Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद! स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेले ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 12, 2025 | 08:33 PM
अभिमानास्पद! स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेले 'इंडिया हाऊस' महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

अभिमानास्पद! स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वास्तव्य असलेले 'इंडिया हाऊस' महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

Follow Us
Close
Follow Us:

लंडनमधील “इंडिया हाऊस” महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार
इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य
सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांची माहिती

मुंबई: भारतीय स्वातंत्र्यसैनिकांचे वास्तव्य असलेले लंडनमधील “इंडिया हाऊस” महाराष्ट्र शासन ताब्यात घेऊन त्यास स्मारक म्हणून जतन करेल. या ‘इंडिया हाऊस’मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे वास्तव्य होते, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी दिली.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार हे नागपूरकरचे रघूजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार आणण्यासाठी लंडन दौऱ्यावर होते, तेव्हा त्यांनी इंडिया हाऊसला भेट दिली होती. त्यावेळी लंडनस्थित भारतीयांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. तसेच नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनीही ही मागणी केली होती. याबाबत आमदार देवयानी फरांदे, सामान्य प्रशासन, सांस्कृतिक कार्य, पुरातत्व विभागासह संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक घेऊन आढावा घेण्यात आला.

“मित्रा”च्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून त्यात सामान्य प्रशासन विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग आणि वित्त विभागाचा सहभाग असेल. ही समिती ‘इंडिया हाऊस’ ताब्यात घेण्याबाबतचा सर्वंकष अहवाल तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार,अशी माहिती यावेळी देण्यात आली.

रामटेक फिल्मसिटीसाठी जागेचा प्रश्न सुटेना?

विदर्भात चित्रपट निर्मिती आणि रोजगाराची संधी उपलब्ध होण्यासाठी रामटेक येथे चित्रनगरी उभारण्यात येत आहे. मात्र या चित्रनगरीसाठी येत्या दोन महिन्यात जमीन हस्तांतरित करण्याचा आणि प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला होता. मात्र, हा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप जागेचा प्रश्न सुटेनासा झाला आहे. तर, जागेचा तिढा सुटत नसल्याने प्रकल्प सल्लागाराचीही नियुक्ती रखडली आहे.

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी नागपुरात येऊन ही घोषणा केली होती. परंतु गेल्या दोन महिन्यात विदर्भांतील सांस्कृतिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्वाच्या ठरू पाहणाऱ्या या प्रकल्पाचे नेमके काय होणार, याबद्दल नागपूरवासियांसह वैदर्भीय कलावंतांचेही लक्ष लागले आहे.

मनमानी कर आकारणीने नागरिक संतप्त, दारव्हानगर पालिकेच्या कारभारावर रोष; नोटीसची केली होळी

रामटेक जवळच्या नवरगाव येथे प्रस्तावित चित्रनगरीच्या जागेची पाहणी सांस्कृतिक कार्यमंत्री शेलार यांनी केली होती. त्यानंतर त्यांनी दोन महिन्यात जमीन हस्तारण व प्रकल्प सललागार नियुक्तीची घोषणा केली होती. रामटेकच्या प्राचीन गड मंदिर परिसरात भाविकांसाठी अद्ययावत सोयी सुविधा उभारण्यासंदर्भात पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Web Title: Maharashtra government take over historic india house in london said ashish shelar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 08:25 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • London
  • V. D. Savarkar

संबंधित बातम्या

Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”
1

Ashish Shelar : “महायुतीत लढण्याचा आमचा सर्वसाधारण निर्णय”

Maharashtra Politics: “विरोधी पक्षाला फायदा होऊ नये…”; आशिष शेलार यांचे महायुतीबाबत महत्वाचे विधान
2

Maharashtra Politics: “विरोधी पक्षाला फायदा होऊ नये…”; आशिष शेलार यांचे महायुतीबाबत महत्वाचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.