• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Eknath Shinde Ready To Provide External Support To Bjp Nras

Eknath Shinde News Update: मोठी बातमी! मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार; एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप?

महायुतीत सामील असलेल्या एकनाथ शिंदेंना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोर लावला जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 27, 2024 | 01:14 PM
Eknath Shinde News Update: मोठी बातमी! मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार; एकनाथ शिंदेंचा भाजपला निरोप?

Photo Credit- Social Media खातेवाटपानंतर आता 'या' मुद्द्यावरून शिंदे गटाच्या नेत्यामंध्ये नाराजी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  राज्याच्या राजकीय वर्तुळातून धक्कादायक  बातमी समोर येत आहे. विधानसभेच्या निकालानंतर महायुतीला घवघवीत यश तर मिळालं, पण राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत राज्यभरात चर्चांना उधाण आले आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चढाओढ सुरू आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळणार हेही जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्रीपदासाठी नाराज आहेत. त्यातच आता देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यास मी बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे, असा निरोप एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्त्वापर्यंत पोहचवला असल्याची बातमी समोर आली आहे.  पण याबाबत अद्याप दोन्ही पक्षांतील नेत्यांनी दुजोरा दिलेला नाही. एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अनेक तर्कवितर्क काढले जात होते. पण विधानसभा निवडणुकीतील देवेंद्र फडणवीसांची मेहनत  आणि त्यांचे कष्ट पाहता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद दिले जावे,यासाठी  भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वावर दबाव टाकला जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही बिहार पॅटर्न राबवावा आणि एकनाथ शिंदे यांना मुखअयमंत्रीपद द्यावे अशी मागणी होत आहे. भाजप बिहार पॅटर्न राबवण्याच्या मनस्थितीत नाही. इतकेच नव्हे तर भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला नव्हता,असेही भाजपकडून सांगितले जात आहे. महायुतीत सामील असलेल्या एकनाथ शिंदेंना आपल्याला पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा आहे. तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, यासाठी जोर लावला जात आहे. त्यामुळे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यात सध्या नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

Adani Bribery Case: कंपनीने लाचखोरी केली नाही, ती चूक अधिकाऱ्यांची; अदानींनी फेटाळले अमेरिकेचे आरोप

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी फायनल होत आहे. त्यामुळे भाजपच्या केंद्रातील पक्षश्रेष्ठींकडून एकनाथ शिंदे यांना दोन पर्याय देण्यात आले आहेत. नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद घ्या किंवा केंद्र सरकारमध्ये सामील व्हा आणि तुमच्या मुलाला  म्हणजेच श्रीकांत शिंदे यांना राज्य सरकारमध्ये पाठवा, असे दोन प्रस्ताव भाजपने एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवले आहेत. पण एकनाथ शिंदे यांनी भाजपचे हे प्रस्ताव धुडकावलयाची माहितीही समोर आली आहे. एकनाथ शिंदे यआणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली पण कोणताही निर्णय़ झाला नाही. त्यामुळे या विषयात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच हस्तक्षेप करतील, असे वृत्त आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या दोनही ऑफर्स धुडकावल्यानंतर ही एकनाथ शिंदे कोणाशीही भेटीगाठी घेण्याचेही टाळत असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी भाजपचा प्रस्ताव फेटाळत भाजपचा प्रस्ताव अमान्य केला. पण त्याचवेळी त्यांनी भाजपला त्यांच्याकडून दुसरा प्रस्ताव पाठवत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास आपण सरकारला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. पण भाजपनेही एकनाथ शिंदेंचा प्रस्ताव मान्य नसल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदेनी सरकारमध्येच राहावं अशी भाजपची इच्छा आहे. यासंदर्भात एकनाथ शिंदे आणि भाजप हायकमांडशी चर्चा सुरू आहे.

Rahul Gandhi: “अदानी जेलमध्ये असले पाहिजेत, सरकार त्यांना वाचवतंय”,राहुल गांधी यांची मागणी

विधानसभा निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला. त्यानंतर राज्यात नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. तेव्हापासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील दुरावा अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. निकालानंतर झालेल्या प्रेस कॉन्फरन्सनंतर आणि त्यानंतर राजभवानात राजीनामा देतेवेळीही दोघांमधील दुरावा स्पष्टपणे दिसून आला. त्यातच एकनाथ शिंदे यांनी मौन बाळगल्यामुळे हा प्रश्न अधिकच वाढला आहे.  त्यांच्या मौनामागे नेमके काय कारण आहे, हेही अदयाप कळू शकलेले नाही.

