Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 07.11.2026
Maharashtra to World Breaking News :
MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सहायक कक्ष अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ सक्रिय झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्रात परतीच्या पावसाचा मोठा इशारा जारी केला आहे.
महायुतीत वादाची ठिणगी पडली असून एका ऑडिओ क्लिपवरून आमदार प्रसाद लाड यांनी नेते रामदास कदम यांच्यावर जोरदार टीका केली. भारतीय महिला क्रिकेट संघाने प्रतिका रावलच्या शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेचा ९ गडी राखून दणदणीत पराभव केला.
पुणे जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला असून ५ नोव्हेंबरपासून सुट्ट्या सुरू होण्याचे नवे परिपत्रक जारी करण्यात आला आहे. मुंबईत अमिताभ बच्चन, दिलजीत दोसांझ आणि दादरमधील शाळांना मिळालेल्या बॉम्बहल्ल्याच्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.
24 Oct 2026 05:45 PM (IST)
डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या निर्णयांसाठी जगभर विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांनी लावलेला टॅरिफ तर देशांसाठी विशेष डोकेदुखी ठरला आहे. आताही त्याच संदर्भतील बातमी समोर येत आहे. अमेरिका कॅनडा यांच्यातील तणाव सद्या बराच चर्चेत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही कॅनेडियन उत्पादनांवर लादलेले जड आयात शुल्क शिथिल करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
24 Oct 2026 05:30 PM (IST)
भाईंदर : नालासोपारा येथील एमडी ड्रग्ज तस्करी प्रकरणाचा तपास करताना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष-४ ने तेलंगणातील पाशमैलाराम, पटनचेरू परिसरात मोठी कारवाई केली आहे. एमडी ड्रग्ज निर्मितीसाठी लागणारी नियंत्रित रासायनिक पावडर तयार करणारा अवैध कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून, या कारवाईत ४४ किलो ६९९ ग्रॅम रासायनिक पावडर, अन्य केमिकल आणि प्रयोगशाळेतील साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण २५ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
24 Oct 2026 05:25 PM (IST)
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) ज्युनियर इंजिनिअर (JE) परीक्षा २०२६ च्या पेपर १ साठी एक्झाम सिटी स्लिप (परीक्षेचे शहर दर्शवणारी स्लिप) जारी केली आहे. ज्या उमेदवारांनी या भरती परीक्षेसाठी अर्ज केला आहे, ते आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर ssc.gov.in लॉगिन करून आपल्या परीक्षा शहराची माहिती तपासू शकतात. SSC JE पेपर १ ची परीक्षा २ ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित केली जाईल.
24 Oct 2026 05:16 PM (IST)
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज खेळला गेला. हा सामना क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर पार पडला. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. ग्लेन फिलिप्स आणि बेव्हॉनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने २० षटकांत ५ विकेट्स गमावून १८० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९.५ षटकांत लक्ष्य गाठले. तिलक वर्मा आणि नमन धीरच्या शानदार खेळीमुळे भारताने हा सामना जिंकला.
24 Oct 2026 04:57 PM (IST)
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची माणसे माझ्यावर हल्ल्याच्या तयारीत आहेत. माझ्या घरावर केव्हाही हल्ला होऊ शकतो, मला मारून टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे. सरकारने माझी सुरक्षा काढून घेतली. दसरा मेळाव्याला पोलिसांनी मला शेवटपर्यंत सुरक्षा दिली नाही. असा आरोपमराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. वाचा सविस्तर...
24 Oct 2026 04:47 PM (IST)
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन २६ ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम आंध्र प्रदेश, ओडिशा आणि पूर्व भारतातील काही भागांवर होऊ शकतो. तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटकातील काही भागांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घ्या चक्रीवादळाची सद्यस्थिती, कोणत्या भागांत पावसाची शक्यता आहे आणि हवामान विभागाने काय सूचना दिल्या आहेत. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम आंध्र प्रदेश आणि ओडिशासह अनेक राज्यांवर होईल. वाचा सविस्तर...
