Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशोक खरातचा नवीन कारनामा पीडित महिलेला धमकी देऊन केले अत्याचार – तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले, माझ्याशी विवाह कर !

अशोक खरात एकूण मालमत्ता सुमारे ₹४०.८७ कोटी असल्याचा अंदाज आहे.आरोपीकडे सोने, जमीन, बँक खाती आणि गुंतवणूक असल्याचे समोर आले आहे.महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत.

  • By Dilip Bane
Updated On: Mar 25, 2026 | 12:37 PM
Ashok Kharat Crime

Ashok Kharat Crime

Follow Us
Follow Us:
  • स्वयंघोषित तांत्रिक अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.
  • पोलिसांनी तपासासाठी आणखी ७ दिवसांच्या कोठडीची मागणी केली.
  • महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप आहेत.
  • डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम अद्याप सुरू आहे.
  • आरोपीकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.
  • त्या पिस्तुलाचा वापर करून ५ नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
 

मुंबई/नाशिक, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क.
महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित तांत्रिक अशोक खरात याला मंगळवारी नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी सांगितले की, अशोक खरात विरोधात गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत. त्याच्या तपासासाठी आणखी वेळ हवा आहे. खासकरून, लैंगिक अत्याचाराशी संबंधित प्रकरणांमध्ये डिजिटल पुरावे गोळा करण्याचे काम अद्याप सुरू आहे. त्यामुळे पोलिसांना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे. यावेळी वकिलांनी सांगितले की, तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीकडून एक पिस्तूल जप्त केले आहे. या पिस्तूलाचा वापर करून 5 नरबळी दिल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यासंदर्भातील काही प्राथमिक पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. तसेच, आरोपीकडे काही मालमत्तेची कागदपत्रेही सापडली आहेत. त्याद्वारे अनेक लोकांची फसवणूक केल्याचा संशय असून आणखी तपासासाठी त्यांची चौकशी करायची असल्याचे सांगितले.

Ashok Kharat Education : अंकातून भविष्य मांडणार भोंदूबाबा गणितात फेल; अशोक खरात 10 वी नापास

राज्यभर खळबळ उडविणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातलैंगिक शोषण प्रकरणाला आणखी एक धक्कादायक वळण लागले आहे. खरातने एका महिलेला धार्मिक विधी करायचा असे सांगून बोलावून घेतले आणि तिच्यावर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. अशोक खरात याने फेब्रुवारी २०२० पासून आरोपीने महिलेला एकांतात बोलावून धार्मिक विधी करण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला. या महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आहे.
अशोक खरात याने ‘तुझे भविष्य माझ्याशी जोडलेले आहे, माझ्याशी विवाह कर’ असे सांगत तिच्यावर दबाव टाकला. मे २०२२ मध्ये आरोपी खरातने कार्यालयात बोलावून मंतरलेले पाणी पाजून असाच अत्याचार केला. यानंतरही अनेक वेळा अशाच प्रकारे अत्याचार करण्यात आले. ‘यासंदर्भात कुणाला सांगितले तर तुझे व तुझ्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त होईल’ अशी धमकीवजा भीती घालून आरोपी अशोक खरात याने गप्प बसवले, असे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले

३२ तोळे सोने, अनेक एकर जमीन : सीएम

खरात महिलांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सविस्तर निवेदन केले. मिळालेल्या माहितीतून आरोपीची संपत्ती कोठे कोठे आहे, याची माहिती संकलित करण्यात आली आहे”, असे सांगत फडणवीस यांनी खरातच्या संपत्तीची भलीमोठी यादी वाचून दाखवली. अशोक खरात याच्याकडे १२ तोळे, तर त्याच्या पत्नीकडे २० तोळे सोने असल्याचेही फडणवीसांनी सांगितले. त्याच्या नावावर अनेक एकर जमीन तसेच पत्नीच्या नावाने असलेल्या डीमॅट अकाऊंटवरून एक ते दोन लाखांची गुंतवणूक, पाच बँक खाती आहेत. आरोपीकडे ४० कोटी ८७ लाख रुपयांचे बाजारमूल्य आहे”, अशी माहिती फडणवीसांनी राज्याला दिली.

२९ पर्यंत पोलिस कोठडी

अशोक खरातची पोलिस कोठडीची मुदत मंगळवारु संपली होती. यावेळी आतापर्यंत तपासात काय निष्पन्न झाले, याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली. यानंतर न्यायालयाने खरातला 5 दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

“पतीच्या मरणाची भीती घालून महिलेवर वारंवार…”: Ashok Kharat प्रकरणात CM फडणवीसांचे निवेदन

Web Title: Maharashtra news shocking developments in ashok kharat sexual exploitation case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • devendra fadnavis
  • Marathi News

संबंधित बातम्या

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
1

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई
2

FSSAI Action On Pan Masala : पान मसाला खाणाऱ्यांना मोठा झटका! FSSAI कडून ‘या’ गोष्टीवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!
3

गादीसाठीच्या संघर्षात नव्या दावेदारांची एंट्री, Mirzapur The Movie चा ट्रेलर रिलीज; आता थेट थिएटरमध्ये होणार धुमाकूळ!

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी
4

Plastic Currency : प्लास्टिकच्या 1 अब्ज नोटा बनणार… RBI चा मोठा निर्णय, 10 आणि 20 रुपयांच्या ट्रायल करंन्सीला मंजुरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.