Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 06.11.2026
Maharashtra to World Breaking News : तीव्र चक्रीवादळ ‘अर्नब’ (Cyclone Arnab) आज सकाळी आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकले असून दक्षिण भारत व महाराष्ट्रातील काही भागांत वाऱ्यासह पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेक शर्माने अवघ्या ३५ चेंडूंत शतक ठोकत भारताला मालिका विजय मिळवून दिला.
अभिनेता इम्रान खानला जारी करण्यात आलेल्या ‘लीव्ह इंडिया नोटीस’ला (Leave India Notice) मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने जागतिक स्तरावर ६०,००० कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छानिवृत्ती (Voluntary Exit Package) योजना जाहीर केली.
नांदेड जिल्हा प्रशासनाकडून ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील २०० गुणवंत विद्यार्थ्यांसाठी NEET, JEE आणि CET ची मोफत कोचिंग योजना जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एसआयआर (SIR) मतदार यादी पडताळणी प्रक्रियेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप तीव्र झाले असून कायदेशीर हालचालींना वेग आला आहे.
28 Oct 2026 02:59 PM (IST)
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत हर्षदा जाधव यांच्या विजयानंतर सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गुलालाची उधळण करत आणि फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
28 Oct 2026 02:50 PM (IST)
अनेकांची इच्छा होती की, नीतेश कराळे मास्तर निवडून आला पाहिजे. माझ्यामागे कोणतीही संघटना नाही. दोन राष्ट्रीय पक्षांची नाका-तोंडात पाणी जाईपर्यंत, मी जेरीस आणलं आणि त्यांना चांगलं घाम फोडला. मला 25000 मत मिळाली, या सर्व लोकांचे मी आभार मानतो. ज्या लोकांनी मला मत दिले त्यांना माझ्यावर विश्वास आहे आणि त्यांना सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो. मला मिळालेले पंचवीस हजार मतदान आहेत ते बिना पैशाचे मतदान आहे. मला मिळालेले पंचवीस हजार मतदान हे निर्णायक ठरणार आहेत.
28 Oct 2026 02:41 PM (IST)
नंदुरबार जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आणि धरणे आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातील सुमारे 450 ते 500 कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने आरोग्य विभागाच्या कामकाजावर परिणाम झाला असून, शासनाने मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला आहे.
28 Oct 2026 02:30 PM (IST)
मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्धच्या निदर्शनात सहभाग घेऊन परदेशी नागरिक कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता इम्रान खानला उच्च न्यायालयाने मंगळवारी अंतरिम दिलासा दिला. परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालयाने बजावलेल्या नोटिशीला पुढील सुनावणीपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली.
28 Oct 2026 02:21 PM (IST)
अहिल्यानगर जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बँका, पतसंस्था, फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या जाचक वसुली स्थगित करावी तसेच हॉस्पिटलच्या कामगारांच्या विविध प्रश्नासाठी जिल्हाधिकारी कार्यासमोर छावा संघटनेच्या वतीने प्रशासनाला जाग यावी यासाठी जागरण गोंधळ घालत निषेध करण्यात आला.
28 Oct 2026 02:10 PM (IST)
बेकायदा ऑनलाईन बेटिंग आणि अवैध आर्थिक व्यवहारांच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चित्रदुर्गचे आमदार के. सी. वीरेंद्र, गुलशन खट्टर आणि नेहा टंडन यांच्याशी संबंधित 23.35 कोटींच्या स्थावर व जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. ईडीने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये 13.76 कोटींच्या जंगम मालमत्ता आणि 9.58 कोटींच्या स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांचे एकूण मूल्य 343 कोटींवर पोहोचले आहे.
28 Oct 2026 02:00 PM (IST)
बहुप्रतिक्षित Jio Platforms च्या शेअर्सची बाजारात दणदणीत एन्ट्री झाली आहे. एन्ट्री झाल्यानंतर या शेअरने गुंतवणूकदारांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पण लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांसमोर सर्वात मोठा प्रश्न हा उभा राहतो की स्टॉक आणखी वाढणार की प्रॉफिट – बुकिंगची चिंता वाढेल. तर नेमकं करावं काय? आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म नोमुराने पहिल्यांदाच कंपनीवर कव्हरेज सुरू केले असून, ‘बाय’ रेटिंग दिले आहे आणि ₹१,३४० चे लक्ष्य मूल्य निश्चित केले आहे. पण हे लक्ष्य अंदाजे ₹१,३५८ च्या लिस्टिंग किमतीपेक्षा कमी आहे. त्यामुळे, सध्याच्या किमतीच्या आधारावर, ब्रोकरेजच्या मते अंदाजे १.३% घसरण होण्याची शक्यता आहे.
