Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाडिक-मंडलिक गट एकत्र; कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पेटणार संघर्ष

जिल्ह्यात कट्टर विरोधक महाडिक गट (Mahadik Group) आणि मंडलिक गट (Mandalik Group) एकत्र आला आहे. संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आपल्याशी चर्चा केली होती, अशी माहिती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2022 | 04:51 PM
महाडिक-मंडलिक गट एकत्र; कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय पेटणार संघर्ष
Follow Us
Close
Follow Us:
कोल्हापूर : जिल्ह्यात कट्टर विरोधक महाडिक गट (Mahadik Group) आणि मंडलिक गट (Mandalik Group) एकत्र आला आहे. संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना आपल्याशी चर्चा केली होती, अशी माहिती राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून भाजपसोबत घरोबा केल्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक समीकरण बदलली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कट्टर विरोधक महाडिक गट आणि मंडलिक गट एकत्र आला आहे. खासदार संजय मंडलिक यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना कट्टर विरोधक खासदार धनंजय महाडिक यांच्याशी चर्चा केली होती, अशी माहिती धनंजय महाडिक यांनी दिली आहे.
माजी मंत्री सतेज पाटील यांनी मंडलिकांना निवडून आणले त्यांनाही हा धक्का होता. मात्र, मंडलिकांनी व्यवस्थित फिल्डिंग लावून निर्णय घेतला होता. प्रवेश करण्याआधी त्यांनी देवेंद्र फडणवीस आपल्याशी  चर्चा केल्याची माहिती स्वतः धनंजय महाडिक यांनी दिली. यापुढच्या काळात मंडलिक गटाशी आघाडी होऊ शकते, असेही सूचक वक्तव्य त्यानी केले.
आमचं ठरलंय असं म्हणत राज्यात महाविकास आघाडी होण्याअगोदर कोल्हापूरमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले. या सगळ्या राजकारणामध्ये २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा मोठा पराभव झाला. त्यानंतर मंडलिक-महाडिक वाद गाजत होता. या दोन्ही शक्तीचा कोल्हापूरमध्ये मोठा प्रभाव आहे.
निवडणुकीनंतर धनंजय महाडिक यांनी भाजपशी घरोबा केला. त्यांना अनपेक्षितपणे राज्यसभेवर संधी मिळाली. त्यामुळे भाजप-शिंदे युतीपुढं कोल्हापूरचा लोकसभेचा उमेदवार कोण? हा प्रश्न निर्माण झाला होता. सुरवातीला उध्दव ठाकरे यांची बाजू घेणाऱ्या संजय मंडलिक यांनी ‘यू-टर्न’ घेत एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. तर आता जिल्ह्यातील राजकारणात हे दोन्ही गट एकत्र आल्याने आता राजकीय रंगत वाढणार आहे.

Web Title: Mahadik group and mandalik group together political clashesh in kolhapur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2022 | 04:51 PM

Topics:  

  • Dhananjay Mahadik
  • Eknath Shinde
  • kolhapur

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप
1

Maharashtra Politics: सरकार कोसळणार? काल मंत्र्यांचा बहिष्कार अन् शिंदे दिल्लीला रवाना; राजकारणात भूकंप

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?
2

Shivsena : आता काय असेल शिवसेनेची पुढची दिशा? की होणार राजकीय दुर्दशा?

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला
3

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश
4

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.