Web Title: Eknath shinde ready to provide external support to bjp nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2024 | 12:23 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • Eknath Shinde

संबंधित बातम्या

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत
1

Narayan Rane: मोठी बातमी! चिपळूणमधील कार्यक्रमात नारायण राणेंना आली भोवळ, कालच दिले होते निवृत्तीचे संकेत

Local Body Election : “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केला विश्वास
2

Local Body Election : “शिवसेनेला युतीची गरज नाही रायगडमध्ये भगवा फडकणार…”; शिंदे गटातील आमदाराने व्यक्त केला विश्वास

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त
3

Maharashtra Elections 2026 : देवरुखमध्ये भाजपचे पोस्टर जाळल्याने खळबळ! “पराभव समोर दिसत असल्याने…”, भाजप नेत्याकडून संताप व्यक्त

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन
4

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

India’s Got Talent 11 च्या विजेत्या ठरल्या ‘अमेझिंग अप्सरा’, ट्रॉफीसोबत मिळाली एवढी रोख रक्कम

Jan 05, 2026 | 05:25 PM
2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम

2025 मध्ये ‘ही’ Electric Car बनली ईव्ही मार्केटची बादशाह! मध्यम वर्गीय ग्राहकांनी भरभरून दिलं प्रेम

Jan 05, 2026 | 05:21 PM
PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर

PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर

Jan 05, 2026 | 05:21 PM
विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

विठुरायाच्या पवित्र नदीला प्रदूषणाचा विळखा, Indrayani नदी पुन्हा भरली पांढऱ्या फेसाने; काय होणार परिणाम?

Jan 05, 2026 | 05:16 PM
Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी

Pune Political News : पुणे पालिका निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज! EVM मशीनची पालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केली पाहणी

Jan 05, 2026 | 05:09 PM
500 रुपयांच्या नोटांवर पुन्हा बंदी? खर्च करण्यापूर्वी वाचा या मागाचं सत्य, मार्च 2026 च्या डेडलाईनवर केंद्र सरकारचं वक्तव्य

500 रुपयांच्या नोटांवर पुन्हा बंदी? खर्च करण्यापूर्वी वाचा या मागाचं सत्य, मार्च 2026 च्या डेडलाईनवर केंद्र सरकारचं वक्तव्य

Jan 05, 2026 | 05:02 PM
अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

अमेरिकेमध्ये EX- Girlfriend चा केला खून अन् आला भारतात पळून; तमिळनाडूत आवळल्या मुसक्या

Jan 05, 2026 | 05:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Sindhudurg: उद्धव ठाकरेंनी पांघरलेली हिरवी चादर भगव्या लाटेत वाहून जाईल – आ. प्रसाद लाड

Jan 05, 2026 | 03:12 PM
Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Sindhudurg : नारायण राणेंच्या निवृत्तीवर काय म्हणाले आ. प्रवीण दरेकर

Jan 05, 2026 | 03:07 PM
Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Sindhudurg : “महायुती मजबूत राहणं आवश्यक, राणे साहेबांचा दौरा महत्त्वाचा” — दीपक केसरकर

Jan 04, 2026 | 08:20 PM
Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Praniti Shinde : मनसे कार्यकर्ते बाळासाहेब सरवदे यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे मुक आंदोलन

Jan 04, 2026 | 08:09 PM
Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Local Body Election : “पुढच्या पाच वर्षाचा मास्टर प्लॅन शिवसेना तयार करणार”- शंभूराज देसाई

Jan 04, 2026 | 08:03 PM
Akola Corporation Elections :  बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Akola Corporation Elections : बहुजन नगरवासीयांचा महापालिका निवडणुकीवर बहिष्कार

Jan 04, 2026 | 07:54 PM
Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Solapur News : मुख्यमंत्र्यांनी मला दहा मिनिटे वेळ द्यावा सोलापूरची संपूर्ण परिस्थिती मांडतो-अमित ठाकरे

Jan 04, 2026 | 07:47 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.