Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Drought: पुणे जिल्ह्यात दसऱ्यावर दुष्काळाचे सावट! १३ पैकी १० तालुके दुष्काळग्रस्त

Pune Drought News: जलसंधारण म्हणजे केवळ सिमेंटचे बंधारे बांधणे किवा कागदावर गाळ काढल्याचे दाखवणे नव्हे. या कामांतून प्रत्यक्षात किती जलसाठा निर्माण झाला आणि भूजलपातळीत किती वाढ झाली, हे मोजणे अधिक महत्त्वाचे आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Oct 20, 2026 | 03:05 PM
Pune Drought News, Pune 10 Talukas Drought, Pune Water Crisis, Pune Fodder Shortage Farmers.

Pune Drought News, Pune 10 Talukas Drought, Pune Water Crisis, Pune Fodder Shortage Farmers.

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची चिंता
  • जिल्ह्यातील १३ पैकी तब्बल १० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर
  • जलसंधारण म्हणजे केवळ सिमेंटचे बंधारे बांधणे किवा कागदावर गाळ काढल्याचे दाखवणे नव्हे
Pune Drought: दसरा आला की सीमोल्लंघनाची गौरवशाली परंपरा जपली जाते. आपट्याची पाने ‘सोनं’ म्हणून लुटली जातात, विजयाचा जल्लोष होतो आणि नव्या संकल्पांची सुरुवात होते. मात्र, यंदा पुणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागांत उत्सवापेक्षा पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची चिंता अधिक गडद झाली आहे.

जिल्ह्यातील १३ पैकी तब्बल १० तालुके दुष्काळग्रस्त जाहीर झाले असताना, यंदाच्या दसऱ्याला खऱ्या अर्थाने कशाचे सीमोल्लंघन करायचे, हा आत्मपरीक्षणाचा प्रश्न प्रत्येकासमोर उभा ठाकला आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या बळीराजाला केवळ शासकीय मदतीची घोषणा पुरेशी नसून पाण्याच्या नियोजनातील त्रुटींवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

Ashutosh Ranka And Saurav Das News: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांच्या जामीन अर्ज फेटाळला: न्यायालयीन कोठडीत वाढ

 

यंदाच्या खरीप हंगामात पावसाने दिलेल्या प्रदीर्घ ओढीमुळे जिल्ह्यातील शेती संकटात सापडली आहे. सुरुवातीला आठ तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत करण्यात आला होता. त्यानंतर नव्याने जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांचा समावेश झाल्याने ही संख्या आता १० वर पोहोचली आहे. पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, खेड, भोर, वेल्हे, जुन्नर आणि आंबेगाव या तालुक्यांतील परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

बंधारे नव्हे, पाणीसाठा मोजण्याची आली वेळ

जलसंधारण म्हणजे केवळ सिमेंटचे बंधारे बांधणे किवा कागदावर गाळ काढल्याचे दाखवणे नव्हे. या कामांतून प्रत्यक्षात किती जलसाठा निर्माण झाला आणि भूजलपातळीत किती वाढ झाली, हे मोजणे अधिक महत्त्वाचे आहे. ओढे, नाले आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरवणे आणि जलस्रोतांची वेळेवर देखभाल याला अग्रक्रम दिला पाहिजे. खर्च झालेल्या निधीच्या हिशोबासोबतच भूगर्भातील पाणीसाठ्याचा हिशोब ठेवला, तरच दुष्काळमुक्तीचे स्वप्न साकार होऊ शकेल.

Tiger Shroff Attack: टायगर श्रॉफवर हल्ल्याचा कट आठवडाभर आधीच रचला होता? शूटरही पोहोचले होते

पर्यायी पिकांना हवी हमखास बाजारपेठ

दुष्काळात ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात येणारी पिके घेण्याचा सल्ला दिला जातो; मात्र केवळ सल्ल्याने शेतकऱ्यांचे पोट भरत नाही. कमी पाण्याच्या पिकांना योग्य हमीभाव, साठवणूक व प्रक्रिया सुविधा आणि हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कृषी विभागाची आहे. पाण्याचे नियोजन करताना शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार नाही, याची शाश्वती यंत्रणांनी दिली पाहिजे.

दसऱ्याचा संकल्प : जलसुरक्षेचा नवा अध्याय !

दसऱ्याला परस्परांना आपट्याची पाने देताना यंदा प्रत्येकाने जलसंवर्धनाचा वसा घेतला पाहिजे. प्रत्येक गावाने जलसंधारणाचे किमान एक ठोस काम हाती घ्यावे, प्रत्येक ग्रामपंचायतीने पाण्याचा पारदर्शक हिशोब मांडावा आणि शहरांनी पाण्याचा अपव्यय शून्यावर आणावा. दुष्काळाचे सीमोल्लंघन म्हणजे तात्पुरत्या टँकरवर जगणे नव्हे, तर – दुष्काळातही उभी पिके जळणार नाहीत आणि माता-भगिनींना पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही, अशी शाश्वत व्यवस्था निर्माण करणे होय!

पाण्याच्या नियोजनाची जबाबदारी केवळ ग्रामीण भागावर ढकलून चालणार – नाही. पुणे आणि पिपरी-चिंचवडसारख्या महानगरांनीही पाणीगळती रोखणे, रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक करणे – आणि सांडपाण्यावर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे तातडीने अंमलात आणले पाहिजे. धरणांमधून शहरांकडे वाहणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे मूल्य ओळखून शहरांनीही पाणीबचतीची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

 

 

Web Title: Pune drought crisis 10 talukas declared drought hit ahead of dasara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 03:05 PM

Topics:  

  • Maharashtra Drought 2026
  • Maharashtra Politics
  • pune district
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले
1

Manoj Jarange Patil News: ‘मला ५०० कोटी दिल्याचे भाजपला का सांगितले? मनोज जरांगे पाटलांचे एकनाथ शिंदेंना असं का म्हणाले

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये लोकशाही धोक्यात? आयुक्तांच्या निवासस्थानी घुसखोरीचा गंभीर आरोप!
2

Mira Bhayandar News: मीरा-भाईंदरमध्ये लोकशाही धोक्यात? आयुक्तांच्या निवासस्थानी घुसखोरीचा गंभीर आरोप!

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल
3

Khandala Sugar Factory Election: खंडाळा साखर कारखान्याचा बिगुल वाजला!; २१ जागांसाठी २२ नोव्हेंबरला मतदान, आजपासून अर्ज दाखल

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश
4

Maharashtra Drought 2026: दुष्काळाची भीषण कुऱ्हाड! ‘आम्हाला सांभाळता येत नाही, तुम्हीच वाचवा’; अश्रू ढाळत शेतकरी सोडतायत गोवंश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.