Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live Breaking News in Marathi: पुण्यातील MPSC चे आंदोलन स्थगित; भीमनवार सक्तीच्या रजेवर

१२ ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. दिल्लीत 'इंडिया' आघाडीचा सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा, पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचे ११ दिवसांचे आंदोलन अखेर स्थगित, हवामान खात्याचा २४ राज्यांना पावसाचा इशारा आणि नवरात्रौत्सवाची धूम; वाचा सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 12, 2026 | 10:05 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 12.10.2026

Maharashtra Breaking News Today 12.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 12 Oct 2026 10:05 AM (IST)

    12 Oct 2026 10:05 AM (IST)

    Congress Leaders Delhi Protest:  ज्ञानेश कुमारांविरोधात दिल्लीत रणसंग्राम! महाराष्ट्रातून काँग्रेसचे १०० हून अधिक दिग्गज नेते दिल्लीत दाखल

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या 'इंडिया' आघाडीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून काँग्रेसचे जवळपास १०० मोठे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे प्रमुख नेते हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि बाळासाहेब थोरात यांचा विशेष समावेश आहे. ज्ञानेश कुमारांविरोधात काढण्यात येणाऱ्या या निदर्शनांमध्ये आक्रमक भूमिका घेण्यासाठी राज्यातील काँग्रेस नेते मोठ्या संख्येने राजधानीत पोहोचले आहेत.

  • 12 Oct 2026 09:55 AM (IST)

    12 Oct 2026 09:55 AM (IST)

    CJP Founder Abhijeet Dipke Statement: "आम्ही कोणत्याही हमीपत्रावर स्वाक्षरी केलेली नाही; सुटकेनंतर  अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा

    काल शिवाजी पार्क परिसरातील आंदोलनानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेत्यांची २४ तासांनंतर सुटका करण्यात आली आहे. त्यानंतर CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपला आक्रमक पवित्रा जाहीर करत थेट इशारा दिला आहे.CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आपण भविष्यात आंदोलन करणार नाही, अशा आशयाच्या कोणत्याही हमीपत्रावर किंवा बॉन्डवर स्वाक्षरी केली नसल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. पोलिसांनी ताब्यातून सुटका करताना आपण अशा कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नसल्याचे दीपके यांनी सांगितले.

  • 12 Oct 2026 09:47 AM (IST)

    12 Oct 2026 09:47 AM (IST)

    CVoter Survey Festival Spending: सणासुदीच्या काळात महागाईचा फटका! ५३.६% भारतीयांची आर्थिक स्थिती खालावली

     

    सणासुदीच्या दिवसांत बाजारपेठा सजल्या असल्या तरी वाढत्या महागाईमुळे आणि आर्थिक विवंचनेमुळे अनेक कुटुंबांच्या आनंदावर विरजण पडल्याचे चित्र आहे. नुकत्याच समोर आलेल्या 'सीव्होटर' (CVoter) च्या ताज्या सर्वेक्षणातून भारतीय कुटुंबांच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचा धक्कादायक खुलासा झाला आहे. देशातील ५३.६ टक्के भारतीयांनी गेल्या वर्षभरात आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिकच बिघडल्याची कबुली दिली आहे. आर्थिक अडचणींमुळे ३५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी यंदाच्या सणासुदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी खर्च करण्याची योजना आखली आहे. लोक आता महागड्या वस्तूंपेक्षा केवळ जीवनावश्यक वस्तू आणि स्थानिक बाजारांना प्राधान्य देत आहेत.

     

  • 12 Oct 2026 09:45 AM (IST)

    12 Oct 2026 09:45 AM (IST)

    Short English Keyword: Jio Fiber Freedom Pack Offer: जिओ फायबर आणि एअरफायबर युजर्सना तब्बल ४ महिने मोफत सेवा, 'फ्रीडम पॅक'ची घोषणा

    रिलायंस जिओने आपल्या ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक आणि फायदेशीर 'फ्रीडम पॅक' (Freedom Pack) आणला आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना थेट ४ महिन्यांची सेवा पूर्णपणे मोफत मिळणार आहे. जिओच्या या विशेष ऑफरची किंमत ८,८८८ रुपये ठेवण्यात आली असून, यामध्ये ग्राहकांना १२ महिन्यांऐवजी तब्बल १६ महिन्यांची (करीब ४८० दिवस) सेवा दिली जात आहे. या पॅकनुसार ग्राहकांना ४ महिन्यांची अतिरिक्त सेवा विनामूल्य मिळते, ज्यामुळे सवा वर्षाbहुन अधिक काळ वारंवार रिचार्ज करण्याच्या झंझटीपासून सुटका होते. या प्लॅनमध्ये ३० Mbps स्पीडने इंटरनेट डेटा, अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ८०० हून अधिक लाईव्ह टीव्ही चॅनेल आणि लोकप्रिय ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्म्सचे फ्री सबस्क्रिप्शन देखील समाविष्ट आहे.

