Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षाकडून दिग्गजांची नियुक्ती

स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी जिल्ह्यातच थांबावे, असे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 22, 2025 | 05:41 PM
शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा

शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा

Follow Us
Close
Follow Us:

  • शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची घोषणा
  • ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची नियुक्ती
  • उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जिल्हा संपर्क प्रमुखांची आज घोषणा करण्यात आली. नगर पंचायत, नगर परिषदा आणि आगामी जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत भक्कमपणे लढण्यासाठी जिल्हा संपर्क प्रमुखपदी पक्षातील ज्येष्ठ नेते, खासदार आणि आमदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत संपर्क प्रमुखांनी जिल्ह्यातच थांबावे, असे निर्देश शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

 ऐन थंडीत गुहागरचे राजकारण तापले; नगराध्यक्षपदांचे अर्ज झाले बाद

शिवसेना सचिव संजय मोरेंकडून प्रसिद्धी पत्रक जारी करण्यात आले असून राज्यातील ४० ठिकाणी पक्षाकडून जिल्हा संपर्क प्रमुख पदांची घोषणा करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्याकडे ठाणे, नवी मुंबई आणि पुण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी किरण पावसकर आणि राजेश मोरे यांच्याकडे देण्यात आली आहे. रत्नागिरीसाठी यशवंत जाधव, रायगड ग्रामीणसाठी संजय घाडी, पालघरसाठी रवींद्र फाटक, ठाणे ग्रामीण प्रकाश पाटील, पिंपरी चिंचवड शहरासाठी सिद्धेश कदम, पुणे ग्रामीणसाठी खासदार श्रीरंग बारणे आणि राम रेपाळे, सातारा शरद कणसे, सांगली राजेश क्षीरसागर, कोल्हापूर खासदार धैर्यशील माने आणि संजय मंडलिक, सोलापूर संजय कदम, नाशिक लोकसभेसाठी राम रेपाळे, दिंडोरी लोकसभेसाठी राम रेपाळे यांच्यासह भाऊसाहेब चौधरी यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यासाठी सुनिल चौधरी, नंदुरबारसाठी राजेंद्र गावित, धुळयाची जबाबदारी मंजुळा गावित यांच्यावर सोपवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरात महानगरचे संपर्कप्रमुख विलास पारकर, छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी अर्जुन खोतकर, जालनासाठी अर्जुन खोतकर आणि भास्कर आंबेकर यांची निवडणूक केली आहे. बीडमध्ये टी. पी मुंडे आणि मनोज शिंदे, धाराशीवसाठी राजन साळवी, नांदेडसाठी सिद्धराम म्हेत्रे, लातूरसाठी किशोर दराडे, बुलढाणामध्ये हेमंत पाटील, परभणीमध्ये आनंद जाधव, नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहरसाठी दिपक सावंत तसेच गडचिरोलीसाठी दिपक सावंत यांच्यासह किरण पांडव यांच्यावर जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भंडारासाठी गोपीकिशन बाजोरिया, अमरावतीसाठी नरेंद्र भोंडेकर, वर्धासाठी राजेंद्र साप्ते, यवतमाळमध्ये हेमंत गोडसे, वाशिममध्ये जगदीश गुप्ता, हिंगोलीमध्ये हेमंत पाटील, अकोलामध्ये अभिजित अडसूळ, चंद्रपूर किरण पांडव आणि अहिल्यानगरमध्ये विजय चौघुले यांची जिल्हा संपर्क म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

Local Body Election: रत्नागिरी जिल्ह्यात युतीत ‘पॅचअप’, चिपळूणमध्ये ‘मविआ’ फुटली

 

Web Title: Shiv sena announces district liaison chiefs in the backdrop of elections mlas and mps will enter the fray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 05:41 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Maharashtra Local Body Election
  • Mumbai

संबंधित बातम्या

Uddhav – Raj joint interview : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव..! राज-उद्धव ठाकरेंनी घेतला सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार
1

Uddhav – Raj joint interview : मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव..! राज-उद्धव ठाकरेंनी घेतला सत्ताधाऱ्यांचा खरपूस समाचार

Nashik Election 2026: पंचवटीच्या रणसंग्रामात बाजी कोण मारणार? घराणेशाही, बाहुबली उमेदवार, बंडखोरी आणि अपक्षांचा करिश्मा
2

Nashik Election 2026: पंचवटीच्या रणसंग्रामात बाजी कोण मारणार? घराणेशाही, बाहुबली उमेदवार, बंडखोरी आणि अपक्षांचा करिश्मा

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल
3

‘…अन् मगच काँग्रेसने आमच्यावर बोलावे’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा
4

महापालिका निवडणुकीमध्ये उरली नाही विचारधारा; राजकीय पक्षांनी निष्ठावंत उमेदवारांना नाही दिला थारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.