24 Oct 2026 04:37 PM (IST)
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरी आणि एसआयआरमधील मनमानी निर्णयांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. काँग्रेससह विरोधी इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांकडून महायुती सरकारवर सातत्याने हल्लाबोल करताना दिसत आहे. असे असतानाच भाजप सरकारकडूनही प्रतिहल्ले होताना दिसत आहे. केंद्रातील वातावरण तापले असतानाच गुजरातचे माजू मु्ख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांच्यासह माजी मुख्यमंत्री काँग्रेसमध्ये परतण्याच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वाचा सविस्तर...
24 Oct 2026 04:27 PM (IST)
दक्षिण-पूर्व आशियातील फिलीपिन्स (Philippines Plane Crash) देशातून एक अतिशय हृदयद्रावक आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. फिलीपिन्सच्या बटांगस प्रांतात (Batangas Province) सैन्याच्या नियमित प्रशिक्षण उड्डाणादरम्यान हवाई दलाची दोन विमाने एकमेकांवर आदळली. या भीषण अपघातात विमानातील चारही धाडसी वैमानिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना घडताच लष्करी वर्तुळात आणि संपूर्ण देशात प्रचंड शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर...
24 Oct 2026 04:17 PM (IST)
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राजकीय पक्ष जागावाटपाच्या चर्चेत अधिक गुंतले आहेत. वृत्तानुसार, समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे. समाजवादी पक्षासोबत युती करून २०० हून अधिक जागांवर निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा मानस आहे. सूत्रांनुसार, काँग्रेसने समाजवादी पक्षाला २०० हून अधिक जागांची यादी सादर केली असून, त्यावर आपला दावा सांगितला आहे. वाचा सविस्तर...
24 Oct 2026 04:08 PM (IST)
अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर आता मुंबईसारख्या शहरांमध्येही सुरक्षेचा प्रश्न उदभवू लागला असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड कलाकार आणि राजकीय हस्तींवर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना मुंबईत घडल्या आहेत. यावरूनच आता विरोधकांनी राज्य सरकारला घेरलं असून पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार नेमकं करताय तरी काय? असा संतप्त सवाल उपस्थित करत आहेत. वाचा सविस्तर...
24 Oct 2026 03:59 PM (IST)
राज्यातल्या दुष्काळाची तीव्रता वाढलीदुष्काळ निवारणासाठी तब्बल 40 हजार कोटींची गरजदुष्काळी तालुक्यांची संख्या वाढल्याने अनेक विभागांचे प्रस्ताव रखडले..
24 Oct 2026 03:50 PM (IST)
ऊस दराच्या तोडग्यासाठी कोल्हापुरात बैठक सुरू
शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि कारखानदारांची बैठक
पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक
24 Oct 2026 03:40 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रामदास कदमांना फोनकदमांना माध्यमांसोबत संवाद न साधण्याच्या शिंदेंच्या सूचनामहायुतीत तिढा नको म्हणून काळजी घेण्याच्या शिंदेंच्या सूचनाभाजप नेत्यांकडून रामदास कदम यांची शिंदेंकडे तक्रार रामदास कदम यांच्या आरोपानंतर भाजपमध्ये तीव्र नाराजी
24 Oct 2026 03:30 PM (IST)
500 कोटींबाबत मी पण सध्या शोध घेतोय- श्रीकांत शिंदेजरांगेंना पडलेला प्रश्न मलाही पडलाय- श्रीकांत शिंदे500 कोटींच्या आरोपांनंतर श्रीकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
24 Oct 2026 03:20 PM (IST)
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भानुदास केतकर यांचे निधन झाल्याची दुखःद घटना घडल्याची बातमी समोर आली आहे.
24 Oct 2026 03:10 PM (IST)
Diwali Car Offers: भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होताच, लोक गाड्या खरेदी करण्यास सुरुवात करतात, विशेषतः धनतेरस आणि दिवाळीच्या काळात, जेव्हा लोक आपल्या कुटुंबासाठी कार खरेदी करण्यापूर्वी मायलेज, फीचर्स, सुरक्षा आणि इंजिन यांसारख्या प्रत्येक तपशिलाचा काळजीपूर्वक विचार करतात. आजही, भारतीय घरांमध्ये कार खरेदी करताना, प्रत्येकजण दोन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात, जसे की मायलेज आणि सुरक्षा वैशिष्ट्ये. यासाठी, आम्ही तुम्हाला एका मारुती सेडानबद्दल सांगणार आहोत, जी सीएनजीवर ३० किमी प्रति तासापेक्षा जास्त मायलेज देते आणि ५-स्टार रेटिंगसह येते.
24 Oct 2026 03:01 PM (IST)
Bank Of India Q2 Financial Results : बँक ऑफ इंडियाने ३० सप्टेंबर २०२६ रोजी संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांची आर्थिक कामगिरी जाहीर केली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा २५.३४ टक्क्यांनी वाढून ३,२०२ कोटी रुपयांवर झेपावला आहे. तसेच, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत निव्वळ नफा ३० टक्क्यांनी वाढून ६,२७० कोटी रुपयांवर गेला आहे. दुसऱ्या तिमाहीत मालमत्तांवरील परतावा आणि भागधारकांच्या भांडवलावरील परतावा या दोन्हीत सुधारणा झाली आहे आणि तो अनुक्रमे १.०१ टक्के आणि १६.३६ टक्के झाला आहे. नेमके काय सांगतात आकडे ? जाणून घेऊयात ( Bank Of India Q2 Financial Results )
24 Oct 2026 02:59 PM (IST)
तांदुळवाडी शिवारात दोन ट्रॉली भूस जळून खाक झाल्याची घटना घडली. शेतकरी विजय बाजीराव काकळीज यांच्या भुशाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीने भुशाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून, आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
24 Oct 2026 02:50 PM (IST)
दिवा रेल्वे स्थानकातील महिला प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन महिलांना ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून दोघींना रंगेहाथ पकडले. मेघिता आरव काळे (वय २२) आणि अनु बबन काळे (वय ३५, दोघी रा. येरवडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण ७ लाख ५५ हजार रुपये किमतीची पाच सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत.
24 Oct 2026 02:41 PM (IST)
अहिल्यानगरमधील पाथर्डी येथील वसतीगृहात सातवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून गळफास घेत जीवन संपवले. बीडच्या गेवराई तालुक्यातील कवडगावचा हा मुलगा होता. वस्तीगृहातील शिक्षक सुभाष घुगे गेल्या तीन महिन्यांपासून त्याला विनाकारण मारहाण आणि मानसिक त्रास देत असल्याचा कुटुंबीयांचा गंभीर आरोप आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
24 Oct 2026 02:30 PM (IST)
उत्तर प्रदेशातील गाझीपूर लोकसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे खासदार अफजाल अंसारी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लखनऊ येथील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गाझीपूर येथून रुग्णवाहिकेने त्यांना लखनऊला आणण्यात आले. सध्या डॉक्टरांच्या विशेष पथकाच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
24 Oct 2026 02:20 PM (IST)
सणासुदीच्या काळात सरकारने दरवाढीचा झटका दिला आहे. सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली असून पाच रुपयाने सीएनजी महागला आहे.
24 Oct 2026 02:11 PM (IST)
एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. १ नोव्हेंबरच्या काँग्रेस दिल्लीत रॅली काढणार आहे. या रॅलीसाठी राज्यभरातून ३ हजारपेक्षा जास्त काँग्रेस नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी दिल्लीत दाखल होणार आहेत.
24 Oct 2026 02:00 PM (IST)
अलाहाबाद-झांसी मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीच्या मतदारयादीतून भाजप खासदार अनुराग शर्मा यांचे नावही गायब आहे. खासदारांनी मतदार नोंदणी अर्ज दाखल केला होता, परंतु त्यांचे नाव समाविष्ट केले जाऊ शकले नाही. यादीतून खासदारांचे नाव गायब झाल्याच्या घटनेवर समाजवादी पक्षाचे माजी खासदार चंद्रपाल सिंह यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रपाल सिंह यादव म्हणाले, जर खासदारांचेच नाव गायब असेल, तर कल्पना करा की, आणखी किती जणांची नावे वगळली गेली असतील. मतदारयादी अपूर्ण आहे. यावर निवडणूक आयोगाने अत्यंत जुजबी स्पष्टीकरण दिले आहे.