28 Oct 2026 01:55 PM (IST)
मराठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी त्यांच्या चित्रपट प्रवासाबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे. ‘या गोजिरवाण्या घरात’ या मालिकेमुळे त्या घराघरांत पोहोचल्या. मात्र, दूरचित्रवाणी मालिकांमध्ये व्यग्र असल्यामुळे त्यांना चित्रपटांमध्ये अपेक्षित संधी मिळाल्या नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, विभावरी यांनी मराठी चित्रपटासोबतच एका भोजपुरी सिनेमातही काम केलं आहे.
28 Oct 2026 01:50 PM (IST)
जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांना दिलासा देण्यासाठी धाराशिव जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजनांचे नियोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ७२९ गावांमध्ये पशुधनासाठी प्रत्येकी पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देणे, जनावरांची गणना व टॅगिंग, जलस्रोतांची दुरुस्ती आणि चारा उपलब्धतेसाठी उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे. संकटाच्या काळात जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर आणि पशुपालकांच्या पाठीशी जिल्हा परिषद खंबीरपणे उभी राहील, अशी ग्वाही जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
28 Oct 2026 01:45 PM (IST)
भीमाशंकर येथे खासगी प्रकल्पासाठी सुरू असलेली कथित बेसुमार वृक्षतोड तातडीने थांबवावी, अशी मागणी श्रीवर्धन येथील निसर्गप्रेमी मित्रमंडळाने केली आहे. या संदर्भात संस्थेच्या वतीने श्रीवर्धनचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच श्रीवर्धन तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशी भूमिका संस्थेने मांडली आहे.
28 Oct 2026 01:25 PM (IST)
बदलापूर-कटाई रस्त्यावरील हेदुटणे गावाजवळ MIDC च्या पाइपलाइनमधून टँकरद्वारे पाणी चोरी होत असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर MIDC प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत पाणी चोरीसाठी वापरण्यात येणारी पाइपलाइन तोडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, आता या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने MIDC मधील काही अधिकाऱ्यांच्या कथित सहभागाबाबत गंभीर आरोप केले आहेत.
28 Oct 2026 01:20 PM (IST)
नव्याने बांधण्यात आलेल्या धाराशिव बसस्थानकाच्या आवारात रसवंतीगृहासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आल्याने अतिक्रमण आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला स्वच्छतागृहालगत उभारलेल्या या शेडमुळे स्वच्छतागृहाचे वायुवीजन बाधित झाल्याचा आरोप असून, जवळच असलेल्या वर्दळीच्या फलाटामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, बसस्थानकाच्या आवारात जागा उपलब्ध असताना वर्दळीच्या ठिकाणीच हे शेड उभारण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे. या बांधकामाला अधिकृत मंजुरी आहे का, जागावाटपाचे नियम पाळले आहेत का आणि बसस्थानकाच्या मूळ आराखड्यात ब
28 Oct 2026 01:15 PM (IST)
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. वर्सोवा पुलापासून विरार हद्दीपर्यंत सुमारे १५ ते २० किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. मंगळवारी (27 ऑक्टोबर) रात्रीपासून सुरू झालेली वाहतूक कोंडी बुधवारी सकाळपर्यंत कायम राहिल्याने अनेक वाहनचालकांना तासन् तास महामार्गावर अडकून पडावे लागले.
28 Oct 2026 01:05 PM (IST)
दिवाळीचा सण उलटून जात असतानाही सानुग्रह अनुदान न मिळाल्याने चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानात कार्यरत आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयटकच्या नेतृत्वात शेकडो आशा वर्करनी मंगळवारी महानगरपालिका कार्यालयावर धडक देत ३१ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची मागणी केली. ‘बोनस आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडणाऱ्या आंदोलकांनी महापौर संगीता खांडेकर, उपमहापौर प्रशांत दानव, आयुक्त अकुनूरी नरेश आणि स्थायी समिती सभापती मनस्वी गिहें यांना मंगळवारी निवेदन सादर केले.
