
Maharashtra Politics:
भाजपा ऑपरेशन लोटस या मोहिमेअंतर्गत शिवसेनेचे (शिंदे) ३५ आमदार फोडणार आहे, असा दावा शिवसेना (उबाठा) पक्षाने केला आहे. शिवसेना (उबाठा) पक्षाने म्हटले की, महाराष्ट्रात सध्या जे ‘नाराजी’ महानाट्य चालू आहे, ते गांभीर्याने घेण्याची गरज नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दिल्लीत अमित शाह यांना भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची तक्रार केली, हे लोक आमचा पक्ष फोडत आहेत. चव्हाण पैशांचा वापर करून आमचे पदाधिकारी विकत घेत आहेत.
तुम्हीही नियमबाह्य पद्धतीने ‘लाडक्या बहिणी’चे पैसे घेतले? तर आता ‘ही’ कारवाई होण्याची शक्यता
हे आम्ही सहन करणार नाही. शिंदे यांच्या या तक्रारीवर अमित शाह म्हणाले, कोण कोणाचा पक्ष फोडत आहे? मुळात तुमचा पक्ष हा आम्ही म्हणजे, भाजपाने फोडाफोडी करून बनवला. तुम्ही फुटलात. आम्ही त्याला पक्ष म्हणून मान्यता दिली म्हणून तुम्ही ‘पक्ष’ वगैरे भाषा वापरत आहात. तुमचा जो काही पक्ष आहे तो भाजपाची उपशाखा आहे, असे उबाठा गटाने म्हटले आहे.
शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपाचा हिंदुत्वाचा फुगा आता फुटलेला आहे. भाषिक प्रांतावादाचे विष भाजपा पसरवत आहे, असे म्हणत त्यांनी भाजपावर निशाणा साधला. रोजच प्रवेश होत आहेत. मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून जातो आहे पण ही नुसती गर्दी नाही तर लढणाऱ्या शिवसैनिकांचे हे सैन्य आहे, असेही ते म्हणाले.
Navale Bridge Accident: अपघात रोखण्यासाठी ‘आरटीओ’ अॅक्शन मोडमध्ये; चालकांची २४ तास तपासणी
आपल्यातून जे गेले होते ते परत आले आहेत. हळूहळू सगळ्यांना लक्षात यायला लागलं आहे की, भाजपा आणि गद्दार किती ढोंगी आहेत. पण ही लढाई सोपी नाही. जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा, भारतीय जनता पक्ष हा कपट कारस्थान करणारा पक्ष आहे. भाजपाने जसे पक्ष फोडले तसे आता ते घरं देखील फोडायला बघत आहेत, असे ठाकरेंनी सांगितले.
डहाणू नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेच् (शिंदे) उमेदवारांची नावे घेत, एवढे सर्व उमेदवा रस्त्यावर उतरले तर विरोधकांचे डिपॉझिट जम झाल्याशिवाय राहाणार नाही, असे म्हणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाला थे आव्हान दिले आहे. पालघर जिल्ह्यातील स्थानिन स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचाराला शिंदे यांन शनिवारी सुरुवात केली. त्यानंतर जव्हार आि पालघर मधील आगरी मैदान येथे शिंदेंच्या जाहीर सभा झाल्या.
डहाणू येथील जाहीर सभेतून शि यांनी डहाणू नगरपरिषदेत परिवर्तनाच्या विकासाच भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, असे भाकित वर्तवले. एकाधिकारशाही आणि अंहकार मोडून काढण्यासाठी शिवसेना मैदानात उतरली असल्याचे आव्हान भाजपाला दिले आहे. डहाणूमधील लढत रंगतदार होत आहे. येथे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना (शिंदे) विरुद्ध भाजप असा सामना होत आहे.