
धुक्याची चादर अन् गारठ्याचा जोर वाढला!'या' जिल्ह्यात तापमान 6.6 अंशावर, तुमच्या भागात काय परिस्थिती जाणून घ्या
मुंबई राज्यात कडाक्याची थंडी वाढली असून आजपासून पारा १७ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवस हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. विदर्भात थंडीची लाट सुरूच आहे, नागपूर, गोंदिया, भंडाऱ्यात पारा१० अंशांपेक्षा कमी आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार ११ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायमच राहिल. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढू लागला आहे. विदर्भातील थंडीचा कडाका वाढल्याने हुडहुडी भरली आहे. राज्याच धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यात ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गोंदियात ८.२ अंश किमान तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून स्थिर असलेले किमान तापमान पुढील काही दिवसांत आणखी घसरण्याची शक्यता आहे. नागपूरमध्ये ८.५ अंश आणि अमरावतीमध्ये ९.२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पुण्यासह राज्यात थंडी वाढण्याची शक्यता आहे. दिवसा कमाल तापमानात वाढ होते तर रात्रीच्या तापमानात घट होत आहे. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमान आणखी घसरण्याची शक्यता आहे.
जळगाव शहरासह जिल्ह्यात ८ ते १२ डिसेंबर दरम्यान किमान तापमान ८ ते ११ अंशांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. उत्तर भारतातून येणारे थंड वारे जोरात मध्य महाराष्ट्राकडे वाहत असल्याने गारठा अधिक वाढल्याचे जाणवते. वातावरण अंधुक किंवा ढगाळ, भौगोलिक भाषेत या स्थितीला ‘हेझ’ म्हणतात. धुके आणि कोरड्या वाऱ्यांमुळे आजपासून पुढील चार दिवस जळगावमधील पारा ८ ते ११ अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. धुके व कोरड्या वाऱ्यांमुळे जळगावचा पारा आजपासून पुढील चार दिवस ८ ते ११ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. अर्थात, गारठा वाढेल. रविवारी पारा १२.२ अंशांवर होता. सोमवारी रेडिएटिव्ह फॉगमुळे दृश्यमानता ४०० मीटरपर्यंत खाली येईल आणि सरासरी किमान तापमान ११ अंशांपेक्षाही खाली येऊ शकते, असा स्थानिक हवामान अभ्यासकांचा अंदाज आहे.
धुळ्यात तापमानाचा पारा घसरत आहे. आज धुळ्यात ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामातील हे सर्वात नीचांकी तापमान मानलं जात आहे. तापमानात तीव्र घट झाल्यामुळे धुळेकरनाचांगलीच हुडहुडी देखील भरलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून धुळ्याच्या तापमानात लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील तापमान १० अंश सेल्सिअस नोंदविण्यात आला. थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचा पारा १३.२ अंश आहे, त्या तुलनेत यवतमाळ जिल्ह्याचा पारा घसरत आहे आणि जिल्ह्यात हुडहुडी कायम आहे. यंदा जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीच्या दोन ते तीन लाट येणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे.