Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पगार कपात, सिमकार्ड वसुलीवरून वाद… बोनस न मिळाल्यास १४ मेपासून राज्यभर वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सरकारला थेट इशारा

महाराष्ट्रातील वीज कर्मचाऱ्यांनी बोनस आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारला इशारा दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास १४ मेपासून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इरादा स्पष्ट केला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 06, 2026 | 11:31 AM
पगार कपात, सिमकार्ड वसुलीवरून वाद... बोनस न मिळाल्यास १४ मेपासून राज्यभर वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सरकारला थेट इशारा

पगार कपात, सिमकार्ड वसुलीवरून वाद... बोनस न मिळाल्यास १४ मेपासून राज्यभर वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन; सरकारला थेट इशारा

Follow Us
Follow Us:
  • बोनस आणि सानुग्रह अनुदान तात्काळ द्यावे, अन्यथा १४ मेपासून आंदोलनाचा इशारा.
  • उद्दिष्ट पूर्ण करूनही बोनस न मिळाल्याने कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजी.
  • पगार कपात आणि सिमकार्ड वसुली थांबवण्यासह इतर मागण्यांवरही सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी.
महाराष्ट्रातील वीज कंपन्यांमधील कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांच्या कृती समितीने बोनस-सानुग्रह अनुदान तत्काळ देण्याची जोरदार मागणी करत सरकारला इशारा दिला आहे. मागणी मान्य न झाल्यास १४ मे रोजी राज्यभर सर्व कार्यालयांसमोर द्वारसभा घेऊन आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कृती समितीने अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला तसेच राज्यातील वीज कंपन्यांच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

‘नसरापूरमध्ये अमानवी कृत्य करणाऱ्या नराधमाला फाशी द्या’; वाईकरांची मागणी

दरम्यान, जानेवारी २०२६ मध्ये झालेल्या बैठकीत मार्चअखेर १०० टक्के वसुली पूर्ण केल्यास बोनस देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार कर्मचारी व अभियंत्यांनी उद्दिष्ट पूर्ण केले असूनही अद्याप बोनस दिला गेलेला नाही. महाराष्ट्रा स्टेट इलेक्ट्रसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड सह तिन्ही वीज कंपन्यांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षात चांगली कामगिरी करत नफा मिळवला असून, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरस्कारही मिळवले आहेत. त्यामुळे
कर्मचाऱ्यांच्या बोनसबाबत अपेक्षा अधिक तीव्र झाल्याचे समितीने नमूद केले आहे.

संपावेळी दोन दिवसांचा पगार चुकीने केला कपात

दरम्यान, २७ एप्रिल रोजी महावितरण कंपनीसोबत झालेल्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे कौतुक करण्यात आले, मात्र बोनसबाबत ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे.
याशिवाय, ऑक्टोबर २०२५ मधील संपावेळी दोन दिवसांचा पगार चुकीने कपात करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला असून, तो तत्काळ परत करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच सिमकार्ड परत केल्याच्या कारणावरून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या देयकातून मोठी रक्कम वसूल करण्याची कारवाई तत्काळ थांबवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

Pimpri-Chinchwad मध्ये ६० कोटींच्या उपसूचनांचा ‘महाघोटाळा’? पालिकेच्या सर्वसाधारण सभेत अडीच तास हायव्होल्टेज ड्रामा

…तर संपूर्ण जबाबदारी सरकार आणि प्रशासनाची

कृती समितीने स्पष्ट केले आहे की, बोनस आणि इतर मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल. अशा परिस्थितीत वीजपुरवठा व ग्राहक सेवेत अडथळे निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी सरकार आणि प्रशासनावर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर तसेच संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Maharashtra electricity workers warning protest from 14 may on bonus demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • electricity
  • maharashtra
  • Protest

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.