Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”

कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. आज या सर्व विषयावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात प्रत्युत्तर दिले.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 26, 2026 | 05:11 PM
Maharashtra Politics: टिपू सुलतानवरून CM फडणवीस आक्रमक; म्हणाले, “… अपमान सहन करणार नाही”
Follow Us
Follow Us:

मुख्यमंत्री फडणवीस यांचा सभागृहात आक्रमक पवित्रा 
टिपू सुलतानच्या मुद्द्याला विरोधकांना दिले प्रत्युत्तर 
सध्या सुरू आहे महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन

Cm Devendra Fadnavis on Tipu Sultan: सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात टिपू सुलतान वरून वाद सुरू आहे. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेतला. आज या सर्व विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात प्रत्युत्तर दिले.

सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री टिपू सुलतान विषयवार आक्रमक झालेले पाहायला मिळाले. टिपू सुलतानच्या वैयक्तिक महानतेवर किंवा इतिहासावर कोणताही आक्षेप नसून त्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यावर आक्षेप असल्याचे सभागृहात स्पष्ट करण्यात आले.

या विषयावर सभागृहात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज हे या भूमीचे आराध्य दैवत आहेत. त्यांची तुलना वादग्रस्त इतिहास असणाऱ्या शासकाशी होऊ शकत नाही.” त्यांनी कॉँग्रेस आणि विरोधी पक्षांवर देखील निशाणा साधला आहे. त्यांनी विरोधकांवर तुष्टीकरणाचा आरोप केला.

LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राज्यपाल महोदय यांच्या अभिभाषणावर विधानसभेमध्ये झालेल्या चर्चेला उत्तर@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #MahaBudget2026 https://t.co/qCLpdWsImd — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 26, 2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “टिपू सुलतानने ब्रिटिशांविरुद्ध लढाई केली हे खरे आहे. मात्र हे एक ऐतिहासिक सत्य आहे की, त्याने हजारो हिंदूंचे धर्मांतर केले आणि त्यांची हत्या केली. आमचा लढा कोणत्याही धर्माशी किंवा मुस्लिमांशी नाही. तर भारताच्या संस्कृतीवर हल्ला करणाऱ्या आक्रमकांचा गौरव करणाऱ्यांविरुद्ध आहे. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान आहे आणि तो अपमान सरकार कदापि सहन करणार नाही. ”

Maharashtra Politics: मोठा निर्णय होणार? “कर्जमाफीबाबत जे आश्वासन…”; CM फडणवीस काय म्हणाले?

CM फडणवीस काय म्हणाले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मागच्या वर्षी आपल्या शेतकऱ्यांवर जे मोठे संकट आले होते. त्यावेळेस आपण बळीराजाला थेट मदत केली होती. आपण हे पैसे शेतकऱ्यांच्या बँकेत थेट पोहोचवले होते. शेतकरी अडचणीत असेल तिथे तिथे सरकार मदतीला उभे असेल. कर्जमाफीबाबत आम्ही समिती स्थापन केलेली आहे.आम्ही कर्जमाफीबाबत जे आश्वासन दिले आहे ते लवकरच पूर्ण देखील करणार आहोत. सरकार शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची, त्यांच्या जमिनीची नोंदणी, सातबारा याबाबत माहिती असणार आहे. अवकाळी पाऊस, कर्जमाफी, भ्रष्टाचार, असे अनेक मुद्दे केंद्रस्थानी ठेवत विरोधकांनी महायुती सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि विरोधकांच्या प्रश्नाला अभ्यासपूर्ण उत्तरे दिली आहेत.

 

Web Title: Cm devendra fadnavis criticizes to congress and mva about tipu sultan chhatrapati shivaji maharaj maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 05:05 PM

Topics:  

  • chattrapati shivaji maharaj
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Sanjay Raut News: मोदींसारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला
1

Sanjay Raut News: मोदींसारखा क्रूर आणि अघोरी नेता देशात होऊच शकत नाही; संजय राऊतांचा भाजपवर घणाघाती हल्ला

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका
2

‘रोहित पवारांना अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नका, त्यांचं अन्नत्याग आंदोलन म्हणजे…’; गोपीचंद पडळकर यांची टीका

Katraj Dairy Pune: कात्रज दूध संघाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू! कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस दूध संकलनाचे गंभीर आरोप
3

Katraj Dairy Pune: कात्रज दूध संघाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी सुरू! कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस दूध संकलनाचे गंभीर आरोप

Maharashtra Politics: ‘काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज’; विरोधी पक्षांच्या विलीनीकरणावर मुख्यमत्र्यांचा घणाघात; म्हणाले, भाजपलाच…
4

Maharashtra Politics: ‘काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज’; विरोधी पक्षांच्या विलीनीकरणावर मुख्यमत्र्यांचा घणाघात; म्हणाले, भाजपलाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.