24 Oct 2026 01:55 PM (IST)
आळेफाटा परिसरातील कांदा उत्पादक शेतकरी नव्या हंगामाच्या तयारीला लागले असले, तरी वाढता उत्पादन खर्च आणि पाण्याची टंचाई यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पिंपरी पेंढार, खामुंडी, नवलेवाडी, वडगांव आनंद, पिंपळ वडी परिसरात कांदा लागवडीच्या कामांना वेग आला आहे. मात्र, लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च एकरी ९० ते ९५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याने कांदा उत्पादनाचा खर्च आता लाखाच्या उंबरठ्यावर आला आहे.
24 Oct 2026 01:50 PM (IST)
आयसीसीने महिला टी-२० विश्वचषक २०२८ स्पर्धेची घोषणा केली आहे. ही स्पर्धा ७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केला जाईल. पाकिस्तान या स्पर्धेचा मुख्य यजमान देश असेल. परंतु, भारताच्या सामन्यांच्या ठिकाणाबाबतचा अंतिम निर्णय अद्याप प्रलंबित आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला भारताचे सामने वगळता सर्व सामने आपल्या देशात आयोजित करायचे आहेत, तर दुसरीकडे भारतीय संघाचे सर्व सामने तटस्थ ठिकाणी होण्याची शक्यता आहे.
24 Oct 2026 01:45 PM (IST)
मध्य पूर्वेतील (Middle East) वाढता लष्करी तणाव आणि सौदी अरेबियातील (Saudi Arabia) पायाभूत सुविधांवर होणाऱ्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपनी ‘आकाशा एअर’ने (Akasa Air) अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सौदी अरेबियातील बिघडत चाललेल्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर, कंपनीने जेद्दाह आणि रियाध शहरांसाठीची आपली सर्व उड्डाणे स्थगित करण्याचा कालावधी आणखी वाढवला आहे. कंपनीने जाहीर केलेल्या नवीन ट्रॅव्हल अपडेटनुसार, जेद्दाहहून ये-जा करणारी उड्डाणे १० नोव्हेंबरपर्यंत, तर रियाध शहरासाठीची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
24 Oct 2026 01:35 PM (IST)
अहिल्यानगरच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात अनेक दशके आपला प्रभाव राखणारे ज्येष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर (वय 74) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सकाळी अचानक प्रकृती बिघडल्याने व हृदयविकाराचा त्रास जाणवल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान उपचारापूर्वीच किंवा उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळातील एका अत्यंत प्रभावी आणि चर्चित पर्वाचा अंत झाला आहे.
24 Oct 2026 01:25 PM (IST)
राष्ट्रसेवेची तळमळ असलेल्या तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्य मंत्रिमंडळाने सरकारी सेवेत अग्निवीरांना आरक्षण देण्याचे दिलेले आश्वासन आता अंमलात आले आहे. आवश्यक नियम आणि धोरणात्मक बदल पूर्ण केल्यानंतर, सरकारने राज्यातील रहिवासी असलेल्या २८२ माजी नौदल अग्निवीरांच्या पोलीस कॉन्स्टेबल पदावरील नियुक्तीला औपचारिकपणे मंजुरी दिली आहे.
24 Oct 2026 01:15 PM (IST)
चीनमधील भूगर्भातील तीव्र हालचालींमुळे पुन्हा एकदा नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) ९ वाजून २५ मिनिटांनी चीनच्या उत्तर-पूर्व भागात भूकंपाचे जोरदार हादरे बसले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४.४ इतकी नोंदवण्यात आली असून स्थानिक पातळीवर काही सेकंद जमिनीला हादरे बसल्याची माहिती समोर येत आहे. (China Earthquake)
24 Oct 2026 01:05 PM (IST)
कर्जत तालुक्यातील टाटा समूहाच्या माध्यमातून धरण बांधले जाणार आहे. या धरणाचे खोदकाम गेली वर्षभर सुरू आहे.या खोदकामाचे बाजूला असलेल्या आदिवासी वाडी आणि धनगर वाडा वस्तीमधील घरांवर ब्लास्टिंग केल्यानंतर दगड कोसळत आहेत. दरम्यान,गेली वर्षभर या आदिवासी वाडीमधील रहिवाशांना जमीन घेऊन घरे बांधून दिली जाणार आहेत. मात्र आमच्या कोणत्याही मागण्या मान्य न करता आदिवासी लोकांचे बळी घ्यायचा टाटा कंपनीचा डाव आहे असा जाहीर आरोप येथील ज्येष्ठ महिलांनी केला आहे
24 Oct 2026 12:48 PM (IST)
जुन्या भांडणाच्या वादातून एका तरुणावर आणि त्याच्या मित्रावर विनाकारण आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला करत परिसरात दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता आयमॅक्स ऑप्टीशियन समोर, आकुर्डी येथे घडली आहे. या प्रकरणात केदार संतोष यादव (वय २१, चिखली गावठाण) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार करण साठे आणि त्याचे ८ ते ९ साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण साठे याला पोलिसांनी अटक केली आहे.
