मंदिरे पाण्याखाली, पंचवटीतील रामसेतू जलमय; मुसळधार पावसाचा नाशिकला फटका, नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
पंचवटी : बुधवार (22 जुलै 2026) सायंकाळपासून नाशिक शहरासह गंगापूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली. गंगापूर धरणातून सकाळी नऊ वाजेपासून ते सायंकाळपर्यंत टप्प्याटप्याने पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि पंचवटी परिसरात पुराचे रौद्र रूप पाहायला मिळाले. या वर्षीचा पहिला मोठा पूर असल्याने पूर पाहण्यासाठी रामकुंड, होळकर पूल, दुतोंड्या मारुती परिसर आणि नदीकाठावर नागरिकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी मोबाईल कॅमेऱ्यात पुराचे दृश्य टिपण्याचा मोह आवरला नाही. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी यावेळी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
पुरामुळे गोदावरी नदीलगत असलेली खंडोबा मंदिर, शिव मंदिर, मारुती मंदिर, दत्त मंदिर यांसह अनेक लहान-मोठी मंदिरे पाण्याखाली गेली. पंचवटीतील ऐतिहासिक रामसेतू पूलही पूर्णपणे जलमय झाला. दुपारी सुमारे तीन वाजेपर्यंत पुराचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या हनुवटीपर्यंत पाणी पोहोचले, तर कपालेश्वर मंदिराच्या पायरीलाही पुराच्या पाण्याचा पहिला स्पर्श झाला.
गंगापूर धरण परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक वाढली असून त्यानुसार धरणातून टप्प्याटप्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सायंकाळपर्यंत विसर्गाचे प्रमाण आणखी वाढविण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी, नदीपात्रात किया नदीकाठावर जाऊ नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केले. पूर परिस्थितीत नागरिकांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
गंगा-गोदावरी मंदिरासमोरील गांधी ज्योत परिसरात एक परप्रांतीय भाविक पुराच्या पाण्यात अडकला होता. सकाळी सुमारे आठ वाजल्यापासून अग्निशमन दल, आपती व्यवस्थापन पथक आणि अन्य बचाव यंत्रणांनी संयुक्तपणे रेस्क्यू मोहीम हाती घेतली, अनेक तासांच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित भाविकाची सुखरूप सुटका करण्यात आली. बचावकार्य सुरू असतानाच अग्निशमन दलाच्या जवानांनी नदीकाठावरील नागरिकांना सातत्याने कलेच्या सूवना दिल्या हानिक्षेपकादारे पुराचे पाणी पाहण्यासाठी जीव धोक्यात घालू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे वारंवार आवाहन करण्यात येत होते. मात्र, तरीही अनेक ठिकाणी नागरिकांनी पुरावे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले.






