Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबई-ठाण्याला यलो अलर्टचा इशारा

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नंदुरबारला रेड अलर्ट, मुंबई, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोलीतील मेड्डीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे उघडण्यात आले असून पंढरपुरातील चंद्रभागा नदीला पूर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 12:44 PM
अनेक राज्यांत मुसळधारेसह विजांचा कहर

अनेक राज्यांत मुसळधारेसह विजांचा कहर

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर
  • ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट
  • तर मुंबई-ठाण्याला यलो अलर्टचा इशारा
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Maharashtra Rain Update) अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले असून, हवामान विभागाने विविध भागांसाठी इशारे जारी केले आहेत. नद्या, धरणे आणि जलाशयांतील पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्याने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रशासन सतर्क झाले आहे.

मुंबई, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई केंद्राने मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी पुढील तीन तासांचा यलो नाऊकास्ट अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Nashik Rain Update: मंदिरे पाण्याखाली, पंचवटीतील रामसेतू जलमय; मुसळधार पावसाचा नाशिकला फटका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नंदुरबारमध्ये रेड अलर्ट; शाळांना सुट्टी

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी विनाकारण प्रवास टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गडचिरोलीत धरणाचे सर्व 85 दरवाजे उघडले

गडचिरोली जिल्ह्यातील मेड्डीगट्टा लक्ष्मी धरणातून सुमारे 9.71 लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून धरणाचे सर्व 85 दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे प्राणहिता आणि गोदावरी नदीकाठच्या सखल भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुण्यात विक्रमी पावसाची नोंद

यंदाच्या मान्सूनमध्ये पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा 179.9 टक्के अधिक पाऊस झाला आहे. 31 जुलैपर्यंत अपेक्षित 309.3 मिमी पावसाच्या तुलनेत 556.3 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मावळ तालुक्यात 1680.3 मिमी इतका सर्वाधिक पाऊस झाला असून, खेड तालुक्यात सरासरीच्या 390.9 टक्के पाऊस नोंदवला गेला आहे.

पंढरपुरात चंद्रभागा नदीला पूर

उजनी धरणातून 80 हजार क्यूसेक आणि वीर धरणातून 43 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने भीमा आणि चंद्रभागा नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंढरपुरातील पुंडलिक मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याने वेढली असून, भीमा नदीवरील आठ कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व घाटांवर भाविकांच्या स्नानावर बंदी घालण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात पावसाने दिलासा

गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे जालना जिल्ह्यातील 50 पैकी 39 महसूल मंडळांमध्ये 65 मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 83 मिमी पावसाची नोंद झाली असून भोकरदन तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. बदनापूर आणि मंठा तालुक्यांत तीन घरांचे नुकसान झाले असले तरी या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून बहुतांश नद्या-नाले पुन्हा प्रवाही झाले आहेत.

Weather Update : ‘तो’ पुन्हा येतोय?’ राज्यात पावसाने घेतली विश्रांती; उकाडा वाढला, 21 जुलैनंतर पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

Web Title: Maharashtra heavy rain red alert nandurbar yellow alert mumbai pandharpur chandrabhaga flood

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 12:44 PM

Topics:  

  • maharashtra
  • Monsoon Update
  • Rain Update

संबंधित बातम्या

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर
1

‘खोटं बोलू नका, रोजच लोडशेडिंग आहे’; कैलास पाटलांनी सरकार अन् महावितरणला धरले धारेवर

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
2

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज
3

National Carrom Selection : कॅरमपटूंना इटलीतील अजिंक्यपद खेळण्याची नामी संधी! निवड चाचणीसाठी महाराष्ट्राचा संघ सज्ज

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले
4

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुन्हा चर्चेत; विद्यार्थ्यांच्या मेसच्या थाळीचे दर १० रुपयांनी वाढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.