'राज्यातील लाडकी बहीण योजनेची फेरपडताळणी सुरू, पात्र लाभार्थींवर अन्याय होणार नाही'; आदिती तटकरेंचे आश्वासन
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. याच योजनेमुळे भाजप-महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठ्या बहुमताने विजय मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला योजनेच्या रकमेत वाढ होण्याची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 8 महिन्यांपासून महागाई भत्ता न मिळाल्याने संतप्त आहे. सरकारी कर्मचारी काम बंद आंदोलनाची तयारी करत आहेत.
हेदेखील वाचा : Pune News: आधी रस्ते दुरुस्तीसाठी कोट्यावधींचा खर्च अन् पुन्हा ‘या’ कारणासाठी करणार खोदाई; पालिकेचे नेमके चाललंय तरी काय?
राज्यात सरकारी, निमशासकीय, शिक्षक, शिक्षकेतर, महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि अधिकारी श्रेणींसह सुमारे 17 लाख कर्मचारी आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना गेल्या सुमारे 8 महिन्यांपासून महागाई भत्त्याचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढू लागला आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत दरमहा देण्यात येणाऱ्या अंदाजे 3,700 कोटी रुपयांमुळे सरकारी तिजोरी रिकामी झाली आहे.
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता सरकार तूर्त लाडकी योजना सुरू ठेवणार असून, लाडकी बहीण योजनेची रक्कम दरमहा 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची तयारीही करत आहे. या मुद्यावर सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
गतवर्षी ऑगस्टमध्ये एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले होते की, लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण पडत असून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेवर परिणाम होतो. या योजनेमुळे राज्याला दरवर्षी 46,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च येईल, असा अंदाज आहे.
बहिणींची संख्या आणखी कमी होणार?
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांच्या संख्येत आणखी घट होण्याची शक्यता आहे. अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना आता या योजनेतून वगळण्यात येणार आहे. उत्पन्नाच्या माहितीसाठी आयकर विभागाचीही मदत घेतली जाईल.
योजनेंतर्गत किती मिळतात पैसे?
या योजनेअंतर्गत अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना राज्य सरकारकडून दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. महायुती सरकारची ही योजना राज्यातील गरीब कुटुंबांसाठी खूप उपयुक्त ठरली. त्यामुळे, लाडक्या बहिणींनी आनंद व्यक्त केला आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा निवडून दिले. यानंतर, लाडकी बहिण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आता कमी होत आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या लाडकी बहिणींवर कारवाई केली जात आहे. अशा महिलांचे अर्ज नाकारले जात आहेत.
हेदेखील वाचा : Purandar Airport: “विमानतळ प्रकल्पातील शेतकऱ्यांना रिंग रोड प्रमाणेच…”; आमदार विजय शिवतारेंनी व्यक्त केला विश्वास