पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदीसाठी ३० ऑक्टोबरपासून नोंदणी सुरू करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारने कापसाच्या MSP मध्ये मोठी वाढ केली असून, खरेदीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात…
Talathi Post: पेसा क्षेत्रातील पदांवर न्यायालयीन प्रलंबन २०२३ च्या तलाठी भरतीत एकूण ४६१२ पदांसाठी काही गैरप्रकार आणि पेसा क्षेत्रातील पदांवरून विवाद झाले होते.
राज्य शासनाच्या माध्यमातून रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ साकारत आहे. तेथे प्रवेश प्रक्रिया होऊन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. राज्य शासनाने महानुभाव पंथाच्या विविध स्थळांच्या विकासासाठी निधी मंजूर केला.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या योजनेवरून विरोधकांकडून अनेकदा जोरदार निशाणा साधला जात आहे. त्यातच अनेक पुरुषांनी या योजनेतून लाभ घेतल्याचे समोर आले आहे.
सध्या ई-केवायसीद्वारे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असलेल्या महिलांचा शोध सुरु होता. यात महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात आहे.
राज्याच्या महसूल विभागाकडून अनेक लोकाभिमुख योजना राबवण्यात येत असून, त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अधिकाऱ्यांचा मोठा वाटा असतो. त्यांच्या पदोन्नतीमुळे आणि बदल्यांमुळेही हा कामे अधिक गतीने होण्यास मदत होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली युद्धपातळीवर काम सुरू आहे. ही मदत शेतकऱ्यांचे जीवन सुसहाय करेल, असा विश्वास जाधव-पाटील यांनी व्यक्त केला.
नैसर्गिकआपत्तीत मृत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना तसेच पशुधनाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि घरांची पडझड झालेल्या नागरिकांना मदत थेट जिल्हास्तरावरूनच दिली जाणार आहे.
ट्रकमध्ये बसवलेले सेन्सर आणि स्मार्ट तंत्रज्ञानामुळे अधिक भाराचे निदान होईल, ज्यामुळे वाहतूक नियमांचे पालन आणि अपघात नियंत्रण साधले जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ई-केवायसी प्रक्रियेत तांत्रिक अडचणींचा व्यत्यय येत असल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. ग्रामीण भागातील महिलांना कनेक्टिव्हिटीच्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
इंडिया मेरीटाईम वीक २०२५ च्या निमित्ताने देशासह राज्याच्या सागरी विकासात मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. सागरी गुंतवणुकीसाठी राज्यात पोषक वातावरण असून या ‘मेरीटाईम वीक’ मुळे त्यास आणखी चालना मिळेल.
युवकांचा सर्वांगीण विकास साधणे, भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करणे, तसेच युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे या उद्देशाने प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते.
स्थानिक स्वराज्य संस्थांना या कार्यक्रमाच्यानिमित्ताने पर्यावरण क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमात वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली धोरणात्मक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण झाली.
शासनाने आता एआय स्वीकारण्याचे धोरण सुरू केले आहे. हे तंत्रज्ञान सर्वांसाठी खुले असून यात प्रत्येक जण आपल्या कल्पनांना वास्तवात आणू शकणार आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
काही महिला घरातील सुशिक्षित मुला-मुलींच्या माध्यमातून मोबाईलद्वारे केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या केवायसीसाठी शासनाकडून उपलब्ध असलेले पोर्टल वा सर्व्हर सातत्याने बंद पडत आहे.
विशेषतः दोन राज्यांमध्ये ज्या पद्धतीनं चुकीची औषधं झाली आणि त्याचा फटका लहान मुलांना बसला. त्याबद्दल केंद्र सरकारनं जे निर्देश दिले आहेत, त्याची अंमलबजावणी राज्याचे आरोग्य विभाग करत आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात पावसाने कहर केला. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला हात पावसाने हिरावून घेतल्याचे पाहायला मिळाले.