Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? लोकसभेच्या 24 आणि विधानसभेच्या 100 जागा वाढणार? केंद्राचा नवा प्लॅन!

आगामी 16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, यामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत (Delimitation) मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 07, 2026 | 08:38 PM
महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? (Photo Credit- AI)

महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार? (Photo Credit- AI)

Follow Us
Follow Us:

  • महाराष्ट्राच्या राजकारणात गणिताचा खेळ बदलणार?
  • लोकसभेच्या 24 आणि विधानसभेच्या 100 जागा वाढणार?
  • केंद्राचा नवा प्लॅन!
Maharashtra Politics: देशातील राजकीय संरचनेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. आगामी 16 एप्रिल रोजी लोकसभेचे एक विशेष अधिवेशन बोलावण्यात आले असून, यामध्ये मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत (Delimitation) मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते. प्राथमिक माहितीनुसार, महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा 84 वरून थेट 72 वर, तर विधानसभेच्या जागा 400 च्या पार जाण्याची दाट शक्यता आहे.

विशेष अधिवेशनात ‘महिला आरक्षण’ आणि ‘जागा वाढी’वर शिक्कामोर्तब?

नुकतेच संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले असताना, अचानक 16 एप्रिलपासून तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अधिवेशनात 33 टक्के महिला आरक्षण लागू करण्यासोबतच खासदारांच्या संख्येत मोठी वाढ केली जाऊ शकते. सध्या देशात लोकसभेच्या 543 जागा आहेत, त्या थेट 816 पर्यंत वाढवण्याचे मोदी सरकारचे नियोजन असल्याचे समजते. यामध्ये 273 जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जाऊ शकतात.

महाराष्ट्राच्या वाट्याला येणार 24 अतिरिक्त जागा

मतदारसंघांच्या या नव्या गणितात महाराष्ट्राला मोठा वाटा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या लोकसभेच्या 48 जागा आहेत. या प्रस्तावित निर्णयानुसार त्यात 24 जागांची भर पडून ही संख्या 72 वर पोहोचू शकते. तर, राज्याच्या विधानसभेत सध्या 288 सदस्य आहेत. पुनर्रचनेनंतर यात 100 पेक्षा जास्त जागा वाढून हा आकडा 400 च्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यामुळे राज्याच्या राजकीय समीकरणांमध्ये पूर्णपणे बदल होतील.

अवकाळीचा तडाखा! Maharashtra Government ने उघडली तिजोरी; शेतकऱ्यांना 128 कोटींची मदत जाहीर

कोणत्या शहरांमध्ये वाढणार मतदारसंघांचा दबदबा?

लोकसंख्या वाढीचा निकष लावून नव्या मतदारसंघांची आखणी केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील प्रमुख शहरांवर अधिक लक्ष केंद्रित केले जाण्याची शक्यता आहे:

1. मुंबई: मुंबईत लोकसभेच्या किमान 2 ते 3 जागा वाढू शकतात.

2. पुणे, नागपूर, ठाणे आणि नाशिक: या वेगाने विस्तारणाऱ्या शहरांमधील वाढत्या लोकसंख्येनुसार नवीन लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात येतील. विशेषतः उपनगरांमध्ये जिथे नागरीकरण वेगाने झाले आहे, तिथे मतदारांची संख्या वाढल्याने प्रशासकीय सोयीसाठी नवीन मतदारसंघांची निर्मिती अनिवार्य ठरणार आहे.

राजकीय गणिते आणि सत्तेचा सारीपाट

मतदारसंघांच्या या वाढीमुळे प्रस्थापित नेत्यांपुढे नवीन आव्हाने उभी राहतील, तर नवीन चेहऱ्यांना राजकारणात संधी मिळेल. महिला आरक्षणाची अंमलबजावणी झाल्यास अनेक पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये फेरबदल होतील. या निर्णयामुळे प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढणार की राष्ट्रीय पक्षांना अधिक फायदा होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या संदर्भातील अधिकृत आकडेवारी आणि सविस्तर आराखडा 16 एप्रिलच्या अधिवेशनातच स्पष्ट होईल. मात्र, या संभाव्य ‘मास्टरस्ट्रोक’मुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाची दिशा बदलणार, हे निश्चित.

CM Devendra Fadnavis : भोंदू खरातची आता ED चौकशी होणार ! देवेंद्र फडणवीसांची घोषणा

Web Title: Maharashtra lok sabha and vidhan sabha seats increase delimitation 2026 updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:38 PM

Topics:  

  • Central Governement
  • Loksabha
  • Maharashtra Politics
  • Vidhan sabha

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 
1

Maharashtra Breaking News Today 2026 : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन: लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींच्या मोठ्या घोषणा 

Maharashtra Breaking News Live Updates Today:  ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच
2

Maharashtra Breaking News Live Updates Today: ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचीच अन शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर
3

Mira Bhayandar News: उत्तनसह ५ गावांचे सिटी सर्वेक्षण ९ वर्षांपासून रखडले; आगरी-कोळी नागरिकांच्या मालकी हक्काचा प्रश्न ऐरणीवर

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब
4

Mira Bhayandar: ५०० कोटींच्या कर्जप्रस्तावावरून भाजप अडचणीत? नगरविकास विभागाकडून महापालिकेकडे हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.