फोटो सौजन्य- gemini
एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ‘मुंबई वन स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १ ॲप’ कार्यान्वित केले असून या सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे ॲप कार्यान्वित झाल्यापासून एका वर्षात यावरून १ कोटी ३२ लाखांहून अधिक तिकिटांची खरेदी झाली असून त्यातून ३२ कोटी रुपये महसूल मिळाला. या ॲपवरून मेट्रो, बेस्ट, रेल्वेसह ११ सेवांतील तिकीट उपलब्ध आहे. आता लवकरच टॅक्सी, रिक्षा, शेअर रिक्षा, बाइक टॅक्सीचे भाडेही या ॲपवरून अदा करता येणार असल्याची घोषणा एमएमआरडीएकडून करण्यात आली. सहा महिन्यांत ही सेवा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
एमएमआरमध्ये प्रवासासाठी नागरिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पर्याय म्हणून उपनगरीय रेल्वे, बेस्ट, एसटी, मोनो, मेट्रोचा वापर करतात. या वाहतूक व्यवस्थांचा वापर करताना प्रवाशांना प्रत्येक प्रवासासाठी वेगवेगळी तिकिटे खरेदी करावी लागतात. यात प्रवाशांचा वेळ जातो आणि त्यांना त्रासही होतो. ही बाब लक्षात घेऊन वेगवेगळी तिकिटे खरेदी करण्याच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या कार्डची संपूर्ण जबाबदारी एमएमआरडीएवर सोपविण्यात आली होती.
मुंबईतील रिक्षा, टैंटैक्सी, शेअर रिक्षा आणि बाइक टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांना टॅक्सी, रिक्षा, शेअर रिक्षा आणि बाइक टॅक्सीचे आरक्षण या अॅपवरून लवकरच करता येणार आहे. भाडे आकारणीही करता येणार आहे. यासाठी अॅपमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे काम सुरू आहे. येत्या सहा महिन्यांत ही सेवा सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
ही सेवा ८ ऑक्टोबर २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली. हे ॲप मुंबईतील सहा मेट्रो मार्गिका, नवी मुंबई मेट्रो मार्गिका उपनगरीय रेल्वे, बेस्ट बससह नवी मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका, मिरा भाईंदर महापालिकेच्या बस सेवासह ११ सेवांसाठी सध्या वापरात आहे. तर लवकरच विमानाचे तिकीटही काढण्याची सोय यावर उपलब्ध करण्यात येणार आहे.
एमएमआरडीएने आता ‘मुबई वन’ ॲपशी मुंबईतील रिक्षा, टॅक्सी, शेअर रिक्षा, बाईक टॅक्सी सेवाही जोडण्याचा निर्णय घेतला आहे. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यासंबंधीची घोषणा केली.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)
Ans: मुंबई वन ॲप हे मुंबई महानगर प्रदेशातील विविध सार्वजनिक वाहतूक सेवांची तिकिटे एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारे ॲप आहे. हे ॲप मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केले आहे.
Ans: सध्या या ॲपवरून मुंबईतील मेट्रो मार्गिका, उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस आणि इतर संबंधित महापालिकांच्या बस सेवांसह ११ वाहतूक सेवांची तिकिटे उपलब्ध आहेत.
Ans: एमएमआरडीएच्या नियोजनानुसार, येत्या सहा महिन्यांत ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यासाठी अॅपमध्ये आवश्यक बदल करण्याचे काम सुरू आहे.






