Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Drought : शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी करा, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मंत्र्यांना आवाहन

Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना दिवाळीचा एक दिवस शेतकरी कुटुंबांसोबत घालवण्याचं आवाहन केलं आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनासोबतच सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असं त्यांनी म्हटलं आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 05, 2026 | 08:27 PM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करा, फडणवीसांचं मंत्र्यांना आवाहन
  • संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात; सरकारचे प्रयत्न सुरू
  • मुख्यमंत्र्यांनी स्वतःही गावात जाण्याचा घेतला निर्णय
 

नागपूर : राज्यातील शेतकरी बांधवांना दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत असून, अशा परिस्थितीत त्यांना आधार देणे आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे ही समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असून, विविध सामाजिक संस्था, संघटना तसेच नागरिकही मदतीसाठी पुढाकार घेत आहेत. या सर्व प्रयत्नांना अधिक व्यापक स्वरूप देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत कशी पोहोचविता येईल, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Maharashtra Drought)

दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण आहे. मात्र, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सध्याची परिस्थिती आव्हानात्मक आहे. त्यामुळे सणाच्या आनंदात शेतकरी कुटुंबांचाही सहभाग असावा आणि आपण एकटे नसल्याची जाणीव व्हावी, या भावनेतून प्रत्येक मंत्र्यांनी दिवाळीतील एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

रामगिरी या शासकीय निवासस्थानी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार संजय भेंडे, आ. परिणय फुके, आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

तरुणांसाठी मोठी बातमी! १०० कौशल्य प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार; Mangal Prabhat Lodha यांच्या हस्ते शुभारंभ

दुष्काळावर सर्व मिळून मात करूया

शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा आधारस्तंभ आहे. शेतीशी संबंधित अडचणींचा परिणाम केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित राहत नाही, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना संकटाच्या काळात मदत करणे, त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

शेतकऱ्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यांना आवश्यक असलेले सहकार्य आणि मदत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. केवळ शासकीय पातळीवरच नव्हे, तर सामाजिक स्तरावरही शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध संस्था आणि व्यक्तींकडून सुरू असलेल्या मदतकार्याला प्रोत्साहन देण्याची भूमिका शासनाने घेतली असल्याचे ते म्हणाले.

मंत्र्यांनी ग्रामीण भागात जाऊन शेतकरी कुटुंबांशी संवाद साधावा, त्यांच्या परिस्थितीची माहिती घ्यावी आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असा व्यापक सामाजिक संदेश अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि त्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहणे, या दृष्टीने हा उपक्रम महत्वाचा ठरू शकतो, असे ते म्हणाले.

शासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिक या सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यास मदतीचा आवाका वाढू शकतो. याच भावनेतून मंत्र्यांनी दिवाळीचा एक दिवस शेतकऱ्यांसोबत घालवावा. मीही नागपूर जिल्ह्यातील एका गावात एक दिवस जाणार आहे. दुष्काळावर सर्व मिळून मात करूया असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूरच्या वतीने मदतीचा धनादेश मुख्यमंत्री फडणीस यांच्याकडे सूपूर्द

माहिती व जनसंपर्क विभागाच्या संचालक, माहिती व जनसंपर्क कार्यालय, नागपूरच्या वतीने सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी एकत्र केलेला मदतीचा धनादेश मुख्यमंत्री फडणीस यांना यावेळी देण्यात आला.

Farmer News: रब्बी हंगाम पीकविम्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदत; गहू, हरभरा, कांदा पिकाचा समावेश, कृषी विभागाचे आवाहन

💡

Frequently Asked Questions

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांना काय आवाहन केलं आहे?

    Ans: राज्यातील प्रत्येक मंत्र्याने दिवाळीतील एक दिवस एखाद्या गावात जाऊन शेतकरी कुटुंबांसोबत सण साजरा करावा आणि त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

  • Que: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः कुठे दिवाळी साजरी करणार आहेत?

    Ans: मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यातील एका गावात जाऊन शेतकऱ्यांसोबत एक दिवस घालवणार असल्याचं सांगितलं आहे.

  • Que: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकार काय प्रयत्न करत आहे?

    Ans: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याशिवाय सामाजिक संस्था, संघटना, नागरिक आणि लोकप्रतिनिधींनीही मदतकार्यात सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Web Title: Maharashtra drought devendra fadnavis appeals ministers celebrate diwali with farmers vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 08:24 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • drought news
  • Maharashtra Drought 2026

संबंधित बातम्या

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा
1

Karjat Torent Project : टोरंट प्रकल्पावरून भाजप आक्रमक! ‘बाहेरच्यांनी येऊन लुडबुड करू नये’, दिला थेट इशारा

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?
2

Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’
3

Kolhapur Gokul Politics : गोकुळच्या वादात रोहित पवारांची उडी! ‘फडणवीसांचा इगो दुखावला म्हणून संविधानाशी छेडछाड?’

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण
4

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.