24 Oct 2026 12:36 PM (IST)
केंद्र सरकारने साखर कारखान्यांच्या ऊसाचा रस, शुगर सिरप आणि बी-हेवी मोलॅसिसपासून निर्मिती होणाऱ्या इथेनॉलच्या खरेदीवर पुरवठा वर्ष २०२६-२७ साठी बंदी घातली आहे. त्यामुळे साखर कारखान्यांचे इथेनॉलपासून मिळणारे उत्पन्न कमी होणार असल्याने, साखर उद्योग अडचणीत येण्याची भीती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केली. इथेनॉल हा देशाचा अर्थकारण बदलणारा विषय असल्याने, या निर्णयामुळे साखर कारखान्याचे अर्थकारण कोलमडून जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने सदरचा इथेनॉल खरेदी बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा व सी-हेवी मोलॅसिसचा दर हा वाढवून प्रति लि. ७० रुपये करावा, अशी मागणीही अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
24 Oct 2026 12:24 PM (IST)
आंबेगाव तालुक्यातील काळेवाडी-दरेकरवाडी ग्रामपंचायत समूहातील गावरवाडी येथे सध्या पिण्याच्या पाण्याची अत्यंत भीषण टंचाई निर्माण झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी स्थानिक महिलांना भरउन्हात रानोमाळ भटकंती करावी लागत असून, प्रशासनाच्या उदासीन आणि वेळकाढू कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ गावातील सुमारे ३० ते ४० संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर थेट ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे. गावातील पाणीप्रश्न तातडीने न सुटल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी संतप्त महिलांनी दिला आहे.
24 Oct 2026 12:12 PM (IST)
मित्राच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास सत्र न्यायालयाने दहा वर्ष सक्तमजुरी आणि पन्नास हजार रुपये दंड ठोठावला आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. डी. शिरभाते यांनी उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीला दोषी ठरविले आहे. किरण शिवाजी थोरात (वय २८, रा. भोसरी) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर अभिषेक कांबळे याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. सदर गुन्ह्याची घटना १ जानेवारी २०२१ रोजी भोसरी येथे घडली होती. घटनेच्या आधी एक महिन्यापुर्वीच आरोपी आणि जखमी यांची ओळख एका मैत्रिणीच्या माध्यमातून झाली होती. त्या मैत्रिणीबद्दलच्या वादातून मनात राग धरत किरणने फोन करून अभिषेकला बोलावून घेतले. दोघे भोसरीतील टेल्को रोडवर दुचाकीवरून जात होते. किरणने गाडी थांबवायला लावली. गाडी थांबताच त्याने अभिषेकचे डोके पकडून त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केला. जवळपासचे लोक येताच किरणने पळ काढला. एका रिक्षाचालकाने अभिषेकला लगेच रुग्णालयात नेल्याने त्याचा जीव वाचला होता.
24 Oct 2026 11:57 AM (IST)
आईशी पैशांवरून झालेल्या भांडणानंतर घर सोडून गेलेल्या निक्षय परमेश्वर कोतमले (वय 30, पेठ, ता. औसा) या तरुणाचा मृतदेह लातूर जिल्ह्यातील पाण्याने भरलेल्या खाणीत आढळला. बुधोडा गावाच्या हद्दीतील खाणीत गुरुवारी सायंकाळी दगड फोडण्याच्या कारखान्यातील एका कामगाराला त्याचा मृतदेह तरंगताना दिसला.
