Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 5 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur Gokul Politics : ‘गोकुळ’ वरून राजकारण तापलं! गोकुळमध्ये चार संचालक का नेमले? फडणवीसांनी अखेर सांगितलं कारण

Kolhapur Gokul Politics : गोकुळ दूध संघात चार संचालक नियुक्त करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे कोल्हापूरसह राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. सतेज पाटील यांनी सरकारला घेरलं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 05, 2026 | 03:16 PM
Cm devendra fadnavis

Cm devendra fadnavis

Follow Us
Follow Us:
  • गोकुळ दूध संघाच्या राजकारणात नवा ट्विस्ट
  • चार संचालकांच्या नियुक्तीवरून वाद
  • संचालक नियुक्तीवर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Kolhapur Gokul Politics : राज्याच्या राजकारणात सध्या ‘गोकुळ‘ चा मुद्दा चांगलाच पेटला आहे. राज्य सरकारने गोकुळवर चार संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्यानंतर विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. आधीच राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आपापसांत भिडत आहेत. अश्यातच आता गोकुळच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान पेटवलं आहे. आमदार सतेज पाटील या मुद्द्यावरून वारंवार सरकारला घेरत असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत कोणत्याही गटाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. त्यामुळे चेअरमन निवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. मात्र, या निर्णयामुळे राजकीय वादाला तोंड फुटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना, गोकुळमध्ये संचालक नियुक्त केले नसते तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, असं म्हटलं आहे.

‘गोकुळ संचालक नेमले नसते तर पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती,’ अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली असल्याचे सूत्रांची सांगितले आहे. तसेच त्यांनी यावेळी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे.

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात

१३ जागा जिंकूनही चेअरमन निवडता येईना!

गोकुळ दूध संघाची एकूण सदस्यसंख्या २५ आहे. चेअरमन निवडीसाठी १४ सदस्यांचा कोरम आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. सतेज पाटील यांच्या गटाकडे १३ सदस्य असून महायुतीकडे १२ सदस्य आहेत. मात्र, आवश्यक संख्याबळ नसल्याने चेअरमन निवडीच्या बैठकीत अडचणी निर्माण झाल्या. बैठकीला पुरेसे सदस्य उपस्थित नसल्याने निवडीची प्रक्रिया रखडली.

सरकारच्या म्हणण्यानुसार, हा पेच कायम राहिला असता तर पुढे निवडणूक किंवा प्रशासक नियुक्तीची वेळ येऊ शकली असती. त्यामुळे चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ॲडव्होकेट जनरल यांचं मत विचारात घेऊनच घेतल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.

राहुल गांधींच्या ट्विटवरूनही फडणवीसांचा निशाणा

दरम्यान, राहुल गांधी यांनी गोकुळच्या निवडणुकीवरून सोशल मीडियावर व्होट चोरीचा आरोप केला होता. यावरही फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. गोकुळमध्ये साडेचार हजार मतदार असताना राहुल गांधींनी या मुद्द्यावर ट्विट करणं म्हणजे हा विषय किती छोटा आहे, असं सांगत त्यांनी राहुल गांधींवर टीका केल्याचं समजतं.

सरकारचा निर्णय कायदेशीर आहे की नाही, यावरून आता राजकीय संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. निवडणुकीतून बहुमत मिळवता आलं नाही म्हणून सरकार नियुक्त्यांच्या माध्यमातून गोकुळवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

त्यामुळे गोकुळचा चेअरमन कोण होणार, सरकारचा निर्णय टिकणार का आणि सतेज पाटील या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

Gokul President Election 2026: गोकुळ अध्यक्षपदाचे राजकीय गणित बदलणार! हसन मुश्रीफांचे सुचक विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोकुळ दूध संघात चार संचालकांची नियुक्ती का करण्यात आली?

    Ans: गोकुळ दूध संघात चेअरमन निवडीसाठी आवश्यक असलेला 14 सदस्यांचा कोरम पूर्ण होत नसल्याने निर्माण झालेला पेच सोडवण्यासाठी राज्य सरकारने चार संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

  • Que: गोकुळ दूध संघात सतेज पाटील यांच्याकडे किती सदस्य आहेत?

    Ans: सतेज पाटील यांच्या गटाकडे 13 सदस्य आहेत, तर महायुतीकडे 12 सदस्य आहेत.

  • Que: देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळच्या नियुक्तीवर काय प्रतिक्रिया दिली?

    Ans: संचालक नियुक्त केले नसते तर गोकुळमध्ये पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

Web Title: Kolhapur gokul politics cm devendra fadnavis statement vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2026 | 03:13 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Gokul
  • Gokul Milk
  • kolhapur news
  • Satej Patil

संबंधित बातम्या

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात
1

Kolhapur Gokul Politics : वोट चोरीनंतर आता सत्ता चोरी; गोकुळवरून सतेज पाटलांचा सरकारवर घणाघात

Raju Shetti Protest: कारखानदारांच्या दारात करणार शिमगा! राजू शेट्टींनी दिला इशारा
2

Raju Shetti Protest: कारखानदारांच्या दारात करणार शिमगा! राजू शेट्टींनी दिला इशारा

Sugarcane Protest: ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी रास्ता रोको सुरूच; राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा
3

Sugarcane Protest: ऊसाच्या पहिल्या उचलीसाठी रास्ता रोको सुरूच; राजू शेट्टींचा कारखानदारांना इशारा

Kolhapur News : ‘जनता कधीही माफ करणार नाही…’ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांना थेट इशारा
4

Kolhapur News : ‘जनता कधीही माफ करणार नाही…’ गोकुळच्या सत्तासंघर्षावरून सतेज पाटील आक्रमक; मुश्रीफ-चंद्रकांत पाटलांना थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.