28 Oct 2026 12:15 PM (IST)
कतर्फी प्रेमातून महिलेला वारंवार त्रास देत अखेर तिच्या डोक्यात पाण्याचा लोखंडी वॉल मारून खून केल्याची धक्कादायक घटना भिंगारमधील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंचांच्या दालनात मंगळवारी (दि. २७) सकाळी घडली आहे. अनिता देविदास आळकुटे (वय ४२, रा. तागडकरवस्ती, वडारवाडी, भिंगार) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित संतोष नाना धोत्रे (रा. वडारवाडी) याच्याविरूद्ध भिंगार कॅम्प पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत मृत महिलेचा मुलगा योगेश देविदास आळकुटे (वय २६) यांनी फिर्याद दिली आहे. अनिता आळकुटे या मागील सुमारे २० वर्षांपासून वडारवाडी ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीवर संतोष धोत्रे काम करत असल्याने अनिता आणि त्याची ओळख होती.
28 Oct 2026 11:45 AM (IST)
इंफीनिक्सने भारतात त्यांचा आणखी एक नवीन गेमिंग स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Infinix GT 50 Pro या नावाने लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये प्रेशर-सेंसिटिव शोल्डर ट्रिगर्स आणि कंपनीचा ‘हाइड्रोफ्लो लिक्विड कूलिंग’ सिस्टिम देखील मिळणार आहे. कंपनीने लाँच केलेला हा स्मार्टफोन अनेक खास गेमिंग ॲक्सेसरीज देखील ऑफर करत आहे, ज्यामध्ये कंट्रोलर, गेमिंग डॉक आणि मॅग्नेटिक कूलिंग ॲक्सेसरी देखील मिळणार आहे.
28 Oct 2026 11:35 AM (IST)
टेकजायंट कंपनी ॲपलने अलीकडेच त्यांचा पहिला फोल्डेबल आयफोन लाँच केला होता. कंपनीचा हा आयफोन मॉडेल आयफोन डुओ या नावाने लाँच करण्यात आला होता. आयफोन डुओ हा कंपनीचा पहिला फोल्डेबल आयफोन असल्याने ग्राहक हे डिव्हाईस खरेदी करण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. खरं तर लाँचिंगपूर्वीच या डिव्हाईसची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. तसेच, लाँचिंगनंतर देखील या डिव्हाईससाठी एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. मात्र आता या डिव्हाईसबाबत सतत तक्रारी समोर येत आहेत. डिव्हाईसच्या स्क्रीनबद्दल यूजर्स सतत तक्रार करत आहेत.
28 Oct 2026 11:25 AM (IST)
राज्यातील शालेय पुस्तकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्याचे पाठ्यपुस्तक मंडळ ‘बालभारती’कडून याच शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वीची इतिहास, भूगोल आणि विज्ञानाची नवीन पाठ्यपुस्तके सादर करण्यात आली आहेत. या नवीन पुस्तकांमध्ये प्राचीन भारतीय ज्ञानग्रंथ, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विद्वानांना प्रमुखतेने स्थान देण्यात आले आहे. तसेच इतिहासाच्या काही सामाजिक आणि राजकीय घटकांच्या मांडणीत बदल करण्यात आले आहेत. एनसीईआरटीच्या (NCERT) धर्तीवर केलेल्या या बदलांतर्गत पुस्तकांमध्ये प्रामुख्याने तीन दिशांवर आणि इतिहासाच्या काही भागांमधील बदलांवर काम करण्यात आले आहे.
28 Oct 2026 11:15 AM (IST)
पुणे शहरातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि पंचतारांकित (फाईव्ह स्टार) हॉटेलमधून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एजंटांमार्फत परराज्यांतील तरुणींना आणून चालविल्या जाणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात बनावट ग्राहकाच्या मदतीने हा छापा टाकण्यात आला असून, समोर आलेले दृश्य पाहून पोलीस अधिकारीही अवाक झाले.
