
5 जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेणार, हवामान बदलणार; हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather Update In Marathi: आज राज्यातील हवामानात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मुंबईत वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान, मुंबईत सध्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडत आहे. आज (7 मे) सकाळनंतर पुन्हा सायंकाळच्या वेळेस वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचा लोकलसेवेवर परिणाम झाला.
तसेच राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच ८ जिल्ह्यांमध्ये आज गारपीटीचाही अंदाज देण्यात आला. राज्यात उन्हाचा चटकाही कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १५ ते २० मिनिटांपासून दक्षिण मुंबई परिसरात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू आहे. तसेच, कोस्टल रोड परिसरात जोरदार वारे आणि पाऊस सुरू झाला आहे. परिणामी मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल उशीराने धावत आहेत. ठाणे ते पनवेल, ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते सीएसटी या लोकल दहा मिनिटे उशीराने धावत आहेत. मध्य रेल्वेला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे.
राज्याच्या वातावरणात सतत हवामान बदल होत आहेत. कुठे उन्हाचा तडाखा तर कुठं ढगाळ वातावरण असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
अशातच हवामान विभागानं पुढील 4 ते 5 दिवसाचा हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 4 ते 5 दिवस राज्यात तीव्र हवामानाचा इशारा कायम आहे. राज्याच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात मेघगर्जनेसह पावसाचे संकेत आहेत. कटाही परिसरात मारहाण होण्याचीही शक्यता आहे. तसेच कताही भागात गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई ठाणे पालघर येथे मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, पालघरच्या पश्चिमेकडील किनारपट्टीला जोरदार वादळ आणि पावसाने थैमान घातले आहे. वादळ आणि पावसाचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे. डहाणू आणि पालघरमधील चाळीस ते पंचेचाळीस बोटींच मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. वादळाच्या तडाख्यात 40 ते 45 बोटी सापडल्या होत्या, त्यांचं नुकसान झालं आहे. दरम्यान, या नुकसानीचे जिल्हा प्रशासनाकडून पंचनामे सुरु करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.