
२ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्णय
पुणे जिल्ह्यात, आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, मालेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपचांयतीच्या मतदार संघात सुट्टी असणार आहे.
मतदारसंघाच्या क्षेत्रातील जे मतदार कामाकरिता त्या त्या मतदारसंघाच्या बाहेर असणाऱ्यांना मतदारांना देखील लागू राहणार आहे. येत्या २ डिसेंबर रोजी केंद्र सरकारची कार्यालये, निमसरकारी कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादी ठिकाणी सार्वजनिक सुट्टी लागू राहील, पात्र मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन डुडी यांनी केले. मित्रांनो, केळी आहेत.
२ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान होणार आहे. मतदारांना मतदान करता यावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. शक्य तितक्या मतदारसंघांमध्ये निवडणुका घेतल्या जातील. त्या मतदारसंघात सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बँका आणि सरकारी कार्यालये बंद राहतील. त्यामुळे तुमचे २ डिसेंबरला बँकेत काही काम असेल तर जाऊ नका.
राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराची अंतिम मुदत वाढवली आहे. आता १ डिसेंबरच्या रात्री १० वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. अपत्र आणि उमेदवारांना उशिरा चिन्ह मिळालेल्यांना दिलासा मिळणार आहे. आता उमेदवारांना मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत प्रचार करता येणार आहे.
तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध करण्याचे प्राथमिक निर्देश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुढील सुनावणीची तारीख २१ जानेवारी रोजी निश्चित होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ५७ संस्थांच्या निवडणुका पूर्ण झाल्यावर त्या निकालांचे भवितव्य न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून असणार आहे.
Ans: 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 3 डिसेंबर रोजी होणार आहे. ही निवडणूक ईव्हीएमवर (EVM) घेण्यात येणार आहे. 4 नोव्हेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
Ans: एकूण मतदार - 1 कोटी 7 लाख 3 हजार 576, महिला मतदार - 53 लाख 22 हजार 870
Ans: अ वर्ग अध्यक्षपद - 15 लाख नगरसेवक - 5 लाख