24 Oct 2026 11:48 AM (IST)
‘ऑनलाइन गेमिंग’द्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या मुंबई येथील टोळीचा भिवंडीतील भोईवाडा पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी पोलिसांनी भगवान दास या सूत्रधारासह दहा आरोपींना अटक केली असून, 32 मोबाईल फोन, 49 एटीएम कार्ड, 40 सिम कार्ड, चार लॅपटॉप आणि मोबाईल चार्जर यांसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
24 Oct 2026 11:36 AM (IST)
लातूर शहरात टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान चार दिवसापूर्वीच एका तरुणाला अमानुष मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या घटनेत एका तरुणाला नग्न करून पार्श्वभागात पेट्रोल टाकून मारहाणीची घटना ताजी असतानाच, लातूर मधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. एका तरुणाला चार चाकी गाडी टाकून रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
24 Oct 2026 11:23 AM (IST)
लातूरच्या अहमदपूर शहरात पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून संतापलेल्या तरुणांने नगराध्यक्ष कार्यालयात तोडफोड केल्याची घटना घडली आहे. पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या तरुणांने नगरपरिषद कार्यालयातल्या नगराध्यक्षांच्या कॅबिनमध्ये गोंधळ घातल्याची प्राथमिक माहिती आहे. शहरातील पाणीटंचाईच्या प्रश्नावरून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नगराध्यक्षांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित करत ही तोडफोड झाल्याचं सांगण्यात येत आहे.
24 Oct 2026 11:16 AM (IST)
तांदुळवाडी शिवारात दोन ट्रॉली भूस जळून खाक झाल्याची घटना घडली. शेतकरी विजय बाजीराव काकळीज यांच्या भुशाला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. अज्ञात व्यक्तीने भुशाला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून, आग नेमकी कशामुळे लागली, याबाबत अधिक माहिती समोर आलेली नाही.
24 Oct 2026 11:03 AM (IST)
दिवा रेल्वे स्थानकातील महिला प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत सोन्याचे मंगळसूत्र चोरणाऱ्या दोन महिलांना ठाणे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून दोघींना रंगेहाथ पकडले. मेघिता आरव काळे (वय २२) आणि अनु बबन काळे (वय ३५, दोघी रा. येरवडा, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून एकूण ७ लाख ५५ हजार रुपये किमतीची पाच सोन्याची मंगळसूत्रे जप्त करण्यात आली आहेत.
24 Oct 2026 10:55 AM (IST)
भारतात 24 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 14,247 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 13,059 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 10,685 रुपये आहे. भारतात 24 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,30,590 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,42,470 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,06,850 रुपये आहे. भारतात 24 ऑक्टोबर रोजी चांदीचा भाव प्रति ग्रॅम 219.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,19,900 रुपये आहे.
24 Oct 2026 10:45 AM (IST)
भरधाव फॉर्च्युनर कार चालकाने दोन दुचाकींना धडक (Crime) दिल्यानंतर कार टपरीवर आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला ही घटना मारुंजी येथे गुरुवारी (दि. २२) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडली. अमोल नथू गायकवाड (वय ४३, रा. रसिकवाडी, जांबे, ता. मुळशी) असे मृत्युमुखी पडलेल्या कारचालकाचे नाव आहे. ज्ञानेश्वर पांडुरंग गायकवाड (वय 38, रा. चांदखेड, ता. मावळ) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
24 Oct 2026 10:35 AM (IST)
कोणताही आजार आणि त्यानंतर रुग्णालय म्हटले की अंगावर अक्षरश: काटा येतो. कारण, औषधे, वैद्यकीय चाचण्या आणि उपकरणांच्या नावाखाली रुग्णांकडून पैसे उकळण्याचे काम सुरु असते. पण, आता भरमसाठ पैसे उकळणाऱ्या खासगी रुग्णालयांवर लवकरच कठोर कारवाई केली जाणार आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र सादर करून रुग्णालयांकडून केली जाणारी ही आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी योग्य पावले उचलली जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
24 Oct 2026 10:25 AM (IST)
डिपार्टमेंट ऑफ टेलीकम्युनिकेशन (DoT) ने मॅसेजिंग आणि कम्युनिकेशन ॲप्सना नवीन सिम बाइंडिंग नियमाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. हा नवीन नियम 1 जानेवारी, 2027 पासून लागू केला जाणार आहे. या नियमांतर्गत मॅसेजिंग ॲप्सना सिम आधारित लॉगिन व्हेरिफिकेशन लागू करावे लागणार आहे. याचा उद्देश असा आहे की, यूजरचे अकाऊंट त्याच्या रजिस्टर्ड भारतीय मोबाईल नंबर संबंधित असलेल्या ॲक्टिव्ह सिम कार्डशी जोडलेले ठेवणे. ऑनलाईन स्कॅम रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे DoT चे म्हणणं आहे.