28 Oct 2026 11:08 AM (IST)
दरवर्षी 28 ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दिष्ट अॅनिमेशन या कलेचे महत्त्व ओळखणे आणि त्यातील सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणे आहे. 1892 मध्ये एमिल रेनॉड यांनी पहिल्यांदा पब्लिक अॅनिमेशन शो सादर केला होता, ज्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस पाळला जातो.
28 Oct 2026 10:50 AM (IST)
मराठी लोकपरंपरा, ग्रामीण महाराष्ट्रातील सांस्कृतिक वातावरण आणि रहस्य-रोमांचाचा अनोखा संगम असलेल्या ‘गोंधळ’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक संतोष दावखर यांच्या या चित्रपटाची ऑस्कर २०२७ साठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्याचा दावा करण्यात आला आहे. हा चित्रपट १२ नोव्हेंबर २०२६ रोजी जगभरात सात भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
28 Oct 2026 10:40 AM (IST)
आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम केवळ छोट्या स्क्रीनपुरते मर्यादित राहिलेले नाही. कारण आता मेटाने त्यांचे लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम Apple TV वर देखील उपलब्ध केले आहे. त्यामुळे आता यूजर्सना मोठ्या स्क्रीनवर देखील रिल्स पाहण्याचा आनंद मिळणार आहे. आता यूजर्स टिव्हीवर रिल्ससोबत इतर व्हिडीओ आणि लाईव्ह शो देखील पाहू शकणार आहेत. कंपनीने इंस्टाग्रामचा व्हिडीओ अनुभव स्मार्टफोनच्या पलीकडे जाऊन लिविंग रुमपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे मित्र आणि कुटूंब एकत्र येऊन इंस्टाग्रामवरील कंटेट पाहण्याचा अनुभव घेऊ शकतात.
28 Oct 2026 10:30 AM (IST)
एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई वन स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ कार्यान्वित केले असून या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे ॲप कार्यान्वित झाल्यापासून एका वर्षात यावरून १ कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटांची खरेदी झाली असून त्यातून ३२ कोटी रुपये महसूल मिळाला. या ॲपवरून मेट्रो, बेस्ट, रेल्वेसह ११ सेवांतील तिकीट उपलब्ध आहे. आता लवकरच टॅक्सी, रिक्षा, शेअर रिक्षा, बाइक टॅक्सीचे भाडेही या ॲपवरून अदा करता येणार असल्याची घोषणा एमएमआरडीएकडून करण्यात आली. सहा महिन्यांत ही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
28 Oct 2026 10:20 AM (IST)
पुणे शहरातील एका अत्यंत प्रतिष्ठित आणि पंचतारांकित (फाईव्ह स्टार) हॉटेलमधून एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. बंडगार्डन रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये एजंटांमार्फत परराज्यांतील तरुणींना आणून चालविल्या जाणाऱ्या हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात बनावट ग्राहकाच्या मदतीने हा छापा टाकण्यात आला असून, समोर आलेले दृश्य पाहून पोलीस अधिकारीही अवाक झाले.
28 Oct 2026 10:10 AM (IST)
राज्यातील शालेय पुस्तकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्याचे पाठ्यपुस्तक मंडळ ‘बालभारती’कडून याच शैक्षणिक सत्रापासून इयत्ता ६ वीची इतिहास, भूगोल आणि विज्ञानाची नवीन पाठ्यपुस्तके सादर करण्यात आली आहेत. या नवीन पुस्तकांमध्ये प्राचीन भारतीय ज्ञानग्रंथ, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक विद्वानांना प्रमुखतेने स्थान देण्यात आले आहे. तसेच इतिहासाच्या काही सामाजिक आणि राजकीय घटकांच्या मांडणीत बदल करण्यात आले आहेत. एनसीईआरटीच्या (NCERT) धर्तीवर केलेल्या या बदलांतर्गत पुस्तकांमध्ये प्रामुख्याने तीन दिशांवर आणि इतिहासाच्या काही भागांमधील बदलांवर काम करण्यात आले आहे.
28 Oct 2026 10:08 AM (IST)
Sambhajinagar MLC Result: विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान एक अजब आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुण्यात मतमोजणीदरम्यान वादग्रस्त चिठ्ठी सापडल्यानंतर, आता छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीतही अनेक अजब चिठ्ठ्या पेटीतून बाहेर आल्याने अधिकाऱ्यांसह राजकीय नेतेही अवाक झाले आहेत.
