Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारची मोठी घोषणा; ‘या’ व्यावसायिकांना मिळणार 20-22 हजारांचं आर्थिक अनुदान?

मासेमारी बंद असलेल्या कालावधीत मच्छीमारांना आर्थिक मदत देण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर 20-22 हजार रुपयांचं अनुदान देण्याचं नियोजन असल्याची माहिती नितेश राणेंनी दिली.

  • By विवेक
Updated On: Sep 18, 2026 | 10:23 PM
मासेमारी बंद काळात मच्छीमारांना 20-22 हजार रुपयांची मदत देण्याचं नियोजन

मासेमारी बंद काळात मच्छीमारांना 20-22 हजार रुपयांची मदत देण्याचं नियोजन

Follow Us
Follow Us:
  • मासेमारी बंद काळात मच्छीमारांना 20-22 हजार रुपयांची मदत देण्याचं नियोजन.
  • आंध्र प्रदेशच्या धर्तीवर आर्थिक अनुदान देण्याचा सरकारचा विचार.
  • शेतकऱ्यांसाठी 5 ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू होणार असल्याची राणेंची माहिती.
 

राज्य सरकारकडून विविध घटकांसाठी निर्णय आणि घोषणांचा धडाका सुरू असतानाच आता मच्छीमारांसाठीही मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. मासेमारी बंद असलेल्या काळात मच्छीमारांना थेट आर्थिक मदत देण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

माशांच्या प्रजनन काळात मासेमारीवर काही काळ बंदी असते. या काळात मच्छीमारांच्या उत्पन्नाचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे या कालावधीत त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी सरकारकडून उपाययोजना करण्याचा विचार सुरू असल्याचं राणे यांनी सांगितलं.

माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील मच्छीमारांना जवळपास 20 ते 22 हजार रुपयांचं आर्थिक अनुदान देण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यासंदर्भातील निर्णय लवकरच जाहीर केला जाईल, असंही राणे यांनी सांगितलं.

Manoj Jarange Patil : जरांगेंनी उपोषण सोडलं, पण वाद पेटला! ‘ED ची भीती वाटली म्हणून पाटोद्यात थांबले’; सहकाऱ्याचा धक्कादायक दावा

उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंचा निशाणा

दरम्यान, दुष्काळाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेलाही नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात काय केलं, हे जनतेने पाहिलं आहे, असा टोला राणेंनी लगावला.

‘तुमसे ना हो पायेगा’ अशी टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना ‘तुमसे ना हो पायेगा’चे ब्रँड अ‍ॅम्बेसेडरच उद्धव ठाकरे आहेत, अशी खोचक टीका त्यांनी केली.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंचनामे सुरू होणार

राज्यातील काही भागांत पावसाचं प्रमाण कमी राहिल्याने परिस्थिती चिंताजनक असल्याचंही राणेंनी मान्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली असून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. 5 ऑक्टोबरपासून पंचनामे सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Eknath Shinde : ‘गावी आलो, लंडनला गेलो तरी विरोधकांना पोटदुखी’; दरे गावातून एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

दिशा सालियन प्रकरणावरही भाष्य

दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीबाबत बोलताना राणेंनी सध्या त्यावर भाष्य करणं टाळलं. सीबीआयकडून चौकशी सुरू असून प्रकरण न्यायालयातही प्रलंबित असल्याने चौकशीत अडथळा येईल असं कोणतंही वक्तव्य करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली. मात्र, या प्रकरणावर संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि सुषमा अंधारे वारंवार बोलत असल्याने आदित्य ठाकरे अडचणीत येऊ शकतात, असं सूचक विधान नितेश राणेंनी केलं.

Web Title: Maharashtra government fishermen financial assistance fishing ban period

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 10:23 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Nitesh Rane

संबंधित बातम्या

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण
1

Wardha News : ९४ हजार शेतकऱ्यांना विम्याचे कवच, योजनेत १ लाख ७५ हजार २१५ अर्ज, १ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना विम्याचे संरक्षण

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’
2

जमिनीच्या मालकी हक्काला मिळणार कायदेशीर निश्चितता; डिसेंबरपर्यंत ‘लँड टायटलिंग अ‍ॅक्ट’

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा
3

महिला शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सातबारा नावावर नसला तरी मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री भरणेंची घोषणा

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी
4

ST News : STच्या बसस्थानकांवर आता १२५ ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी मोठा निर्णय, टोयोटाच्या CSR निधीतून उभारणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.