Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Refinery Project: सत्तास्थापनेचा गोंधळात महाराष्ट्राने गमावले दोन प्रकल्प ; गुजरात,आंध्रप्रदेशला होणार फायदा

महाराष्ट्रातील निवडणुका आणि सत्तास्थापनेच्या या गदारोळात केंद्र सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्राकडून काढून घेत गुजरात किंवा आंध्रप्रदेशला देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 27, 2024 | 02:40 PM
Maharashtra Refinery Project: सत्तास्थापनेचा गोंधळात महाराष्ट्राने गमावले दोन प्रकल्प ; गुजरात,आंध्रप्रदेशला होणार फायदा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सत्तास्थापनेची हालचालींमध्ये व्यस्त आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. सत्तास्थापनेच्या या चढाओढीत महाराष्ट्राच्या हातून एक मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प निसटला आहे. सत्तास्थापनेच्या या घडामोडीत महाराष्ट्राच्या हातून रत्नागिरीतील तेल शुद्धीकरण प्रकल्प निसटल्याची माहिती समोर आली आहे.

हा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकण विभागातील रत्नागिरी येथे उभारला जाणार होता. पण आता केंद्र सरकारनेच हा प्रकल्प राज्यातून बाहेर जाण्यासाठी निर्णय घेतला आहे. आता हा तेल शुध्दीकरण प्रकल्प गुजरात किंवा आंध्रप्रदेशमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही राज्यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे.

Eknath Shinde News Update: मोठी बातमी! मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार; एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप?

महाराष्ट्रातील निवडणुका आणि सत्तास्थापनेच्या या गदारोळात केंद्र सरकारने हा प्रकल्प महाराष्ट्राकडून काढून घेत गुजरात किंवा आंध्रप्रदेशला देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गुजरात किंवा आंध्रप्रदेशात हे दोन रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यासाठी सौदी अधिकाऱ्यांशीही चर्चा सुरू केली आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या माध्यमातून प्रत्येकी वार्षिक 10 ते 15 दशलक्ष टन क्षमता असणारे पट्रोकेमिकल सुविधा मिळू शकतात. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, गुजरातमध्ये रिफायनरीसाठी ओएनजीसीला सौदी अरामकोसबोत भागिदारी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.  याशिवाय आंध्रप्रदेशात हा प्रकल्प गेल्यास बीपीसीएलसोबत भागिदारी केली जाण्याची शक्यता आहे. या रिफायनरी प्रल्पांना सौदीकडून कच्च्या तेलाचा पुरवठा केला जाईल. अशीही माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाबाबत सौदीसोबतची चर्चा प्राथमिक टप्प्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील महिन्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यात ते सौदी अधिकाऱ्यांची भेट घेतील. या प्रकल्पात सौदीकडून भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल, असे आश्वासन दिले आहे. हे आश्वासन सौदीने पूर्ण करावे, असे आवाहन केले जाणार आहे.

ठरलं तर मग! अभिनेत्री कीर्ती सुरेश लवकरच अडकणार लग्नबंधनात

महाराष्ट्रातील रत्नागिरी मध्ये उभारला जाणारा हा  रिफायनरी प्रकल्प सरकारच्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक होता.  पण या प्रकल्पाची घोषणा झाल्यापासूनच स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात या प्रकल्पाला विरोध करण्यास सुरूवात केली. अनेकदा आंदोलने झाली.  त्यातच भूसंपादनची प्रक्रियाही होण्यात विलंब होऊ लागला. या सर्व गदारोळामुळे 60 दशलक्ष क्षमता असलेली रिफयनरी बांधणे कठीण होईल, अशा प्रतिक्रीया उमटू लागल्या.

Web Title: Maharashtra refinery project refinery project in konkan will slip out of maharashtras hands nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 01:53 PM

Topics:  

  • Andhra Pradesh
  • Gujrat

संबंधित बातम्या

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली
1

Gujrat Crime: गुजरात हादरलं! ‘पूर्वजांना मोक्ष मिळावा’ म्हणून आईने दोन मुलांची हत्या; सासऱ्यांच्या जीवावरही बेतली

Real Estate क्षेत्रात 16000 रोजगार संधी! ₹४,५०० कोटींची होणार गुंतवणूक
2

Real Estate क्षेत्रात 16000 रोजगार संधी! ₹४,५०० कोटींची होणार गुंतवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.