Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत

Maharashtra Nurses Protest: राज्यातील नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांवरून सध्या वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. निलिमा सोनवणे यांनी संतुलित आणि वैचारिक भूमिका मांडली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 28, 2026 | 07:21 PM
Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत
Follow Us
Follow Us:
  • नर्सेसच्या बदल्यांवरून वाद
  • हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी भावनांचा प्रश्न
  • प्रशासकीय बदल्यांना विरोध का करत आहेत?
राम खांदारे

राज्यातील नर्सिंग कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा (सुश्रुषा) सहा. संचालक डॉ. निलिमा सोनवणे यांनी संतुलित आणि वैचारिक भूमिका मांडली आहे. शासनाच्या सहा वर्षांनंतर बदलीच्या धोरणाचे समर्थन करतानाच त्यांनी महिला नर्सेसच्या कौटुंबिक आणि सामाजिक अडचणींनाही न्याय दिला. ‘हा केवळ नियमांचा विषय नाही, तर मानवी भावना, कुटुंब आणि सेवाव्यवस्थेतील संतुलनाचाही प्रश्न आहे,’ असे त्या म्हणाल्या.

बस चालक-कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी MSRTC-HNCII पुढे; कर्करोग तपासणी आणि जनजागृती अभियान

नर्सेस प्रशासकीय बदल्यांना विरोध का करत आहेत?

नर्सिंग हा स्त्री-बहुल व्यवसाय आहे. सुमारे ९० टक्के कर्मचारी महिला आहेत. सहा वर्ष एका ठिकाणी काम केल्यानंतर त्यांचे कुटुंब, मुलांचे शिक्षण, घराचे हप्ते, सामाजिक आयुष्य त्या ठिकाणी स्थिरावलेले असते. अचानक बदली झाल्यावर पती-पत्नी वेगवेगळ्या शहरांत राहण्याची वेळ येते. काही परिचारिका ५०-५७ वयोगटातील असतात. त्यामुळे त्यांचा विरोध चुकीचा आहे, असे म्हणता येणार नाही.

मग शासनाच्या बदली धोरणाचे समर्थन कशासाठी?

शासन निर्णयानुसार प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याची ठराविक कालावधीनंतर बदली होणे अपेक्षित आहे. जर मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांमध्ये काम करणाऱ्या नर्सेस कायम तिथेच राहिल्या, तर ग्रामीण रुग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांना शहरात येण्याची संधीच मिळणार नाही. त्या सेवेत असें पर्यंत ग्रामीण भागात राहव्या का?. त्यामुळे दोन्ही बाजूंनी विचार करणे गरजेचे आहे.

बदल्यांमध्ये मानवी दृष्टिकोन ठेवला जातो का?

निश्चितच. आमच्याकडे गंभीर आजार असलेल्या अनेक परिचारिका येतात. एका कर्मचाऱ्याला पायाचा गंभीर आजार होता, तर दुसरीची कॅन्सरची ट्रीटमेंट मुंबईत सुरू होती. त्यांचा दूरधर आजाराचा रिक्त जागा नसतानाही सेवा वर्ग करून त्यांना मदत करण्यात आली. त्यामुळे प्रशासन फक्त नियमांवर चालत नाही, तर संवेदनशीलतेनेही निर्णय घेतो.

बदल्यांमध्ये पारदर्शकता कशी ठेवली जाते?

आता बदल्या पूर्वीसारख्या अचानक होत नाहीत. कर्मचाऱ्यांना बोलावून रिक्त जागांची माहिती दिली जाते. त्यांचे पसंतीक्रम घेतले जातात. कर्मचारी आजारी असणे, अपंगत्व, कॅन्सर, पती-पत्नी एकत्रीकरण, मुलांचे विशेष आजार, शाहिद जावनांच्या पत्नी आणि विधवा महिला अशा निकषांनुसार शासनाने प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. त्यानुसार समुपदेशनातून बदल्या केल्या जातात. या सर्व प्रक्रियांचे व्हीडिओ रेकॉर्ड केले जाते.

समुपदेशनातून हा प्रश्न सुटू शकतो का?

बऱ्याच अंशी होऊ शकतो. दोन्ही बाजूंच्या अडचणी समजून घेतल्या, तर संघर्ष कमी होतो. हा फक्त बदल्यांचा प्रश्न नसून, सेवाव्यवस्थेतील न्याय आणि मानवी संवेदनांचा समतोल राखण्याचा प्रयत्न आहे.

Maharashtra tourism : घोडेवाले, फोटोग्राफर, विक्रेत्यांना ड्रेस कोड बंधनकारक, पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाचगणीत नवा नियम

Web Title: Maharashtra nursing transfer controversy dr nilima sonawane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 07:09 PM

Topics:  

  • Department of Health
  • maharashtra
  • Nurses

संबंधित बातम्या

Maharashtra Health Department GR : महाराष्ट्रात खाजगी रुग्णालयांसाठी उपचारांचे दर प्रदर्शित करणे अनिवार्य
1

Maharashtra Health Department GR : महाराष्ट्रात खाजगी रुग्णालयांसाठी उपचारांचे दर प्रदर्शित करणे अनिवार्य

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे
2

Solapur : पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपचाच विजय होणार, जयकुमार गोरे

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई
3

Bhandara News: बनावट दस्तऐवज सादर करून लाखोंची फसवणूक! दोघांविरुद्ध गुन्हा दाखल; सायबर गुन्ह्याची कारवाई

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी
4

दुष्काळात शेतकरी हवालदिल, भाजप नेत्यांची १०० कोटींची उधळपट्टी? काँग्रेस आक्रमक; शेलार-चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.