     

  • 12 Oct 2026 09:36 AM (IST)

    12 Oct 2026 09:36 AM (IST)

    Dadar Shivaji Park Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दादर शिवाजी पार्कवर धडकले आंदोलन!

    मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काल दादर येथील शिवाजी पार्क परिसरात तीव्र आंदोलन पाहायला मिळाले. या आंदोलनात दोन्ही ज्युनियर ठाकरे बंधूंचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उतरले होते.

    आंदोलनादरम्यान पोलिसांसोबत आंदोलकांची बाचाबाची आणि झटापट झाली, त्यानंतर पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलकांना बळाचा वापर करून ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट आणि मनसेचे नेते व कार्यकर्ते आक्रमक झाले.

  • 12 Oct 2026 09:30 AM (IST)

    12 Oct 2026 09:30 AM (IST)

    MPSC विद्यार्थी सत्याग्रहाचा अखेर विजय; रोहित पवारांचे ट्विट

    #MPSC विद्यार्थी सत्याग्रहाचा अखेर विजय…!✌🏻🥳

    विजय एकजुटीचा, जिद्दीचा.. आणि चिकाटीचा…!

    #MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSC #विद्यार्थी_एकजूट #विजय_एकजुटीचा https://t.co/27N29WfeAM

    — Rohit Pawar (@RRPSpeaks) October 11, 2026

  • 12 Oct 2026 09:24 AM (IST)

    12 Oct 2026 09:24 AM (IST)

    IND vs WI 3rd T20: अभिषेक शर्माची तुफानी खेळी अन् वेस्ट इंडिज गारद!

    भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने शानदार कामगिरी करत निर्णायक आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा १४ धावांनी पराभव केला आहे.प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २२३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होतेया सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्माची बॅट जोरदार तळपली, ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. भारताच्या २२३ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित षटकांत ७ गडी गमावून २०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला.

  • 12 Oct 2026 09:15 AM (IST)

    12 Oct 2026 09:15 AM (IST)

    Nagpur Graduate Constituency नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची आज महत्त्वाची बैठक

    नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आवश्यक नियोजन व रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातून आज (१२ ऑक्टोबर) नागपुरात भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ पाच लोकसभा क्षेत्रांमध्ये विस्तारलेला असून, या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय निवडणुकीसाठी भाजपच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. आज दुपारी तीननंतर कोराडी येथील नैवेद्यम हॉलमध्ये या बैठकीला सुरुवात होईल. भाजपचे बंडखोर अनिल सोले यांचे बंड शमवण्यासाठी पक्षाचे अनेक नेते पडद्यामागून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न अजूनही करत आहेत.

     

  • 12 Oct 2026 09:05 AM (IST)

    12 Oct 2026 09:05 AM (IST)

    Pune MPSC Protest: पुण्यातील MPSCचे आंदोलन स्थगित, भीमनवार सक्तीच्या रजेवर

    आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागणीनुसार, एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर राहत सक्तीच्या/माजी रजेवर गेले आहेत. त्यांनी याबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली होती.

    पेपरफुटी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. राज्य सरकार आगामी ३ वर्षांत ७० हजार रिक्त पदांची भरती करणार असून, २०२७ मधील 'गट क' परीक्षेच्या पदांमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

     

Maharashtra to World Breaking News : 

 पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून  एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन शासन मध्यस्थीनंतर अखेर स्थगित करण्यात आले. तसेच, MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून तुकाराम मुंडे यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

मान्सूनचा हंगाम संपला असला तरी बहुतांश भागांत हवामानात अचानक बदल; हवामान खात्याकडून महाराष्ट्रासह २४ राज्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.  दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून ताब्यात घेतलेले CJP नेते अभिजीत दिपके, सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका करण्यात आली आहे.  शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील तुळजापूर, महालक्ष्मी आणि सप्तशृंगी देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी  झाल्याचे पाहायला मिळाले.

 .

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 12 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • maharashtra breaking news
  • national news

संबंधित बातम्या

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!
1

Delhi CJP Protest Live Updates:दिल्लीत आंदोलन तापणार! अभिजीत दिपकेंसह, सौरव दास आशुतोष रांकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं!

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा
2

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: मंगेश चिवटेंची पुणे शिक्षक मतदारसंघातून माघार

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?
4

Maharashtra Live Breaking News in Marathi: शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची आजची सुनावणी संपली, आता पुढील सुनावणी कधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.