Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics:’ चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीच्या मालक…’; चंद्रकांत पाटलांचे अजित पवारांना प्रत्युत्तर

राज्यातील निधीवाटपाच्या राजकारणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. धाराशिव येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने वाद पुन्हा पेटला. “माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Nov 25, 2025 | 09:30 AM
Maharashtra Politics

Maharashtra Politics

Follow Us
Follow Us:
  • महायुतीत अंतर्गत संघर्ष
  • तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे- अजित पवार
  • चाव्या कुणाकडेही असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे- चंद्रकांत पाटील
Kolhapur News:  महायुती सरकारमधील तीन पक्षांमध्ये सध्या अंतर्गत उफाळल्याचे दिसून येत आहे. एकीकडे भाजप आणि शिंदे गटात संघर्ष सुरू असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपमध्ये अंतर्गत वाद रंगल्याचे दिसत आहे. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये आयोजित प्रचार सभेत भाजप आमदार चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कडवट इशारा दिल्याने राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्याच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही असल्या तरीही त्या तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे. मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येणार नाही आणि जर ती उघडली तर त्याचे काय परिणाम होतील हे तुम्हाला माहितीच आहे.’ असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

राष्ट्रपती आणि राज्यपालांना विधेयक मंजुरीवरुन सुनावणी; कालमर्यादा नाही पण विलंब नको

गेल्या काही दिवसात राज्यातील सरकारी निधीच्या वाटपावरून सत्ताधाऱ्यांमध्ये तणाव वाढला आहे. अजित पवार यांनी “राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे आहेत आणि निधी कुणाला द्यायचा हे देखील आपल्यावरच अवलंबून आहे.” असे विधान केले होते. यावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रतिक्रिया देत अजित पवारांना खुला इशाराच दिला आहे. चंद्रकांत पाटलांच्या या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

चंद्रकांत पाटील म्हणाले, “विरोधकांकडे एक मंत्री असला तरी आम्ही इथे दोन मंत्री आहोत. आम्ही महायुतीत असल्यामुळे एकमेकांवर टीका करायचे नाही, असं ठरवलं आहे. आता पर्यंत हसन मुश्रीफ यांनी आपल्यावर टीका केली नाही. पण जर त्यांनी टीका केली, तर मी कशी टीका करतो हे तुम्हाला माहिती आहे,” असे पाटलांनी जोरदार शब्दात सांगितले.

राज्यातील निधीवाटपाच्या राजकारणावरून वातावरण चांगलेच तापले आहे. धाराशिव येथील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याने वाद पुन्हा पेटला. “माझ्या हातात राज्य सरकारची तिजोरी आहे. माझ्या घड्याळाच्या पाठीशी उभे राहिलात तर बातमीसारखा विकास करू शकतो. अर्थमंत्री म्हणून याकडे बारकाईने लक्ष देईन,” असे अजित पवार म्हणाले होते.

Palghar News : इथे ओशाळली माणूसकी, प्रसूत महिलेला रुग्णवाहीकेने अर्ध्यावर सोडले अन्… ; अंगावर काटा आणणारी

या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही दावा केला की, राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजित पवारांकडे आहेत. याच संदर्भावरून चंद्रकांत पाटलांनी जोरदार प्रतिक्रिया देत पवार यांना टोला लगावला. अजित पवार यांच्या बेधडक शैलीची चर्चा नवी नाही. बारामतीतील एका भाषणातही त्यांनी निधीवरून वादग्रस्त वक्तव्य केले होते. “विरोधात उभा राहून निवडून आलेल्या उमेदवाराला नंतर निधी मिळाला नाही तर काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. “तुम्ही काट मारली, तर मीही काट मारणार,” असेही ते म्हणाले होते.अजित पवारांच्या या सलग वक्तव्यांवर विरोधकांनी जोरदार टीका केली असून, निधीवाटपाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

 

Web Title: Maharashtra politics chandrakant patils reply to ajit pawar on his statement regarding the state treasury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर-मंतरवर आंदोलन सुरू, देशभरातून पाठिंबा
1

Maharashtra Breaking News Updates Today: जंतर-मंतरवर आंदोलन सुरू, देशभरातून पाठिंबा

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव
2

मोठी बातमी ! ठाकरेंना सोडून गेलेल्या ‘त्या’ सहा खासदारांच्या अडचणींत होणार वाढ? सर्वोच्च न्यायालयातच धाव

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती
3

Ajit Pawar Birthday: ‘दादा तुम्ही परत या ना…; शब्दांत न मांडता येणारी जखम, अजित दादांची आज पहिली जयंती

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली
4

Maharashtra Breaking News Updates Today: जे झालं त्यासाठी माफी मागतो; अभिजीतने लाठीचार्ज झालेल्या विद्यार्थ्यांची माफी मागितली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.