24 Oct 2026 10:15 AM (IST)
आज जागतिक पोलिओ दिन आहे. या दिवसाचे उद्दिष्ट म्हणजे पोलिओ या घातक आजाराविषयी जागरूकता वाढवणे आणि त्याच्या निर्मूलनासाठी आवश्यक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करणे. पोलिओ हा एक विषाणूजन्य आजार आहे जो विशेषतः लहान मुलांवर परिणाम करतो आणि गंभीर अवस्थेत त्यामुळे पक्षाघात होऊ शकतो. या दिवसाची सुरुवात रोटरी इंटरनॅशनल या संघटनेने केली, ज्यामुळे जगभरातील पोलिओ निर्मूलनासाठी मोठ्या प्रमाणावर मोहिमा राबवण्यात आल्या. 1955 मध्ये डॉ. जोनास सॉक यांनी पोलिओ लसीचा शोध लावला, ज्यामुळे या आजाराच्या नियंत्रणात मोठी मदत झाली. आज अनेक देश पोलिओमुक्त झाले असले तरी काही देशांमध्ये अद्यापही पोलिओची समस्या आहे. या दिवशी लसीकरणाच्या महत्त्वावर भर दिला जातो, कारण पोलिओचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी लसीकरण हेच प्रभावी साधन आहे. जागतिक पोलिओ दिनाच्या माध्यमातून पोलिओमुक्त जग निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली जाते.
24 Oct 2026 10:05 AM (IST)
नवी मुंबई शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन, धरणातील पाणीसाठा आणि वितरण व्यवस्थेतील त्रुटींबाबत महानगरपालिकेत तहकूब महासभेत पाणी जियोजन विषयावर चर्चा करण्यात आली. राज्य शासनाने सर्व पालिकांना 10 टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. मात्र नवी मुंबई पालिकेत कोणतीही कपात होणार नाही अशी घोषणा वनमंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. त्यानुसार शुक्रवारी महासभेत पाणी कपात न करण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील व सभागृह नेते सागर नाईक यांनी आयुक्तांना दिले. यावेळी आयुक्तांनी पाणी नियोजनावर भर देत पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सभागृहात सांगितले.
24 Oct 2026 09:55 AM (IST)
छत्रपती संभाजीनगरमधून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांना फोनवरून थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
‘पाच लाख रुपयांत तुमची सुपारी घेतली आहे, जर वाचायचे असेल तर दहा लाख रुपये द्या, अन्यथा आम्हाला आमचे काम करावे लागेल,’ अशा अत्यंत धमकावणाऱ्या शब्दांत फोनवरून संपर्क साधून खंडणी व जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा राजेंद्र जंजाळ यांनी केला आहे.
24 Oct 2026 09:45 AM (IST)
पुण्याच्या खेड तालुक्यातील कुरकुंडी गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा एक घोळका बस थांब्यावर बसची वाट पाहात उभा असताना, अचानक एक भरधाव कार अंगावर काळ बनून धावत आली. या भीषण अपघातात आदिती नववाथ राळे या विद्यार्थिनीचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, इतर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून एकच खळबळ उडाली आहे. कुरकुंडी गावातील बस थांब्यावर काही महाविद्यालयीन विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी बसची प्रतीक्षा करत उभ्या होत्या
24 Oct 2026 09:35 AM (IST)
दिल्ली, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये दहशत माजवणारा भारताचा मोस्ट वाँटेड गुंड हिमांशू भाऊ याला अमेरिकेत फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) ने अटक केली आहे. खून, खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये हवा असलेला हा कुख्यात गँगस्टर अखेर अमेरिकेत पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.हिमांशू भाऊविरोधात इंटरपोलने २०२३ मध्येच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. तसेच हरियाणा पोलिसांनी अडीच लाख रुपये आणि दिल्ली पोलिसांनी १ लाखाचे बक्षीस त्याच्यावर जाहीर केले होते.






