
Eknath Shinde Angry on Devendra Fadnavis,
महत्त्वाची बाब म्हणजे, काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीच्या सोहळ्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र प्रवास केला. पण या प्रवासात दोघंमध्ये पहिल्यासारखा कोणताही संवाद झाला नसल्याने राजकीय चर्चांना जोर आला आहे. बिहारच्या दौऱ्यावेळी दोघांनीही एकत्र प्रवास केला पण या प्रवासातही एकनाथ शिंदे यांचा अलिप्तपणा प्रकर्षाने दिसून आला.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बिहारसाठी दोघांनीही स्वतंत्रपणे प्रवास केला. सोहळ्यातही दोघांमधील दुरावा स्पष्टपणे दिसून आला. मुंबईत परतल्यानंतर त्यांची नाराजी दूर होईल अशी शक्यता होती. पण हुतात्मा चौकातील कार्यक्रमात अभिवादन करताना दोघेही आमने सामने आले पण तिथेही त्यांनी फक्त एकमेकांना नमस्कार केला. याठिकाणीही त्यांचा अलिप्तपणा स्पष्टपण दिसून आला. तिथेही त्यांचा संवाद झाला नाही. त्यामुळे दोघांच्या चेहऱ्यावरून एकमेकांप्रती असलेली नाराजीच स्पष्टपणे दिसून येत होती.
Kolkata मध्ये भूकंपाचे धक्के, 5.5 रिश्टर स्केलचा ढाकाजवळ भूकंप; सोशल मीडियावर खळबळ
भाजपकडून सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे. गेल्या काही दिवसांत माजी नगरसेवकांना पैसा देऊन पळवून लावण्याचे प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या हालचालींमध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेलाच सर्वाधिक लक्ष्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी नुकताच दिल्लीत गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. फोडाफोडीला प्रोत्साहन देणाऱ्या हालचाली तातडीने थांबवाव्यात, अशी मागणी त्यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
महायुती सरकारमध्ये पुन्हा एकदा जुने सूर उमटू लागले आहेत. पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर खच्चीकरण होत असल्याची, तसेच अजित पवार निधी देत नसल्याची तक्रार करत शिंदे गटाने बंड पुकारले होते. आता त्याच परिस्थितीची पुनरावृत्ती होत असून, फक्त भूमिका बदलल्या आहेत. राष्ट्रवादीच्या जागी आता भाजप हा ‘नैसर्गिक मित्र पक्ष’ शिंदेसेनेला अडचणीत आणत असल्याची भावना सेनेत निर्माण झाली आहे.
देवेंद्र फडणवीस आणि मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या जोडीनं शिंदेसेनेला अक्षरशः घाम फोडला आहे. प्रशासकीय पातळीवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सेनेची कोंडी केल्याचे बोलले जात आहे, तर संघटनात्मक पातळीवर रविंद्र चव्हाण यांनी सेनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि स्थानिक नेतृत्वाला नाकीनऊ आणले आहेत. या हालचालींमुळे शिंदेसेनेत पुन्हा अस्वस्थता वाढत असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील ताणतणाव आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.