महायुती सरकारमध्ये 'या' कारणामुळे वादाची ठिणगी; अजित पवारांच्या बैठकीला शिंदे गटाची दांडी
महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. उद्यापासून नागपुरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरूवात होणार असल्याने आजच नागपुरच्या राजभवनात फडणवीस सरकारच्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भाजपच्या नेत्यांची संभाव्य यादी समोर आली आहे.
भाजपकडून सर्वात आधी चंद्रशेखर बावनकुळेंनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
15 Dec 2024 06:03 PM (IST)
भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आशिष जैसवाल यांनीही राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.पंकज भोयर यांनीही राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मेघना बोर्डीकर यांनीही राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. इंद्रनील नाईक यांनीही राज्याच्या राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर योगेश कदम यांनी राज्य मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
15 Dec 2024 05:51 PM (IST)
भाजप नेते नितेश राणे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. आकाश फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. त्यांच्यानंतर बाबासाहेब पाटील यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. शिंदे गटाचे नेते प्रकाश आबिटकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
15 Dec 2024 05:42 PM (IST)
शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, शिंदे गटाचे भरत गोगावले यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. भरत गोगावलेयांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेत फूट पडल्यापासून भरत गोगावले मंत्रिपदाची इच्छा बाळगून होते. मंत्रिपदाची इच्छाही त्यांनी अनेकदा उघडपणे बोलून दाखवली होती. अखेर देवेंंद्र फडणवीसांच्या तिसऱ्या कार्यकाळात भरत गोगावलेंची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंकरंद पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
15 Dec 2024 05:35 PM (IST)
भाजपच्या जयकुमार गोरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नरहरी झिरवाळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. संजय सावकारेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ, शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे.
15 Dec 2024 05:26 PM (IST)
इंदापुरचे आणि शिंदे शिवसेनेचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही फडणवीसांच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. अजित पवारांच्याराष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
15 Dec 2024 05:17 PM (IST)
भाजपचे अतुल सावे यांनी घेतली शपथ,
अशोक उईके यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
शंभुराज देसाईंनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते आशिष शेलार यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
15 Dec 2024 05:11 PM (IST)
भाजपच्या जयकुमार रावल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांच्याही गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावे, यासाठी अनकेदा बीडच्या नागरिकांनी आणि त्यांच्या चाहत्यांनी राज्य सरकारकडे मागणी केली होती. पण त्यांना मंत्रिपद मिळू शकले नाही. अखेर फडणवीसांच्या तिसऱ्या कार्यकाळात पंकजा मुंडेंना मंत्रिपद मिळाले आहे. पंकजा मुंडे यांचे नाव घेताच समोर बसलेल्यात्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोषही केला. 2014 ते 2019 या काळात पंकजा मुंडे बाल कल्याण आणि महिला विकास या खात्याच्या मंत्रि होत्या.
15 Dec 2024 05:05 PM (IST)
शिवसेनेचे संजय राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचेधनंजय मुंडेयांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर मुंबईतील सर्वात श्रीमंत आमदार म्हणून ओळख असलेले आणि भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आपल्या गुजराती भाषेतून मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
15 Dec 2024 05:02 PM (IST)
महायुतीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या शपथविधीला सुरूवात झाली असून सर्वात आधी भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यापाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
15 Dec 2024 04:57 PM (IST)
हसन मुश्रीफ, गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, दादाजी भुसे यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
15 Dec 2024 04:43 PM (IST)
चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली मंत्रिपदाची शपथ
15 Dec 2024 04:34 PM (IST)
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांच्या यादी येणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धर्मराव बाबा आत्राम आमि संजय बनसोडे यांची फडणवीस सरकारच्या मंंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याचं जळपास निश्चित झाले आहे. अजित पवार यांच्या गटाच्या वाट्याले 9 मंत्रिपदे आली आहेत. यात भुजबळ, वळसे-पाटील,आत्राम, बनसोडे यांचा पत्ता कट झाला आहे. त्यामुळे भुजबळ आणि वळसे पाटील नाराज झाले असून त्यांनी शपथविधीच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याची माहिती समोर आली आहे.
15 Dec 2024 01:26 PM (IST)
आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, दत्तमामा भरणे, हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, इंद्रनील नाईक, धनंजय मुंडे
15 Dec 2024 01:21 PM (IST)
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 7 विकेटवर 400 धावा झाली आहे. ॲलेक्स कॅरी 42 चेंडूत 43 धावांवर खेळत आहे. त्याने पाच चौकार आणि एक षटकार मारले आहेत. तर दुसऱ्या बाजूने मिचेल स्टार्क खेळत आहे.
