Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: पावसाचा धुमाकूळ सुरूच; मुंबईला ऑरेंज, नाशिक-पुण्याला रेड अलर्ट, अनेक शाळांना सुट्टी

Maharashtra Rain Alert: मुसळधार पावसानंतर मुंबईत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आजही मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिवसभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 07, 2026 | 11:12 AM
Pune Rain, Mumbai Weather, School Holiday, Floods Maharashtra

Pune Rain, Mumbai Weather, School Holiday, Floods Maharashtra

Follow Us
Follow Us:

Maharashtra Monsoon Red Alert :  राज्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबई, पुण्यापासून नाशिक, नाशिक. मराठवाड्यातही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पाणी साचून पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाल्या आहेत. घाट परिसरात दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आजही राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय हवामान विभागाने (IMD) आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांचाही इशारा दिला आहे. मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट, तर नाशिक आणि पुणे जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Mumbai News: मुंबईत विजेच्या उघड्या तारांचे मोठे संकट! वीजमाफियांच्या जाळ्यात अडकली अनेक नागरिकां

कोकण आणि घाटमाथ्यावर अतिवृष्टी

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज कोकण किनारपट्टी आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्यावरही अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

तर मुंबई, मुंबई उपनगरासह , कोकण घाटमाथा आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय ठाणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांनाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुण्यात शाळांना सुट्टी

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्याला आजही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, काल (६ जुलै) दिवसभरात चिंचवड येथे १३२ मिमी, लोहगाव येथे ९८ मिमी, पाषाण येथे ६९ मिमी आणि शिवाजीनगर येथे ५५ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील मिसिंग लिंक पुन्हा सुरू; दरड हटवल्यानंतर वाहतुकीला हिरवा कंदील

नाशिकला रेड अलर्ट, SDRF तैनात

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ आणि इगतपुरी परिसरात मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि एसडीआरएफचे पथक तैनात केले आहे.

अहिल्यानगरला यलो अलर्ट; शेतकऱ्यांना दिलासा

अहिल्यानगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वदूर संततधार पाऊस सुरू असून, गेल्या काही दिवसांपासून रखडलेल्या खरीप पेरण्यांना वेग येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीतही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाने घेतली विश्रांती पण ऑरेंज अलर्ट कायम

मुसळधार पावसानंतर मुंबईत सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी आजही मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने दिवसभरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाऊस थांबला असला तरी आकाशात दाट ढग असून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता आहे. मिठी नदी पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने नदीकाठच्या परिसरावर प्रशासनाचे लक्ष आहे.

लोकल सेवा सध्या सुरळीत

मुसळधार पावसाचा फटका सोमवारी मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही लोकल मार्गिकांना बसला होता. काही गाड्या उशिराने धावत होत्या. मात्र, सध्या पावसाचा जोर कमी झाल्याने लोकल रेल्वे सेवा टप्प्याटप्प्याने सुरळीत होत असून बहुतांश गाड्या नियोजित वेळेनुसार धावत आहेत. तरीही हवामानातील बदल लक्षात घेता प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पालघरमध्ये पुराचा कहर

दरम्यान, पालघर जिल्ह्यात काल मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. वसई-विरार, सफाळे, केळवे, पालघर, बोईसर, मनोर आणि वाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहू लागले.

 

 

 

Web Title: Maharashtra rain updates schools colleges closed pune nashik red alert mumbai orange alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • IMD alert of maharashtra
  • Maharashtra Monsoon

संबंधित बातम्या

महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण…
1

महाभयंकर संकट? Pune शहराला मुसळधार पावसाचा इशारा; सिंहगड किल्ला बंद अन् खडकवासला धरण…

पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित
2

पावसाचा तडाखा कायम; घाटमाथ्यातील सहा तालुक्यांतील शाळांना सुट्टी, उर्वरित जिल्ह्यात वर्ग नियमित

Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?
3

Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?

पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन
4

पुण्यावर घोंघावतंय भयंकर संकट; सावधान! Khadakwasla Dam मधून कोणत्याही क्षणी…, नागरिकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.