Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवलीत उद्या शाळा-कॉलेजेस बंद! मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सोमवार ६ जुलै २०२६ रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवलीतील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे. रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 05, 2026 | 09:40 PM
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवलीत उद्या शाळा-कॉलेजेस बंद! (Photo Credit- AI)

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवलीत उद्या शाळा-कॉलेजेस बंद! (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि कल्याण-डोंबिवलीत उद्या शाळा-कॉलेजेस बंद!
  • मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय
  • ‘रेड आणि ऑरेंज अलर्ट’ जारी
मुंबई: मुंबईसह संपूर्ण उपनगर, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली आणि कोकण किनारपट्टीवर गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने (Heavy Rainfall) हाहाकार माजवला आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून नद्यांना पूर आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे.
⛈️🚨भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगराला सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी मुसळधार पावसाचा (Orange Alert) तसेच सोसाट्याचे वारे वाहतील, असा इशारा दिला आहे. 🏫 या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना… — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 5, 2026


या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील शासकीय, खासगी आणि महानगरपालिका शाळा, महाविद्यालयांना उद्या, सोमवार, दिनांक ६ जुलै २०२६ रोजी सुटी जाहीर करण्यात येत आहे. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहनदेखील बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. मुंबईसह ठाणे जिल्ह्यात देखील शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली, बदलापूरमध्ये देखील शाळा महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबईत मुसळधार पावसात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू; महापौर रितू तावडे यांच्याकडून ५ लाखांची मदत, तर किशोरी पेडणेकरांचा थेट हल्ला

उद्या नवी मुबंई पालिकेच्या सर्व शाळाना सुट्टी जाहीर

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांनी निर्गमित केलेल्या उपरोक्त आदेशाच्या अनुषंगाने तसेच आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिकायांच्या निर्देशानुसार, उद्या सोमवार, दिनांक 06 जुलै 2026 रोजी अतिवृष्टी विचारात घेऊन विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे. सदर आदेशाची सर्व संबंधित शाळांनी तात्काळ अंमलबजावणी करावी. तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षकांना याबाबतची माहिती त्वरित कळविण्यात यावी असा आदेश पालिकेकडून जारी करण्यात आला आहे.

रायगड आणि पालघरमध्ये ‘हाय अलर्ट’

रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि लहान मुलांचे हाल होऊ नयेत, यासाठी रायगड आणि पालघर जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलत सोमवारी शाळा-कॉलेजेसना सुटी दिली आहे. कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Weather Update : ‘६ जुलैपर्यंत अतिशय मुसळधार पाऊस अन् वादळी…’, रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

Web Title: Maharashtra heavy rain school college holiday declared in mumbai thane palghar raigad kalyan dombivli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 09:40 PM

Topics:  

  • mansoon
  • Mumbai Rain
  • School Holiday

संबंधित बातम्या

मुंबईत मुसळधार पावसात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू; महापौर रितू तावडे यांच्याकडून ५ लाखांची मदत, तर किशोरी पेडणेकरांचा थेट हल्ला
1

मुंबईत मुसळधार पावसात झाड कोसळून वृद्धाचा मृत्यू; महापौर रितू तावडे यांच्याकडून ५ लाखांची मदत, तर किशोरी पेडणेकरांचा थेट हल्ला

Jagbudi River Flood: रत्नागिरीत मुसळधार पाऊस; खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी
2

Jagbudi River Flood: रत्नागिरीत मुसळधार पाऊस; खेडमधील जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी, बाजारपेठेत शिरले पुराचे पाणी

Karjat Rains Alert: कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार! २४ तासांत २९१ मिमी पावसाची नोंद, उल्हास नदीला पूर; तर ३० हून अधिक…
3

Karjat Rains Alert: कर्जतमध्ये पावसाचा हाहाकार! २४ तासांत २९१ मिमी पावसाची नोंद, उल्हास नदीला पूर; तर ३० हून अधिक…

डोंबिवलीतील मानपाडा माणगाव परिसर जलमय; आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून केली पाहणी
4

डोंबिवलीतील मानपाडा माणगाव परिसर जलमय; आमदार राजेश मोरे यांनी पाण्यात उतरून केली पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.