15 Dec 2024 01:12 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना यावेळी मंत्रिमंडळात संधी मिळणार नसल्याची चर्चा आहे. इतकेच नव्हे तर धनंजय मुंडे यांचेही नाव अद्याप मंत्रिपदाच्या यादीत आलेले दिसत नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात यावेळी या दोन बड्या नेत्यांची गच्छंती होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. 2014 ते 2019 हा कालावधी सोडला तर छगन भुजबळांनी अनेकदा मंत्रिपद भुषवले आहे. पण यावेळी फडणवीसांच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांनाही संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.यात नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सात आमदारांपैकी फक्त नरहरी झिरवाळ यांनाच फोन आल्याची माहिती आहे.
15 Dec 2024 01:03 PM (IST)
नागपुरात रॅलीदरम्यान, देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी अभिवादन केले. यावेळी हेडगेवारांच्या भित्तीचित्राची मोठी सजावट कऱण्यात आली होती.
15 Dec 2024 12:40 PM (IST)
महायुतीच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस नागपुरात दाखल झाले आहेत. नुकतेच ते नागपुर विमानतळावर दाखल झाले.
15 Dec 2024 12:35 PM (IST)
मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मोठी बॅनबाजी करण्यात आली आहे. नागपुर विमानतळापासून विधान भवनापर्यंत एकनाथ शिंदे यांचे महायुतीच्या विजयाचे कर्णधार अशा आशयाचे स्वागताचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर अनेक ठिकाणी ‘देवा भाऊ जो बोलता है वो करता है’, अशा आशयाचे देवेंद्र फडणवीस यांचेही बॅनर लागल्याचे दिसत आहे.
15 Dec 2024 11:52 AM (IST)
महाराष्ट्र विधीमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीसाठी तयारी पूर्ण झाली असून नागपुरात मंत्री दाखल होऊ लागले आहेत. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक राहिले असताना अद्यापही शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार काही मिनिटात नागपुरमध्ये दाखल होत आहेत. ते नागपुरमध्ये आल्यानंतर शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची अदिकृत यादी जाहीर करतील अशी माहिती आमदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.
15 Dec 2024 11:48 AM (IST)
ट्रॅव्हिस हेडनंतर स्टीव्ह स्मिथनेही शतक झळकावले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये स्मिथने 535 दिवसांनंतर शतक झळकावले. त्याचे कसोटीतील हे 33 वे शतक आहे. स्मिथ 12 चौकारांच्या मदतीने 100 धावांवर आहे. ट्रॅव्हिस हेड 146 धावांवर खेळत आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 313 धावांवर पोहोचली आहे.
15 Dec 2024 11:36 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात ट्रॅव्हिस हेड 139 आणि स्टीव्ह स्मिथ 95 धावा केल्या आहेत. या दोन्ही फलंदाजांनी त्यांची मजबूत पकड मैदानात केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये 300 धावा आकडा पार केला आहे. पहिल्या इनिंगमध्ये 81 ओव्हरचा खेळ झाला आहे.
15 Dec 2024 11:34 AM (IST)
ट्रॅव्हिस हेड 125 आणि स्टीव्ह स्मिथ 90 धावांवर खेळत आहे. या दोघांमध्ये 207 धावांची भागीदारी झाली आहे. गोलंदाजीनंतर भारतीयांना विकेट्सची आस लागली आहे. ऑस्ट्रेलियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात 282 धावांवर पोहोचली आहे.
15 Dec 2024 10:53 AM (IST)
भाजपच्या मंत्रिमंडळ विस्तारासोबतच भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते रविंद्र चव्हाण यांना भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाणार असल्याची माहिती आहे. 2029 मध्ये शतप्रतिशत भाजपची सत्ता आणण्यासाठी आणि भाजपचे 200 हून अधिक आमदार निवडून आणण्यासाठी रविंद्र चव्हाण यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाची सुत्रे दिली जाणार असल्याची माहिती आहे.
15 Dec 2024 10:43 AM (IST)
1. संजय शिरसाट, मराठवाडा
2. भरतशेठ गोगावले, रायगड
3. प्रकाश आबिटकर, पश्चिम महाराष्ट्र
4. योगेश कदम, कोकण
5. आशिष जैस्वाल, विदर्भ
6. प्रताप सरनाईक, ठाणे
1. दीपक केसरकर
2. तानाजी सावंत
3. अब्दुल सत्तार
15 Dec 2024 10:36 AM (IST)