
Abhijeet Dipke Detained Delhi, Dhruv Rathee Arrested Delhi Police,
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आणि एसआयआर (SIR) प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने (CJP) आज (१० ऑक्टोबर) पुकारलेल्या जंतरमंतरवरील महाआंदोलनामुळे दिल्लीत अभूतपूर्व तणाव निर्माण झाला आहे. प्रशासनाने परवानगी नाकारलेली असतानाही आंदोलनावर ठाम असलेल्या CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले आहे.
LIVE CJP Protest LIVE Updates: सीजेपी’चे अध्यक्ष अभिजीत दिपकेंना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं
या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेल्या सोशल मीडिय इन्फ्लूएन्जर ध्रृव राठी आणि सीजेपीच्या महिला नेत्या रत्ना सिंग यांनाही पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे. तर आज सकाळपासून तब्बल एक हजारहून अधिक आंदोलकांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. राजधानीच्या सर्व सीमांवर पोलीस तपासणी सुरू आहे. सरन्यायाधीशांच्या आंदोलनापूर्वी जंतर मंतरवर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील ४५ मेट्रो स्थानके बंद करण्यात आली असून, काही भागांमध्ये इंटरनेट सेवाही स्थगित करण्यात आली आहे. (CJP Protest)
🚨 ABHIJEET DIPKE, SAURAV DAS AND ASHUTOSH RANKA DETAINED FROM INSIDE THEIR FLIGHT 🚨 Shame on you @narendramodi @AmitShah https://t.co/hXl6bzh53i — Cockroach Janta Party – CJP (@Cockroachisback) October 10, 2026
सीजेपीच्या आंदोलनाच्या शक्यतेमुळे राजधानीमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी, दिल्ली पोलिसांनी सुरक्षेची कारणे आणि प्रक्रियात्मक आवश्यकतांचा हवाला देत आंदोलनाला परवानगी नाकारली होती. आंदोलकांना आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटकसत्र तीव्र केले असून मोक्याच्या ठिकाणी कर्मचारी तैनात केले आहेत. आतापर्यंत, पोलिसांनी नवी दिल्ली परिसरातील विविध ठिकाणांहून अंदाजे १५० आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.
कॉकरोच जनता पक्षाने (CJP) अटकेचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात दिल्ली पोलीस अधिकारी विमान उतरताच विमानात चढताना दिसत आहेत. अभिजीत दीपके म्हणाले की, “तुम्ही दिल्ली पोलिसांना विमानात चढताना पाहू शकता. आम्हाला विमानातून उतरू दिले जात नाहीये. ही हुकूमशाही आहे. या आणि आम्हाला अटक करा. आम्ही अटक करून घेण्यासाठी आलो आहोत.”
Panama Earthquake: जमीन हादरली, इमारती कोसळल्या! पनामामध्ये 7.6 तीव्रतेचा भूकंप,
यादरम्यान, ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. दीपकेंनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याला विचारले की, “तुम्ही विमानात कशा चढलात?” पोलीस अधिकारी उत्तर देते, “निदर्शनांना परवानगी नाही, “आम्ही विमानातून उतरल्यावर तुम्ही हे बोलू शकता.” सीजेपीने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एक सीजेपी नेता म्हणतो, “मेल पाठवा अधिकाऱ्यांनो. तुम्ही माझा फोन कसा घेऊ शकता? मी माझी बॅग घेईन. तुम्हाला जे करायचे आहे ते करा. तुम्हाला जे वापरायचे आहे ते वापरा, एनएसए, यूएपीए… आम्ही अटक करून घेण्यासाठी आलो आहोत.”
दिल्ली पोलिसांनी त्यांना नवी दिल्ली परिसरात प्रवेश करण्यास मनाई केली होती, परंतु सीजेपीचे पथक आपल्या भूमिकेवर ठाम होते. सीजेपीच्या प्रमुख नेत्यांपूर्वी, युट्युबर ध्रुव राठी यांच्यासह इतर नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.