरात गोकुळ दूधसंघाच्या चेअरमन निवडीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे ऊस दराच्या प्रश्नावरूनदेखील शेतकऱ्यांचा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. ऊस दराचा प्रश्न आता चांगलाच पेटल्याचं चित्र दिसत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या रास्ता रोको आंदोलनाचा आज (५ नोव्हेंबर) तिसरा दिवस आहे. (Raju Shetti)

कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाका आणि साताऱ्यातील नागठाणे येथे हजारो शेतकऱ्यांनी महामार्गावर ठिय्या मांडला आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा आक्रमक पवित्रा घेतला असून त्यामुळे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचा अक्षरशः खोळंबा झाला आहे.

४,५०० रुपयांवरून आता ४,२०० रुपयांची मागणी!

सुरुवातीला उसाला प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मिळावी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी होती. मात्र, साखर कारखानदार ३,८०० रुपयांच्या पुढे जायला तयार नसल्याने चर्चेची गाडी पुढे सरकत नव्हती.

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण

शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि चर्चेतून मार्ग निघावा, यासाठी राजू शेट्टी यांनी आता एक पाऊल मागे घेत ४,२०० रुपये पहिली उचल देण्याची नवी मागणी जाहीर केली आहे. आता कारखानदारांनीही अडेलतट्टू भूमिका सोडून शेतकऱ्यांना योग्य दर द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

चेअरमन आणि संचालकांच्या दारात शिमगा करणार!

किणी टोल नाक्यावरील सभेत राजू शेट्टी यांनी कारखानदारांना थेट इशारा दिला. ऊस शेतकऱ्यांच्या दारात उभा आहे, दिवाळी तोंडावर आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर साखर कारखान्यांच्या चेअरमन आणि संचालकांच्या घरासमोर शिमगा आंदोलन केलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

किणी ते नागठाणे महामार्गावर वाहनांच्या रांगा

आंदोलनामुळे किणी टोल नाका आणि नागठाणे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. साताऱ्यातून कोल्हापूरकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. अवजड वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी रात्र महामार्गावरच जागून काढली. विशेष म्हणजे गावोगावच्या महिलांनी पुढाकार घेत आंदोलकांसाठी भाकरी, भाजी आणि जेवणाची व्यवस्था केली आहे.

आता राजू शेट्टी यांनी 4200 रुपयांचा प्रस्ताव दिल्यानंतर कारखानदार काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तोडगा निघणार की आंदोलन आणखी चिघळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.णार आहे.

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात

💡

Frequently Asked Questions

  • Que: राजू शेट्टी यांनी ऊसाला पहिली उचल किती रुपयांची मागितली आहे?

    Ans: स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरुवातीला प्रतिटन 4500 रुपयांची मागणी केली होती. चर्चेसाठी एक पाऊल मागे घेत आता प्रतिटन 4200 रुपये पहिली उचल देण्याची नवी मागणी केली आहे.

  • Que: राजू शेट्टी यांचं ऊस दर आंदोलन कुठे सुरू आहे?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील किणी टोल नाका आणि सातारा जिल्ह्यातील नागठाणे येथे पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.

  • Que: राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना कोणता इशारा दिला आहे?

    Ans: ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय्य दर न मिळाल्यास साखर कारखान्यांचे चेअरमन आणि संचालक यांच्या घरासमोर शिमगा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

Web Title: Raju shetti sugarcane frp rasta roko pune bangalore highway vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Raju Shetti
  • Satara News
  • Sugarcane Farmers
  • Swabhimani Shetkari Sanghatana

संबंधित बातम्या

Kolhapur Golkul Politics : गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची एन्ट्री! सतेज पाटलांना फोन करत दिला पाठिंबा
1

Kolhapur Golkul Politics : गोकुळच्या सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंची एन्ट्री! सतेज पाटलांना फोन करत दिला पाठिंबा

Kolhapur News: महामार्ग रोकोन सुद्धा प्रश्न सुटेनात! शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सौरभ शेट्टीनी मांडली आक्रमक भूमिका
2

Kolhapur News: महामार्ग रोकोन सुद्धा प्रश्न सुटेनात! शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सौरभ शेट्टीनी मांडली आक्रमक भूमिका

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण
3

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण

Raju Shetti Protest: कारखानदारांच्या दारात करणार शिमगा! राजू शेट्टींनी दिला इशारा
4

Raju Shetti Protest: कारखानदारांच्या दारात करणार शिमगा! राजू शेट्टींनी दिला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.