Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Don Baba Farzan : बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गुन्हेगारी विश्वातील तसेच कामगार नेते म्हणून ओळख असलेल्या बाबा फर्जन दोरडी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्ता, बेहिशेबी रोख रक्कम आणि शस्त्रसाठ्याचा तपास अधिक वेगाने सुरू आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 13, 2026 | 12:30 PM
बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

बाबा फर्जनच्या फार्महाऊसची पुन्हा झाडाझडती; मुद्देमालावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : गुन्हेगारी विश्वातील तसेच कामगार नेते म्हणून ओळख असलेल्या बाबा फर्जन दोरडी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मालमत्ता, बेहिशेबी रोख रक्कम आणि शस्त्रसाठ्याचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. रविवारी छावणी पोलिसांनी फार्महाऊसची पुन्हा झडती घेऊन दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या शीला बाबा फर्जन दोरडी हिची चौकशी केली. खासगी खोलीत कधीच प्रवेश नव्हता, त्यामुळे तेथील रोख रक्कम, दागिने किंवा शस्त्रांबाबत माहिती नसल्याचा दावा तिने केला आहे.

 

सोमवारी (आज) काळा दरवाजा परिसरातील बंगल्याची झडती घेतली जाणार असून, प्राप्तिकर विभागाच्या हालचालींकडेही लक्ष लागले आहे. चौकशीत शीला दोरडी हिने आपण केवळ स्वयंपाकघर, डायनिंग रूम आणि बैठक खोलीपर्यंतच वावरत असल्याचे सांगितले. बाबा फर्जन यांच्यासाठी जेवण-पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी तिच्याकडे होती. मात्र, त्यांच्या खासगी खोलीत त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही जात नव्हते. त्यामुळे तेथे ठेवलेल्या बेहिशेबी रोख रक्कम, दागिने किंवा शस्त्रांबाबत कोणतीही माहिती नसल्याचा दावा तिने केला आहे. १३ जून रोजी उपचारासाठी रुग्णालयात नेताना बाबा फर्जन यांनी खोलीची चावी सुरेश वर्मा याच्याकडे दिल्याची माहिती तपासात समोर आली आहे. मात्र, सुरेश वर्मा यालाही प्रथमच पाहत असल्याचे शीला हिने सांगितले असून, या दाव्याची पोलिसांकडून पडताळणी सुरू आहे.

काळा दरवाजा येथील बंगल्याची झडती

आरोपी शीला बाबा फर्जन दोरडी हिची आजही सविस्तर चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतर काळा दरवाजा परिसरातील रोहिला गल्ली रोडवरील बंगल्याची झडती घेतली जाणार आहे. संबंधित बंगला बाबा फर्जन यांनी हक्कसोडपत्राद्वारे आपल्या भावाच्या नावावर करून दिल्याची माहिती तपासात समोर आली असून, त्या अनुषंगाने कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांची तपासणी केली जाणार असल्याची माहिती सहायक निरीक्षक जाधव यांनी दिली.

नातेवाईकांच्या चौकशीची तयारी

मालमत्ता, आर्थिक व्यवहार आणि बेहिशेबी संपतीचा तपशील उलगडण्यासाठी पोलिस आता नातेवाईकांची चौकशी करणार आहेत. प्रथम छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर पुण्यातील नातेवाईकांकडून माहिती घेतली जाणार असल्याचे छावणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

मुद्देमालावर कडेकोट पोलिस बंदोबस्त

बाबा फर्जन यांच्या बंगल्यातून जप्त केलेली कोट्यवधींची रोख रक्कम, दागिने, शस्त्रसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी छावणी पोलिसांनी स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. जप्त मुद्देमालावर २४ तास पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. पुराव्यांमध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.

Web Title: The police have conducted a thorough search of baba farjans farmhouse

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी
1

पुणे पोलिसांसमोर दुहेरी आव्हान, महिलांवरील अत्याचार अन् चोरीच्या घटना वाढल्या; जाणून घ्या वर्षभरातील आकडेवारी

अल निनोच्या सावटात पीक नियोजन बदला! कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला; पावसाचा खंड पडण्याची शक्यता
2

अल निनोच्या सावटात पीक नियोजन बदला! कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला; पावसाचा खंड पडण्याची शक्यता

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा
3

‘डिजिटल ॲरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल ‘इतक्या’ लाखांना घातला गंडा

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला
4

नेरुळ रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांवर सुरा उगारून आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.