कोळंबीसह गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत वाटा
राज्यातून होणाऱ्या या मत्स्य निर्यातीत कोळंबी आणि मोठवलेल्या मासळीचा मोठा वाटा असून, अमेरिका आणि चीन यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये महाराष्ट्रातील उत्पादनांना मोठी मागणी आहे. विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढ-उत्तार आणि वाढता उत्पादन खर्च यांसारखी आव्हाने असूनही, महाराष्ट्राने गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यांच्या बरोबरीने आपले स्थान कायम राखले आहे. भारताच्या एकूण निर्यातीत अमेरिका (22,723 कोटी) आणि युरोपियन युनियन (9,429कोटी) या प्रमुख बाजारपेठा आहेत. यामध्ये कोकणच्या किनारपट्टीमध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात आढळणारी कोळंबी मासळीला अमेरिका आणि चीन मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. त्यामुळे कोकणच्या कोळंबीला आता परदेशी पाहुणे देखील मोठी पसंती देत आहेत.
अनेक देशांमध्ये भारतीय मासळीला मोठी मागणी
भारतीय मत्स्य उत्पादनांसाठी अमेरिका ही सर्वांत मोठी आणि फायदेशीर बाजारपेठ आहे.2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अमेरिकेला 22 हजार 723कोटी रुपयांच्या मत्स्य उत्पादनांची निर्यात झाली आहे. चीनने 3.96 लाख मेट्रिक टनांसह आघाडी घेतली आहे, ज्याचे मूल्य 10 हजार 668कोटी रुपये इतके आहे, याव्यतिरिक्त युरोपियन युनियन (9.429.6 कोटी), दक्षिण-पूर्व आशिया (8,172.2 कोटी) आणि जपान (3.452.9 कोटी) या देशांमध्येही भारतीय मासळीला मागणी आहे.