सुशिक्षित पदवीधरांनी केवळ उमेदवारांबद्दलच नव्हे, तर सध्याच्या राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेबद्दल असणारा तीव्र असंतोष या चिठ्ठ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला आहे. काही मतपत्रिकांसोबत जोडलेल्या चिठ्ठ्यांमध्ये थेट अद्वातद्वा शब्द आणि शिव्यांचा वापर करण्यात आला आहे, तर काहींमध्ये राजकीय नेत्यांच्या वृत्तीवर अत्यंत भडक भाषेत ताशेरे ओढले गेले आहेत.
28 Oct 2026 09:58 AM (IST)
विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात अत्यंत चुरशीची आणि उत्कंठावर्धक लढत पाहायला मिळत आहे. मतमोजणीत दुसऱ्या पसंतीची मते मोजली जात असून भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे यांनी ४,२८० मतांची आघाडी कायम ठेवली आहे.पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते मिळून भाजपच्या सुधाकर कोहळे यांना ६०,९४५ मते, तर काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांना ५६,६६५ मते मिळाली आहेत. मोजणीच्या बाद फेरीत आतापर्यंत तळाशी असलेले १६ उमेदवार बाद करण्यात आले आहेत.
28 Oct 2026 09:48 AM (IST)
Asian Champions Trophy: भारतीय हॉकी संघाने (Indian Hockey Team) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ ची सुरुवात अत्यंत दणक्यात केली आहे. जालंधर येथील ऑलिम्पियन सुरजित सिंग हॉकी स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या पहिल्याच सामन्यात यजमान भारताने बांगलादेशचा १३-० असा एकतर्फी पराभव करत ऐतिहासिक विजय नोंदवला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल नोंदवत भारताचे खाते उघडले आणि संघाला सुरुवातीपासूनच मजबूत आघाडी मिळवून दिली.
28 Oct 2026 09:42 AM (IST)
विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघात मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांचा दारुण पराभव झाला असून, दुसऱ्या पसंतीच्या मतांच्या मोजणीत ते बाद झाले आहेत. या धक्कादायक निकालानंतर भाजपपुरस्कृत कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे.दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत काँग्रेसचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर यांना केवळ ८,९६५ मते मिळाली, ज्यामुळे ते शर्यतीतून बाहेर पडले. भाजपपुरस्कृत उमेदवार कौस्तुभ गावडे यांनी १८,३८५ मतांसह आपली भक्कम आघाडी कायम ठेवली असून त्यांचा विजय आता केवळ औपचारिक उरला आहे.
28 Oct 2026 09:38 AM (IST)
Pune MLC Election Result: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मंगळवारी (२७ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजेपासून सुरू झालेली मतमोजणी २४ तास उलटूनही सुरूच आहे. पसंतीक्रमाची क्लिष्ट मतमोजणी प्रक्रिया, बाद फेरीची मते (Elimination Process) आणि बाद झालेल्या मतांची मोठी संख्या यामुळे निकालाला प्रचंड विलंब होत आहे. महाविकास आघाडीच्या (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) हर्षदा देशमुख-जाधव या १,१२,३७७ मतांसह मोठ्या आघाडीवर असून विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
28 Oct 2026 09:26 AM (IST)
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अर्णव’ (Cyclone Arnab) चक्रीवादळामुळे देशाच्या किनारपट्टी भागांत मोठी खळबळ उडाली आहे. हे चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याच्या दिशेने सरकत असून ते आणखी तीव्र होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.
बुधवारी दुपारनंतर हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची (Landfall) शक्यता आहे. या काळात ताशी ११० ते १४० किलोमीटर वेगाने चक्री वादळी वारे वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आंध्र प्रदेश आणि आसपासच्या किनारपट्टीच्या भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा (Red Alert) देण्यात आला आहे.
28 Oct 2026 09:20 AM (IST)
नवी दिल्ली : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त (सीईसी) ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीला आणि त्यांनी घेतलेल्या एकतर्फी निर्णयांना आव्हान देणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांच्या याचिकांवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने कठोर भूमिका घेतली. मंगळवारी सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या संपूर्ण प्रकरणाची आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेची तपासणी करण्यात येईल, असे स्पष्ट केले. सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी झाली.






