Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला

सत्तेसाठी लाचारी बाळगण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 19, 2025 | 04:46 PM
महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला

महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले, लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला

Follow Us
Follow Us:
  • महायुतीत एकनाथ शिंदे एकटे पडले
  • लाचारी पत्करण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा
  • काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सल्ला
बुलढाणा : महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, याच भितीपोटी नाराजी व निषेधनाट्य झाले आहे. ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासासाठी नाही तर केवळ सत्तेसाठी झालेली आहे. पण सत्तेसाठी लाचारी बाळगण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या प्रचाराची सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात प्रचाराला सुरुवात केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सत्तेच्या अनुषंगाने असलेल्या लाचारीपोटी हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. हे गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यामुळे त्यांच्यात टोळी युद्ध पहायला मिळत आहे. कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन सातारा जिल्ह्यातील दरे गावात शेतात जाऊन रुसुन बसतात तर कधी दुसरे उपमुख्यमंत्री गायब होतात. एकनाथ शिंदे यांना निषेध नोंदवायचाच असेल किंवा ते खरेच नाराज असतील आणि काही ठोस घडत नसेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. पण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कितीही त्रास दिला तरी तो मुकाट्याने सहन करावा लागणार आहे.

अजित पवारांची यशस्वी मांडवली

पुण्यातील भूखंड प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ‘मला वाचवा’ अशी विणवनी केली, दिल्लीत त्यांची मांडवली झाली आणि पार्थ पवारला क्लिन चिट मिळाली असे दिसते. तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यातही दिलजमाई झाली असावी. असे नसते तर ९९ टक्के भागिदारी असणाऱ्या पार्थ पवारला सोडून केवळ १ टक्के भागिदारी असलेल्या व काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसती. ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करुनही भाजपाने अजित पवार यांना सत्तेत घेतलेच, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

नगरपालिका प्रचाराला सुरुवात

राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली असून, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातून प्रचार सभांना सुरुवात केली. बुलढाणा, चिखली, मेहकर येथे त्यांनी प्रचार सभा घेत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. बुलढाण्यातील लढाई संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे. विकृतींच्या विरोधात लढताना सर्वांची मोट बांधली पाहिजे. शहरातील लोक पाठिशी आहेत त्यांना सभ्य व सुसंस्कृत बुलढाणा हवा आहे. गुंडगिरी, गांजा, अफिम, भ्रष्टाचारापासून जनतेला मुक्ती हवी आहे असे सपकाळ म्हणाले.

भ्रष्ट, ड्रग्ज माफिया, गुंडांना भाजपाची उमेदवारी

भारतीय जनता पक्षाने नगरपालिका निवडणुकीत ड्रग्ज माफिया, गुंड, भ्रष्टाचारी व ज्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत त्यांना उमेदवारी दिलेली आहे. गंभीर गुन्हे असलेल्या लोकांना पक्षात प्रवेश देऊन वॉशिंगमधून पवित्र केले जात आहे परंतु जनतेने मात्र भाजपाच्या या विकृत, गुन्हेगारी राजकारणाला धारा देऊ नये, असे आवाहनही हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

Web Title: Senior congress leader has given advice to shiv sena leader eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 04:46 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Eknath Shinde
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद
1

Shiv Sena Symbol Case: शिवसेना कुणाची? ‘आम्हीच मूळ शिवसेना’; शिंदे गटाचा दावा, विधिमंडळातील बहुमताचा निकष योग्य असल्याचा युक्तिवाद

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका
2

Eknath Shinde : ‘बाळासाहेबांचे विचार गोठवले, आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी,’ एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर खरमरीत टीका

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
3

Eknath Shinde : ‘शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही पण..,’ अमित ठाकरेंच्या कृतीवर एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट
4

Operation Tiger : ‘एजंटचा फोन आला तर रेकॉर्ड करा,’ ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान उद्धव ठाकरे अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.